‘या’ राज्यात भाजपला क्लीन स्वीप, 8 एक्झिट पोलमध्ये भाजपाला 334, काँग्रेसला 136 जागा
लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच एक्झिट पोल आला असून त्यातून देशाचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. केंद्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येत असल्याचं चित्र आहे. भाजपला आठ राज्यात क्लीन स्वीप मिळतानाही दिसत आहे. मात्र, एक्झिट पोलचे आकडे तंतोतंत खरेच येतील असं नाही. अनेकदा एक्झिट पोलच्या विपरीतही आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. त्यामुळे 4 जून रोजीच खरे आकडे बाहेर येतील.
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एनडीए 8 राज्यात क्लीन स्वीप करण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 9 राज्यात क्लीन स्वीप केलं होतं. त्यापैकी यावेळी एक राज्य भाजपच्या हातून जाणार आहे. 2019मध्ये ज्या राज्यांमध्ये भाजपला क्लीन स्वीप मिळाली होती, त्यापैकी काही राज्य भाजपच्या हातून जाणार आहेत. तर नवीन राज्य या यादीत जोडले जाणार आहेत, अशी शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
सीट व्होटरच्या सर्व्हेनुसार एनडीए अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दादरा नागर हवेली, दमन आणि दीव, मिझोराम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये क्लीन स्वीप करणार आहे. एक्झिट पोलनुसार एनडीए अंदमान निकोबारच्या एका, आंध्र प्रदेशातील 25, अरुणाचल प्रदेशातील 2, दादर आणि नागर हवेलतील एक, दीव आणि दमनमधील एक, मिझोराममधील एक, त्रिपुरातील दोन आणि उत्तराखंडमधील सर्व पाच जागांवर विजय मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड आणि दिल्लीतही एनडीए क्लिन स्वीप करण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये 2019च्या निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या.
या राज्यात क्लीन स्वीप? (कंसात जागा)
अंदमान आणि निकोबार: 1 आंध्र प्रदेश: 21-25 अरुणाचल प्रदेश: 2 दादर आणि नागर हवेली: 0-1 दमन और दीव: 0-1 मिजोरम: 0-1 त्रिपुरा: 2 उत्तराखंड: 4-5
या राज्यातही शक्यता
गुजरात: 26 हरियाणा: 10 हिमाचल प्रदेश: 4 चंदीगड: 1 दिल्ली: 7
8 एक्झिट पोल एनडीएच्या बाजूने
8 एक्झिट पोलच्यानुसार पोल ऑफ पोल्समध्ये भाजपला 334, काँग्रेसला 136 आणि इतरांना 50 जागा मिळताना दिसत आहेत. आघाडीचा आकडा सांगायचा झाला तर एनडीएला 348 आणि इंडिया आघाडीला 148 जागा मिळताना दिसत आहे. 12 राज्यांचा डेटा अजून आलेला नाही. त्यावरूनही बरीचशी माहिती पुढे येणार आहे.
हिंदी पट्टा भाजपचा
हिंदी पट्ट्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्लीत भाजपला एकतर्फी विजय मिळताना दिसत आहे. या राज्यात भाजपला 90 टक्के जागा मिळतील असा अंदाज आहे. मध्यप्रदेशातील 29 जागांपैकी 28 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. राजस्थानमध्येही 23 ते 25 जागा मिळताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागांची संख्या 69 ते 74 जागांच्या घरात असेल. तर छत्तीसगडमध्ये भाजप 11 पैकी 11 जागा खिशात घालेल असा अंदाज आहे. दिल्लीतही सातही जागांवर भाजपला विजय मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.