Exit Poll Karnataka : काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात भाजपची धमाकेदार कामगिरी
Exit Poll 2024 Karnataka : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने जेडीएस सोबत युती केली होती. निवडणुकी दरम्यान जेडीएस नेते प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाले होते. त्यामुळे कर्नाटकात भाजपला फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एग्झिट पोलचे निकाल समोर आले. या निकालामध्ये काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. विधानसभेत त्या राज्यात काँग्रेसला जनतेने कौल दिला. परंतु लोकसभेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एग्झिट पोलमधून शिक्कामोर्तब केला. कर्नाटक भारतीय जनता पक्षावर पुन्हा जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे एग्झिट पोलमधून दिसत आहे. आज तक या वृत्तवाहिनीच्या एग्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजप आघाडीला पुन्हा २०-२२ जागा मिळणार आहे. काँग्रेस आघाडीला केवळ ३-५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्नाटकमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली होती.
कर्नाटकात भाजप भक्कमच
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने जेडीएस सोबत युती केली होती. निवडणुकी दरम्यान जेडीएस नेते प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाले होते. त्यामुळे कर्नाटकात भाजपला फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसारखा निकाल कर्नाटकात लागताना दिसत आहे. पूर्वी पेक्षा दोन-तीन जागा भाजपच्या कमी होणार आहे.
एक्झिट पोलमध्ये एनडीएला ग्रामीण भागात 56 टक्के आणि शहरी भागात 54 टक्के मते मिळताना दिसत आहे. त्याच इंडिया आघाडीला ग्रामीण भागात 40 टक्के आणि शहरी भागात 42 टक्के मते मिळत असल्याचे दिसते. तर इतरांना ४ टक्के मते मिळत आहेत.
कर्नाटकातील लोकसभेच्या 28 जागांसाठी 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. 26 एप्रिल रोजी कर्नाटकातील उडुपी-चिकमगलूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगलोर उत्तर, बंगळुरू मध्य, बंगळुरू दक्षिण, चिक्कबल्लापूर आणि कोलार या 14 जागांवर मतदान झाले होते. 7 मे रोजी चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा या उर्वरित 14 जागांवर मतदान झाले.
तामिळनाडूत भाजपची प्रथमच एन्ट्री
भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूत चांगली कामगिरी केलेली विविध एग्झिट पोलमधून दिसून येत आहे. या राज्यात प्रथमच भाजपचा विजय होणार आहे. भाजप आघाडीला २ ते चार जागा मिळणार आहे. काँग्रेसला १३ ते १५ जागा आहे. डीएमके २२-२२ जागांवर विजयी होणार असल्याचे आज तकच्या एग्झिट पोलमध्ये म्हटले आहे.