एक्झिट पोल 2024 LIVE Streaming : एक्झिट पोलची आकडेवारी कधी आणि कुठे दिसणार? वाचा A टू Z माहिती

Exit Poll Results 2024 LIVE Streaming Today in Marathi : देशात आता कुणाची सत्ता येणार? याबाबतचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आता नुकतंच काही तासांनी सर्वांसमोर येणार आहे. या एक्झिट पोलची देशभरात वाट पाहिली जात आहे. अवघ्या काही तासांनी एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर येणार आहे. एक्झिट पोल नेमका कुठे बघावा? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एक्झिट पोल 2024 LIVE Streaming : एक्झिट पोलची आकडेवारी कधी आणि कुठे दिसणार? वाचा A टू Z माहिती
एक्झिट पोल
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 3:38 PM

देशासाठी आज सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक दिवस आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या लोकसभेच्या रणधुमाळीला आज शेवट होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी समाप्त होणार आहे. त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीतून देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होतं का? भाजपच्या घोषणेनुसार एनडीए 400 जागांचा आकडा पार पाडणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडी अवलंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल जास्त महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय-काय घडामोडी घडू शकतात, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याआधी या निवडणुकीचा निकाल काय असू शकतो? याबाबतचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहे. हा एक्झिट पोल किंवा ही एक्झिट पोलची आकडेवारी नेमकी कशी बघावी? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एक्झिट पोल कुठे बघणार?

एक्झिट पोल किंवा एक्झिट पोलची आकडेवारी तुम्ही आमच्या ‘टीव्ही 9 मराठी’ वाहिनीवर पाहू शकणार आहेत. तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजेपासून आमच्या वृत्तवाहिनीवर याबाबतच्या बातम्या पाहू शकणार आहेत. या माध्यमातून तुम्हाला देशातील नागरिकांचा नेमका कल कुणाच्या बाजूने आहे? कुणाची देशात सत्ता येऊ शकते? याबाबतचा अंदाज लागू शकतो. तुम्ही टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीसोबतच आमच्या टीव्ही 9 मराठीच्या tv9marathi.com या वेबसाईटवरही एक्झिट पोलची आकडेवारी पाहू शकणार आहात. याशिवाय आमच्या टीव्ही 9 मराठीच्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही एक्झिट पोलची आकडेवारी आणि त्यासंबंधीच्या बातमी पाहू शकणार आहात.

टीव्ही 9 मराठीची यूट्यूब लिंक :

https://www.youtube.com/watch?v=04y0H01GTg0 

तुम्ही लाईव्ह व्हिडीओ इथेही पाहू शकता :

तुम्ही आमच्या टीव्ही 9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवरही एक्झिट पोलची आकडेवारी पाहू शकणार आहात. वाचा लिंक : https://www.tv9marathi.com/elections/lok-sabha-elections/lok-sabha-election-2024-final-phase-voting-and-exit-poll-results-maharashtra-politics-nivadnuk-nikal-live-news-and-updates-in-marathi-1208959.html

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.