Prashant Kishor : प्रशांत किशोर कुठल्या आधारावर बोलले भाजपा पुन्हा 300 प्लस जागा जिंकणार?

Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोल येण्याच्या काही तास आधी पुन्हा एकदा अंदाज वर्तवला आहे. भाजपाबाबत त्यांच मत बदललय का? कुठल्या आधारावर त्यांनी नवीन दावे केले आहेत, ते समजून घ्या. एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्यादिवशी साधारण काय चित्र असणार ते स्पष्ट होतं.

Prashant Kishor : प्रशांत किशोर कुठल्या आधारावर बोलले भाजपा पुन्हा 300 प्लस जागा जिंकणार?
Prashant Kishor Prediction
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 9:28 AM

देशात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याच मतदान सुरु आहे. आज सातवा टप्पा आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान संपेल. त्यानंतर लगेच एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात होईल. एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्यादिवशी साधारण काय चित्र असणार ते स्पष्ट होतं. आतापर्यंत एक्झिट पोल फार कमीवेळा चुकले आहेत. त्यामुळे मतदान संपातच जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या आकड्यांकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोलला काही तास उरले असताना पुन्हा एकदा आपला अंदाज जाहीर केला आहे. याआधी त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. आता सुद्धा ते आपल्या याच आकड्यावर ठाम आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जितक्या जागा जिंकल्या तितक्या किंवा त्यापेक्षा थोडी जास्त सुधारणा होऊ शकते, असं प्रशांत किशोर यांचं मत आहे.

“माझ्या मते भाजपा पुन्हा सत्तेवर येईल. उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांना फार नुकसान होणार नाही” असं प्रशांत किशोर यांचं विश्लेषण आहे. “2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला फार मोठा फटका बसणार नाही. ते दक्षिण आणि पूर्वेतून ते नुकसान भरुन काढतील. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भाजपाची कामगिरी संतुलित असेल” असं प्रशांत किशोर म्हणाले.

भाजपाच्या जागा कुठून वाढणार?

“पूर्व आणि दक्षिण भारतातून भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार आहे. म्हणून मी म्हणतोय की, 2019 इतक्या भाजपाच्या जागा येतील” असं प्रशांत किशोर म्हणाले. ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात लाट आहे. त्यामुळे पूर्व भारतातून भाजपाच्या जागा वाढू शकतात. “पूर्व आणि दक्षिणमध्ये लोकांना भाजपाचा अजून अनुभव नाहीय. त्यामुळे ते त्यांना संधी देतील. तेलंगणमध्ये भाजपाचा विस्तार होईल. आंध्र प्रदेशमध्ये त्यांची आघाडी आहे. तामिळनाडू, करेळ या भागातही भाजपाची मतांची टक्केवारी वाढू शकते” असं प्रशांत किशोर म्हणाले.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.