निकालापूर्वीच मोदी आणि भाजपची कुंडली तयार; काशीच्या ज्योतिषांचा आकडा काय?

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या आधीच एक्झिट पोल आले आहेत. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत आनंदाचं वातावरण आहे. तर विरोधी पक्षांमध्ये बैचेनी वाढली आहे. एक्झिट पोलच्या आकड्यानंतर आता काशीच्या ज्योतिषांनीही आपला आकडा सांगितला आहे. भाजप, मोदी आणि इंडिया आघाडीची कुंडलीही तयार केली आहे.

निकालापूर्वीच मोदी आणि भाजपची कुंडली तयार; काशीच्या ज्योतिषांचा आकडा काय?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 9:18 PM

एक्झिट पोलचा कल हाती आल्यानंतर आता 4 जून रोजी निकाल काय असेल अशी देशभर चर्चा सुरू झाली आहे. कारण अनेकदा एक्झिट पोल जवळपास खरे ठरले आहेत. तर अनेकदा एक्झिट पोलच्या उलट निर्णय आलेला आहे. त्यामुळे एनडीएला तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळणार का? असा सवाल केला जात आहे. नरेंद्र मोदीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. इंडिया आणि एनडीए आघाडीला या निवडणुकीत किती जागा मिळणार आहे याची उत्सुकताही लोकांना लागली आहे. काशीच्या पंडितांनीही या बाबतचा एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक विश्लेषण देण्यात आलं आहे.

काशीचे पंडित संजय उपाध्याय यांनी इंडिया आघाडी, बीजेपी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुंडली तयार केली आहे. उपाध्याय यांच्या चार पिढ्या ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक आहेत. देशातील सर्व टप्प्यांचे मतदान झाले आहे. त्यानंतर लग्न आणि राशीचं विश्लेषण करून संजय उपाध्याय यांनी इंडिया आघाडी, भाजप आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुंडली तयार केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

दोन तृतियांश बहुमत

इंडिया आघाडीची वृश्चिक लग्न कुंडली आहे. मोदी यांचीही वृश्चिक लग्न कुंडली आहे. तर भाजपची मिथुन लग्न कुंडली आहे. राशींबाबत बोलायचं झालं तर मोदी आणि भाजपची राशी वृश्चिक आहे. तर इंडिया आघाडीची राशी कर्क आहे. राशी आणि लग्नाच्या आधारे विश्लेषण केलं असता भाजपची कुंडली इंडिया आघाडीपेक्षा अधिक तेज आहे. 4 जून रोजी येणाऱ्या निकालाच्या आधारावर अधिक प्रभावी होताना दिसत आहे. कुंडलींच्या अभ्यासावर नजर टाकली तर लग्न आणि राशींनी प्रभावित असलेला भाजप दोन तृतियांश बहुमत मिळवेल. त्यानुसार भाजपला 360 ते 375 जागा मिळण्याची शक्यता आहे, असं उपाध्याय म्हणाले.

4 जूनकडे लक्ष

सातव्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. त्यानुसार या निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. एक्झिट पोल आपल्या फेव्हरमध्ये आल्याने भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, इंडिया आघाडीला हे एक्झिट पोल माान्य नाहीयेत. त्यामुळे देशाची नजर 4 जूनकडे लागलं आहे. 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर काय निकाल येतो याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.