Phase 1 Lok Sabha Election 2024 : 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 19 एप्रिलला सुरूवात होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Phase 1 Lok Sabha Election 2024 : 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मदतान 19 एप्रिल रोजी होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 2:45 PM

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशभरातील 543 लोकसभेच्या जागांसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे आणि 4 जूनला मतमोजणी होऊन निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली. उमेदवारांना त्यांचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च होती. यानंतर, 28 मार्च रोजी निवडणूक आयोगातर्फे उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल आणि 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे.

21 राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिझोरम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, जम्मू-कश्मीर, लक्षद्वीप आणि पाँडिचेरीचा समावेश आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जागांबद्दल सांगायचं झाल तर अरुणाचल प्रदेश-2, बिहार-4, आसाम-4, छत्तीसगड-1, मध्य प्रदेश-6, महाराष्ट्र-5, मणिपुर-2, मेघालय-2, मिझोरम-1, नागालँड-1, राजस्थान-12, सिक्कीम-1, तामिळनाडू-39, त्रिपुरा-1, उत्तर प्रदेश-8, उत्तराखंड-5, पश्चिम बंगाल-3, अंदमान आणि निकोबार-1, जम्मू-कश्मीर-1, लक्षद्वीप-1 आणि पाँडिचेरीमध्ये एका जागेवर मतदान होणार आहे.

देशभरात 97 कोटी मतदार

निवडणुकीचा सण हा देशासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले होते. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपणार आहे. सर्व राज्यांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही सर्वांच्या सहभागाने एक संस्मरणीय आणि निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करू. आमच्याकडे 97 कोटी रजिस्टर्ड मतदार, तसेच 10.5 लाख मतदान केंद्रे आहेत, असे त्यांनी नमूद केले.

State Name Constituency Name Phase Date
Andaman & Nicobar Andaman & Nicobar Islands Phase 1 19-Apr-24
Arunachal Pradesh Arunachal East Phase 1 19-Apr-24
Arunachal Pradesh Arunachal West Phase 1 19-Apr-24
Assam Kaziranga Phase 1 19-Apr-24
Assam Sonitpur Phase 1 19-Apr-24
Assam Lakhimpur Phase 1 19-Apr-24
Assam Dibrugarh Phase 1 19-Apr-24
Assam Jorhat Phase 1 19-Apr-24
Bihar Aurangabad Phase 1 19-Apr-24
Bihar Gaya Phase 1 19-Apr-24
Bihar Jamui Phase 1 19-Apr-24
Bihar Nawada Phase 1 19-Apr-24
Chhattisgarh Bastar Phase 1 19-Apr-24
Jammu & Kashmir Udhampur Phase 1 19-Apr-24
Lakshadweep Lakshadweep Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Balaghat Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Chhindwara Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Jabalpur Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Mandla Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Shahdol Phase 1 19-Apr-24
Madhya Pradesh Sidhi Phase 1 19-Apr-24
Maharashtra Bhandara-Gondiya Phase 1 19-Apr-24
Maharashtra Chandrapur Phase 1 19-Apr-24
Maharashtra Gadchiroli-Chimur Phase 1 19-Apr-24
Maharashtra Nagpur Phase 1 19-Apr-24
Maharashtra Ramtek Phase 1 19-Apr-24
Manipur Inner Manipur Phase 1 19-Apr-24
Manipur Outer Manipur Phase 1 19-Apr-24
Meghalaya Shillong Phase 1 19-Apr-24
Meghalaya Tura Phase 1 19-Apr-24
Mizoram Mizoram Phase 1 19-Apr-24
Nagaland Nagaland Phase 1 19-Apr-24
Puducherry Puducherry Phase 1 19-Apr-24
Rajasthan Alwar Phase 1 19-Apr-24
Rajasthan Bharatpur Phase 1 19-Apr-24
Rajasthan Bikaner Phase 1 19-Apr-24
Rajasthan Churu Phase 1 19-Apr-24
Rajasthan Dausa Phase 1 19-Apr-24
Rajasthan Ganganagar Phase 1 19-Apr-24
Rajasthan Jaipur Phase 1 19-Apr-24
Rajasthan Jaipur Rural Phase 1 19-Apr-24
Rajasthan Jhunjhunu Phase 1 19-Apr-24
Rajasthan Karauli-Dholpur Phase 1 19-Apr-24
Rajasthan Nagaur Phase 1 19-Apr-24
Rajasthan Sikar Phase 1 19-Apr-24
Sikkim Sikkim Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Arakkonam Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Arani Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Chennai Central Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Chennai North Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Chennai South Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Chidambaram Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Coimbatore Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Cuddalore Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Dharmapuri Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Dindigul Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Erode Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Kallakurichi Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Kancheepuram Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Kanniyakumari Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Karur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Krishnagiri Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Madurai Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Mayiladuthurai Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Nagapattinam Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Namakkal Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Nilgiris Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Perambalur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Pollachi Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Ramanathapuram Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Salem Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Sivaganga Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Sriperumbudur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tenkasi Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Thanjavur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Theni Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Thoothukkudi Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tiruchirappalli Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tirunelveli Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tiruppur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tiruvallur Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Tiruvannamalai Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Vellore Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Viluppuram Phase 1 19-Apr-24
Tamil Nadu Virudhunagar Phase 1 19-Apr-24
Tripura Tripura West Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Bijnor Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Kairana Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Moradabad Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Muzaffarnagar Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Nagina Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Pilibhit Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Rampur Phase 1 19-Apr-24
Uttar Pradesh Saharanpur Phase 1 19-Apr-24
Uttarakhand Almora Phase 1 19-Apr-24
Uttarakhand Garhwal Phase 1 19-Apr-24
Uttarakhand Hardwar Phase 1 19-Apr-24
Uttarakhand Nainital Udhamsingh Nagar Phase 1 19-Apr-24
Uttarakhand Tehri Garhwal Phase 1 19-Apr-24
West Bengal Alipurduars Phase 1 19-Apr-24
West Bengal Coochbehar Phase 1 19-Apr-24
West Bengal Jalpaiguri Phase 1 19-Apr-24

गेल्या वर्षभरात सुमारे 11 निवडणुका झाल्या आहेत. सर्वत्र निवडणुका शांततेत पार पडल्या. न्यायालयीन खटले कमी झाले. फेक न्यूजवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारताच्या निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. यावेळी 1.82 कोटी नवीन मतदार सामील झाले आहेत. एकूण मतदारांपैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी या महिला मतदार आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असलेले 82 लाख लोक आहेत. 2 लाख 18 हजार लोक असे आहेत ज्यांचे वय 100 पेक्षा जास्त आहे. प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या 1.82 कोटी असल्याचे निवडणूक आयुक्तांनी नमूद केले.

महिला मतदारांची संख्या वाढली

महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले. महिला मतदारांची संख्या ही पुरूषांपेक्षा जास्त आहे. 2024 मध्ये जे वयाची 18 वर्षं पूर्ण करतील, अशा मतदारांचाही डेटा आमच्याकडे आहे. देशातील तरूण हे केवळ मतदान करणार नाही तर मतदारांची संख्या वाढवण्यातही मदत करतील, असा विश्वासही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रत्येत मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय असेल. तसेच महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतील. याशिवाय दिव्यांग मतदारांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदान केंद्रे देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात येतील. 85 वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मत नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. ही व्यवस्था देशात प्रथमच लागू होणार आहे. त्यासाठी त्यांना फॉर्म देण्यात येणार आहेत.

हेल्पलाइनद्वारे मतदारांना मिळू शकते माहिती

प्रत्येकाला मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोग सर्वत्र पोहोचेल. मतदानानंतर कोणत्याही बूथवर वेस्ट मटेरिअल ( टाकाऊ वस्तू) पदार्थ दिसू नयेत, यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मतदार हेल्पलाइनद्वारे मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकते. गुन्हेगारी नोंदी असलेल्या सर्व उमेदवारांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे तीन वेळा माहिती द्यावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नमूद केले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.