Lok Sabha Election Final Results 2024 LIVE : एनडीएकडून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार

| Updated on: Jun 05, 2024 | 10:46 PM

Lok Sabha Election Results 2014 Final Winners List LIVE Updates in Marathi : लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सत्ता कोणाची येणार? याचा कौल स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election Final Results 2024 LIVE : एनडीएकडून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार
loksabha election 2024 result

लोकसभा निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. त्यानंतर आता उद्या मंगळवारी ४ जून रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी होणार आहे. ‘एग्झिट पोल’मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सरकार बनणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे निवडणूक निकाल ‘एग्झिट पोल’सारखे येतात की दुसरे काही याकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत आहे. देशातील निवडणुकी मतमोजणीचे प्रत्येक अपडेट वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2024 06:43 PM (IST)

    एनडीएकडून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार

    दिल्लीत एनडीएच्या नेत्यांनी मंजूर केलेल्या ठरावात एनडीएच्या नेत्यांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली.

  • 05 Jun 2024 06:05 PM (IST)

    राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा केली विसर्जित

    केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि 17वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केली. ती शिफारस स्वीकारून राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा विसर्जित केली आहे.

  • 05 Jun 2024 05:58 PM (IST)

    आज संध्याकाळपर्यंत दावा केला जाणार

    लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएकडून सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनडीएकडून आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याचं म्हटलं जात असताना मोठी अपडेटसमोर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत दावा केला जाणार आहे. एनडीए बैठकीत घटक पक्षांचं मोदींना समर्थन आहे.

  • 05 Jun 2024 05:49 PM (IST)

    दहा अपक्ष खासदारांचा अमित शहा यांच्याशी संपर्क

    देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देशातले 10 अपक्ष खासदार भाजपसोबत असल्याचं समजत आहे. दहा अपक्ष खासदारांनी अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. सरकार बनवताना देशभरातील दहा खासदार भाजप सोबतच राहणार आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेमध्ये एनडीएची ताकद पुन्हा वाढणार असल्याचं चित्र आहे.

  • 05 Jun 2024 05:33 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्ष उपस्थित राहणार

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. थोड्याच वेळात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्ष उपस्थित राहणार आहेत. शरद पवार, संजय राऊत हे नेते उपस्थित असणार आहेत.

  • 05 Jun 2024 05:13 PM (IST)

    नरेंद्र मोदींना एनडीएतील घटक पक्षांचा पाठिंबा

    लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी लगबग पाहायला मिळत आहे. त्यासाठी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत नितीश कुमार-चंद्रबाबू नायडू यांचं नरेंद्र मोदींना समर्थन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींना एनडीएतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे एनडीएचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदापंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

  • 05 Jun 2024 05:00 PM (IST)

    सरकार स्थापनेचा दावा करणार

    एनडीएच्या बैठकीनंतर पीएम मोदी,भाजप अध्यक्ष नड्डा, केंद्रीय गृह मंत्री शहा, मुख्यमंत्री नितीश कुमार लगेचच राष्ट्रपतींकडे जाणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

  • 05 Jun 2024 04:50 PM (IST)

    एनडीएच्या बैठकीला सुरुवात

    एनडीएच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.बैठकीत खातेवाटपावर आणि शपथ विधी सोहळ्याच्या तयारीवर चर्चा होणार आहे. आज खतवाटपाची चर्चा झाली तर जेडीयू आणि टीडीपी पक्ष समर्थनच पत्र मोदींना देणार असल्याचे समजते.

  • 05 Jun 2024 04:40 PM (IST)

    आम्ही काल आमचा कसबा पुन्हा मिळवला

    आम्ही काल आमचा कसबा पुन्हा मिळवला, असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांना लगावला.लोकांना स्टंटबाजी आवडत नाही हे लोकांनी काल दाखवून दिल्याचे ते म्हणाले. रोज उठून आंदोलन आणि स्टंटबाजी करणे पुणेकरांना आवडत नाही. तुमच्या मतदारसंघातच आम्ही लीड घेतली, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 05 Jun 2024 04:30 PM (IST)

    चंद्रकांत खैरे यांना लोकांनी नाकारलं

    चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या नंबरवर गेले, जे त्यांनी पेरलं तेच ऊगवलं. त्यांनी आत्ता बुवाबाजी करावी, देव पुजा करावी, देवधर्म करावं, राजकारण सोडून द्यावं, हे त्याचं काम नाहीये, असा टोला संदिपान भुमरे यांनी लगावला.दोन वेळा ते हरले त्यांना जनतेनं नकारलंय, आमचा विजय एकनाथ शिंदेंचा विजय आहे, असे ते म्हणाले.

  • 05 Jun 2024 04:20 PM (IST)

    धुळ्यात काँग्रेस भवनात वाद

    नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या शेजारी खुर्चीवर बसण्यावरून वाद समोर आला आहे. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य युवराज कारणकाळ आणि शहर अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांच्यात वाद झाला. काँग्रेस भावनत नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 05 Jun 2024 03:57 PM (IST)

    पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले

    एनडीएच्या बैठकीला नितीश कुमार पोहोचले आहेत. या सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले आहेत. थोड्या वेळात एनडीएची बैठक सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे.

  • 05 Jun 2024 03:56 PM (IST)

    दिल्लीत एनडीएच्या बैठकीला अमित शहा, जे पी नड्डा पोहोचले

    दिल्लीत एनडीएची बैठक होत असून या बैठकीला अमित शहा, जे पी नड्डा पोहोचले आहेत. चंद्राबाबू नायडू देखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल पोहोचले आहेत.

  • 05 Jun 2024 02:37 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल

    नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ८ तारखेला मोदींचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

  • 05 Jun 2024 01:43 PM (IST)

    NDA आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक

    येत्या 7 जून रोजी दुपारी 2 वाजता होणार बैठक. या बैठकीला सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार

  • 05 Jun 2024 01:26 PM (IST)

    विमानातून दिल्लीत येताना तेजस्वी यादव आणि नितीश कुमार एकाच सीटवर

    नितीश कुमार इंडिया आघाडीत येणार की ? तेजस्वी एनडीएची वाट धरणार चर्चांना उधाण. आज दिल्लीत येताना एकाच सीटवर दोघांचा प्रवास

  • 05 Jun 2024 01:08 PM (IST)

    या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होणार

    आठ जूनला पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शपथविधी लांबणीवर पडल्यास विरोधी पक्ष हालचाली करू शकतात. त्याची खबरदारी म्हणून आजच बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार.

  • 05 Jun 2024 12:27 PM (IST)

    Live Update : जनतेत मोदी यांच्याबाबत नाराजी – शरद पवार

    नितीश कुमारांसोबत संपर्क करण्याची आमच्यात अजून चर्चा नाही… पुढच्या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू… जनतेत मोदी यांच्याबाबत नाराजी दिसून आली… असं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं आहे.

  • 05 Jun 2024 12:21 PM (IST)

    Live Update : आम्ही अजून चर्चा केलेली नाही, त्यामुळे का कुणाचं नाव घेऊ – शरद पवार

    आम्ही अजून चर्चा केलेली नाही, त्यामुळे का कुणाचं नाव घेऊ… आजच्या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू… कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

  • 05 Jun 2024 11:50 AM (IST)

    मंत्री रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील दिल्लीत दाखल

    नवी दिल्ली- मंत्री रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. दानवे यांच्या निवासस्थानामधून दोघे नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. मंत्री परिषदेच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.

  • 05 Jun 2024 11:48 AM (IST)

    नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

    नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची ही या कार्यकाळातील शेवटची बैठक आहे.

  • 05 Jun 2024 11:40 AM (IST)

    एनडीएच्या बैठकीसाठी चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना

    एनडीएच्या बैठकीसाठी चंद्राबाबू नायडूसुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नितीश कुमारसुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत.

  • 05 Jun 2024 11:28 AM (IST)

    शरद पवार, सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल

    शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी-एससीपीने लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या आहेत.

  • 05 Jun 2024 11:10 AM (IST)

    नितीश कुमार एनडीएच्या बैठकीसाठी रवाना

    नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानातून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत आज एनडीएची बैठक होणार आहे. यासाठी ते रवाना झाले आहेत.

  • 05 Jun 2024 11:07 AM (IST)

    राष्ट्रपतींकडून आज 8 वाजता डीनर आयोजित

    केंद्रीय मंत्री परिषदेतील मंत्र्यांना राष्ट्रपतींकडून आज रात्री 8 वाजता डिनर आयोजित करण्यात आला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसह विद्यमान सर्व मंत्री आणि राज्यमंत्री डिनरला उपस्थित राहतील.

    महाराष्ट्रातून नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भागवत कराड, रामदास आठवले, भारती पवार उपस्थित असतील.

  • 05 Jun 2024 10:55 AM (IST)

    एनडीएच्या बैठकीसाठी नीतिश कुमार दिल्लीला रवाना

    पाटणा येथे निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर नितीश कुमार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. या बैठकीसाठी चिराग पासवान उपस्थित होते. एनडीएची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक पार पडणार आहे.

  • 05 Jun 2024 10:13 AM (IST)

    नवी दिल्ली – चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ?

    चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ? दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवं आहे.

    चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • 05 Jun 2024 10:11 AM (IST)

    चंद्राबाबू नायडू यांची आमदारांशी बैठक सुरू

    आंध्र प्रदेश : चंद्राबाबू नायडू यांची आमदारांशी बैठक सुरू.  टीडीपी आमदारांशी बैठक केल्यानंतरच चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना होणार. नायडू टीडीपी आमदारांची मत जाणून घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा कल इंडिया आघाडीकडे की NDA कडे हे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार

  • 05 Jun 2024 09:56 AM (IST)

    Maharashtra News : अमोल किर्तीकरांचा विजय चोरण्यात आलाय- संजय राऊत

    “इंडियाचे सर्व नेते दिल्लीत चर्चा करणार. एकमताने निर्णय घेणार. भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. अमोल किर्तीकरांचा विजय चोरण्यात आलाय. इंडियाचे सर्व नेते दिल्लीत चर्चा करणार. चोरी, पाकिटमारी करुन वायकरांना जिंकवण्यात आलं”

  • 05 Jun 2024 09:51 AM (IST)

    Maharashtra News : भाजपाला सरकार बनवण्याचा अधिकार पण आमच्याकडेही आकडा – संजय राऊत

    “मोदींची गॅरेंटी लोकांनी संपवली. मोदींच नाक कापल गेलय. चंद्राबाबू, नितीश कुमार मोदींसोबत जातील असं वाटत नाही. तिसऱ्यांदा मोदींच सरकार बनणार नाही. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारत असतील, तर आमचा पाठिंबा. भाजपाला सरकार बनवण्याचा अधिकार पण आमच्याकडेही आकडा आहे” असं संजय राऊत म्हणाले.

  • 05 Jun 2024 09:32 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावणार

    उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रपतींकडे दरवाजा ठोठावणार. वायव्य मुंबईची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणार. अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव. ठाकरे गट राष्ट्रपतींकडे लेखी तक्रार दाखल करणार, सूत्रांची माहिती.

  • 05 Jun 2024 09:15 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : मोदींना घेरण्याचा इंडिया आघाडीचा प्लान काय?

    सरकार स्थापनेची खात्री असेल, तरच काँग्रेस पुढच पाऊल उचलणार. काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यापासून काही अडचण नाही. पण घटक पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दबाव टाकत आहेत. मोदी सरकारने घेतलेले निर्णय बदलायचे व कार्यकाळातील निर्णय चौकशीच्या फेऱ्यात आणून घेरण्याची इंडिया आघाडीची रणनिती आहे.

  • 05 Jun 2024 08:55 AM (IST)

    Loksabha Election Result : मोदी सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता

    मोदी 3 सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता आहे. आजपासून 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले होणार आहे.

  • 05 Jun 2024 08:40 AM (IST)

    Loksabha Election Result : इटलीच्या पंतप्रधानांकडून मोंदीचे अभिनंदन

    एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 05 Jun 2024 08:05 AM (IST)

    Loksabha Election Result : आज दोन महत्वाच्या बैठका

    दिल्लीत आज राजकीय दोन मोठ्या बैठका आहे. आज इंडिया आघाडीची संध्याकाळी बैठक होणार आहे तर एनडीएची पण आज बैठक होणार आहे.

  • 04 Jun 2024 06:08 PM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : सरकार स्थापनेसंदर्भात काय म्हणाले राहुल गांधी?

    “सरकार स्थापनेच काय करायच? त्या संदर्भात उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत घटक पक्षांशी चर्चा करुन पुढची भूमिका ठरवू” असं राहुल गांधी म्हणाले.

  • 04 Jun 2024 06:03 PM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : ‘मोदी गेले तर अदानी गेले’, काय म्हणाले राहुल गांधी?

    “नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, अर्धी न्यायव्यवस्था यांना धमकावलं, ताब्यात घेतलं. लढाई संविधान वाचवण्याची होती. आमची लढाई घटनात्मक संस्था वाचवण्यासाठी होती. जनता अदानीना मोदींशी रिलेट करते. मोदी गेले तर अदानी गेले. आज शेअर बाजारात हेच दिसून आलं. गरीबांनी संविधान वाचवलं” असं राहुल गांधी म्हणाले.

  • 04 Jun 2024 05:57 PM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : भाजपाकडून घटनात्मक संस्थांचा गैरवापर – मल्लिकार्जुन खर्गे

    “भाजपाने घटनात्मक संस्थांचा गैरवापर केला. राहुल गांधींनी काढलेल्या दोन्ही भारत जोडो यात्रा यशस्वी” असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

  • 04 Jun 2024 05:54 PM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : हा मोदींच्या विरोधात जनादेश – मल्लिकार्जुन खर्गे

    “निवडणुकी दरम्यान आम्हाला हैराण केलं. ही लढाई मोदी विरुद्ध जनता होती. आमचा प्रचार सकारात्मक होता. मोदींच्या विरोधात जनादेश आहे” असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

  • 04 Jun 2024 05:49 PM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : भाजपाप्रणीत NDA आणि इंडिया आघाडी किती जागांवर आघाडीवर

    भाजपाप्रणीत NDA सध्या 294 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 05:22 PM (IST)

    Varanasi Lok sabha Election Result 2024 : वाराणसीत पंतप्रधान मोदी किती मतांनी जिंकले?

    वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या अजय राय यांना पराभूत केलं. तब्बल 1 लाख 50 हजार मतांनी मोदींनी विजय मिळवला.

  • 04 Jun 2024 04:28 PM (IST)

    Loksabha Election Result 2024 : भाजपा उमेदवाराचा तब्बल 8 लाख मतांनी विजय

    मध्य प्रदेशच्या विदिशा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तब्बल 8 लाख मतांनी विजयी झाले आहे. हा रेकॉर्ड मतांनी झालेला विजय आहे.

  • 04 Jun 2024 04:10 PM (IST)

    Amethi Loksabha Election Result 2024 : अमेठीमध्ये स्मृती इराणी यांना मोठा झटका

    उत्तर प्रदेशातील अमेठीत भाजपाला मोठा झटका बसला आहे. भाजपाच्या स्मृती इराणी तब्बल लाखभर मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा विजयी झाले आहेत. 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत केले होते.

  • 04 Jun 2024 03:26 PM (IST)

    Loksabha Election Result 2024 : राज्यनिहाय भाजपाची देशात स्थिती कशी आहे?

    कर्नाटक (NDA) – 18

    उत्तर प्रदेशात (NDA) – 35

    महाराष्ट्रात (NDA) – 18

    दिल्लीत (NDA) – 7

    मध्य प्रदेश (NDA) – 29

    गुजरात (NDA) – 24

    पश्चिम बंगाल (NDA) – 11

    हरियाणा (NDA) – 5

    राजस्थान (NDA) – 14

    छत्तीसगड (NDA) – 10

    तेलंगण (NDA) – 8

    बिहार (NDA) – 33

    आंध्र प्रदेश (NDA) – 22

  • 04 Jun 2024 01:30 PM (IST)

    Uttar pradesh Loksabha Election Result 2024 : गेम फिरवणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपाची सध्या काय स्थिती?

    गेम फिरवणाऱ्या उत्तर प्रदेशात सध्या भाजपा प्रणीत एनडीए 35 तर काँग्रेस प्रणीत INDIA 44 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 12:47 PM (IST)

    Karnataka Lok sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्नाला मतदारांनी दिला धक्का

    कर्नाटकच्या हसनमधून जेडीएसचा प्रज्वल रेवन्ना पराभूत झाला आहे. कर्नाटकात भाजपा आणि जेडीएसची आघाडी आहे. प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा नातू आहे. प्रज्वल रेवन्नावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत.

  • 04 Jun 2024 12:17 PM (IST)

    Amethi Loksabha Election Result 2024 : स्मृती इराणी किती हजार मतांनी पिछाडीवर?

    उत्तर प्रदेशातील अमेठीच्या जागेवर सगळ्यांच लक्ष आहे. भाजपाकडून विद्यमान खासदार स्मृती इराणी रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा आघाडीवर आहेत. स्मृती इराणी 39 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 11:33 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : देशात भाजपा एकूण किती जागांवर? काँग्रेस किती जागांवर आघाडीवर?

    मतमोजणी सुरु असून भाजपाला देशभरात मोठा फटका बसताना दिसतोय. भाजपा देशात 242 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 10:51 AM (IST)

    Karnataka Lok sabha Election Result 2024 : कर्नाटकात भाजपा प्रणीत NDA ला आघाडी

    कर्नाटकात भाजपाप्रणीत एनडीए 21 आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी 7 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 10:49 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : राजस्थानात भाजपाला फटका

    राजस्थानात भाजपाला फटका बसतोय. 25 पैकी भाजपाला 13 आणि इंडिया आघाडी12 जागांवर आघाडीवर आहे. मागच्या दोन टर्ममध्ये भाजपाने या राज्यात पैकीच्या पैकी जागा मिळवल्या होत्याय

  • 04 Jun 2024 10:16 AM (IST)

    Varanasi Loksabha Election Result 2024 : वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांची मोठी आघाडी

    सुरुवातीला 6,300 मतांनी पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते. नंतर 436 मतांची आघाडी. आता पंतप्रधान मोदींनी थेट 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांच आव्हान आहे.

  • 04 Jun 2024 10:03 AM (IST)

    Varanasi Loksabha Election Result 2024 : वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी आघाडीवर

    सर्वात मोठी बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी चौथ्या फेरीनंतर पुन्हा आघाडीवर आले आहेत. आधी मोदी 6,300 पिछाडीवर होते. आहेत. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर होते. आता मोदी फक्त 436 मतांनी आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 09:38 AM (IST)

    Raebareli Loksabha Election Result 2024 : राहुल गांधी दोन्ही मतदारसंघात आघाडीवर

    उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 09:34 AM (IST)

    Varanasi Loksabha Election Result 2024 : वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर

    सर्वात मोठी बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर आहे. 6,300 मतांनी मोदी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 09:19 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 200 च्या पुढे

    भाजपाने सुरुवातीच्या कलांमध्ये घेतलेली आघाडी घसरली आहे. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 200 जागांचा टप्पा ओलांडला आहे. भाजपा प्रणीत एनडीएकडे 275 जागा आहेत.

  • 04 Jun 2024 09:15 AM (IST)

    Uttar pradesh Lok sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात काँटे की टक्कर

    उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. इंडिया आघाडी यावेळी भाजपाला काँटे की टक्कर देताना दिसतेय. भाजपा 41 तर सपा-काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 09:12 AM (IST)

    Madhya Pradesh Lok sabha Election Result 2024 : मध्य प्रदेशमध्ये कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

    मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 29 जागा आहेत. त्यात भाजपा 26 तर, काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 09:08 AM (IST)

    Meerut Lok sabha Election Result 2024 : सीरीयलमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल पिछाडीवर

    सीरीयलमधील प्रभू रामचंद्राच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अरुण गोविल पिछाडीवर आहेत. त्यांना भाजपाने मेरठमधून तिकीट दिलं होतं.

  • 04 Jun 2024 09:03 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : पहिल्या तासाभरात भाजपाची ट्रिपल सेंच्युरी

    पहिल्या तासाभराच्या मतमोजणीमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाप्रणीत NDA 300 पेक्षा जास्ता जागांवर आघाडीवर आहे. तेच काँग्रेस प्रणीत INDIA 161 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 08:39 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : भाजपाप्रणीत NDA ची डबल सेंच्युरी

    मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासातच भाजपाप्रणीत NDA ने डबल सेंच्युरी मारली आहे. एनडीए 267 जागांवर इंडिया आघाडी 118 जागांवर आघाडीवर आहे. अन्य 15 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:34 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : मंडीमधून कंगना रणौत आघाडी की पिछाडीवर?

    हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रणौत आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:24 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : मतमोजणीला सुरुवात होताच NDA सुसाट

    मतमोजणीला सुरुवात झाली आहे. NDA ला मोठी आघाडी मिळाली. भाजपाप्रणीत NDA 155 तर काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 70 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 08:13 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : मतमोजणीला सुरुवात होताच NDA ची मोठी झेप

    मतमोजणीला सुरुवात होताच NDA ला मोठी आघाडी मिळाली. भाजपाप्रणीत NDA 85 तर काँग्रेसप्रणीत इंडिया 30 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 08:06 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : निकालाचा पहिला कल आला समोर

    पहिला कल हाती एनडीए 20 आणि इंडिया आघाडी 8 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणाच्या रोहतकमधून काँग्रेस आघाडीवर.

  • 04 Jun 2024 08:03 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : पीएम मोदी रोड शो करणार नाहीत

    पीएम मोदी रोड शो करणार नाहीत. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार. भाजपच्या विस्तार कार्यालयात विजयोत्सव होणार. सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान भाजपच्या विस्तार कार्यालयात पोहोचतील

  • 04 Jun 2024 07:19 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : ‘आजचा दिवस खूप मोठा आहे’

    “आजचा दिवस खूप मोठा आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, तर दिल्ली आणि संपूर्ण देशासाठी. लोकांनी जे मतदान केलं, त्याचा निकाल आज येईल. मागच्या 10 वर्षात आम्ही जे काम केलं, त्यासाठी लोक आम्हाला आशिर्वाद देतील अशी अपेक्षा आहे” असं पश्चिम दिल्लीतील भाजपाच्या उमेदवार कमलाजीत सेहरावत म्हणाल्या.

  • 04 Jun 2024 06:29 AM (IST)

    Lok Sabha Election Results 2024 Live Updates: एनडीए की इंडिया, काही तासांत स्पष्ट होणार

    लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आता ८ वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. एनडीए की इंडिया आघाडी याचा फैसला आज होणार आहे.

  • 03 Jun 2024 11:00 PM (IST)

    Lok Sabha Election Result: आणखी एका सर्व्हेत ‘एनडीए’ला 397 जागा

    एग्झिट पोलमधील सर्व संस्थांनी एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा दाखवल्या. त्यानंतर आणखी एक सर्व्हे आला आहे. त्यात ‘एनडीए’ला 397 जागा दाखवल्या आहेत. ‘आज तक’ या वृत्त वाहिनीचा हा ई-सर्व्हे आहे.

  • 03 Jun 2024 08:55 PM (IST)

    Lok Sabha election result 2024: इंडिया आघाडीची मंगळवारी बैठक

    काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मंगळवारी रात्री दिल्लीत थांबण्याचे म्हटले आहे. निकालानंतर इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत निकालानंतर पर्यायांवर चर्चा करण्यात येणार आहे.

  • 03 Jun 2024 08:02 PM (IST)

    Lok Sabha Election Result 2024: काँग्रेसकडून हेल्पलाईन

    मतमोजणीत काही गडबड झाल्यास काँग्रेसने हेल्पलाईन जारी केली आहे. त्या हेल्पलाईनवर त्वरीत व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन केले आहे. +91 7982839236 या क्रमांकावर व्हिडिओ पाठवण्यासंदर्भात पत्र काँग्रेसने काढले आहे.

  • 03 Jun 2024 06:35 PM (IST)

    election result 2024: निवडणूक निकालापूर्वी दिल्लीत वेगवान घडामोडी

    लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालापूर्वी आणि एक्झिट पोलनंतर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच ते आज गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत.

  • 03 Jun 2024 05:00 PM (IST)

    lok sabh election result 2024: विदेशात काही सुरु आहे चर्चा

    इंग्लंडमधील ‘द गार्डियन’ ने सोमवार, 3 जून रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले आहे की, भारतात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचे मतदान संपले आहे. एक्झिट पोल पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक तिसऱ्यांदा विजयी होतील असा अंदाज वर्तवला गेला आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी निवडणूक झाली आहे.

  • 03 Jun 2024 04:00 PM (IST)

    lok sabh election result 2024: एग्झिट पोलनंतर शेअर बाजार दमदार

    एक्झिट पोलच्या निकालात एनडीएच्या दणदणीत विजयाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार आज विक्रमी उच्चांकावर उघडला. सेन्सेक्स 2700 हून अधिक अंकांनी वाढला तर निफ्टी 800 अंकांनी वाढला, ज्यामुळे सेन्सेक्स विक्रमी 76,738.89 स्तरावर उघडला आणि निफ्टी 23,338.70 पातळीवर उघडला.

  • 03 Jun 2024 02:59 PM (IST)

    Lok sabha Election Results 2024: मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरु होणार

    लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. या निवडणूक निकालाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट ‘टीव्ही ९ मराठी’ आणि https://www.tv9marathi.com/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

Published On - Jun 04,2024 1:56 AM

Follow us
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.