Trust Of the Nation… टीव्ही9 नेटवर्क आणि डेलीहंटचा सर्वात मोठा निवडणूक सर्व्हे
देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या निवडणुकीबाबत सर्वासमान्य जनता नेमका काय विचार करते? याबाबत देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क टीव्ही 9 आणि न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म डेलीहंट एकत्र मिळून एक सर्वात मोठा सर्व्हे करत आहेत. आपण देखील या सर्व्हेत सहभागी होऊ शकता.
देशात सर्वात मोठ्या 18व्या लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 97 कोटी नागरीक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
देशाचं सर्वात मोठं न्यूज नेटवर्क टीव्ही9 न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म डेलीहंटसोबत मिळून Trust Of the Nation सर्व्हे करत आहेत. या सर्व्हेत देशभरातील नागरीक सहभागी होत आहेत. तुम्हीदेखील यामध्ये सहभागी होऊ शकता. खाली या सर्व्हेत काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर क्लिक करुन आपण आपलं उत्तर देऊ शकता.
देशभरात मतदान कधी-कधी होणार?
येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. तर देशभरात एकूण 102 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 26 एप्रिलला होईल. या दिवशी लोकसभेच्या 89 जागांवर मतदान पार पडेल. तिसरा टप्पा 7 मे ला असणार आहे. या दिवशी 94 जागांवर मतदान होईल. चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे ला होईल. या दिवशी 96 जागांवर मतदान होईल. पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे ला होईल. या दिवशी 49 जागांवर मतदान होईल. सहाव्या टप्प्यातील मतदान 24 मे ला होईल. यावेळी 57 जागांवर मतदान होईल. तर अंतिम टप्प्यातील मतदान हे 1 जूनला होईल. या दिवशी 57 जागांवर मतदान पार पडेल.
निवडणुकीत मुद्दे काय आहेत?
लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची, प्रत्येकवेळी कुठला ना कुठला मुद्दा असतो. जसं की, 1977 मध्ये आणीबाणीचा मुद्दा होता, 1989 मध्ये बोफोर्स हा निवडणुकीचा मुद्दा होता. तशाच प्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने विकास किंवा विकसित भारत हा मुद्दा बनवला आहे. तर विरोधकांनी संविधान किंवा लोकशाही वाचवण्याचा नारा दिला आहे.
डेलीहंट काय आहे?
डेलीहंट हे बातम्या, मनोरंजन आणि व्हिडीओचा देशातील सर्वात मोठा एग्रीगेटर अॅप आहे. या प्लॅटफॉर्मला 350 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हे अॅप देशातील 15 प्रमुख भाषांमध्ये बातम्या प्रसारीत करतं. या अॅपचं मुख्यालय बंगळुरुत आहे.
टीव्ही9 काय आहे?
टीव्ही9 देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क आहे. टीव्ही9 नेटवर्क मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसोबतच बांग्ला, तेलगू, तमिळ, पंजाबी आणि गुजराती भाषेत बातम्या आणि व्हिडीओ सेवा प्रदान करतं. देशभरातील कोट्यवधी नागरीक टीव्ही9 च्या बातम्यांवर विश्वास ठेवतात.