Loksabha election 2024 : कोण असेल नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी?

Lok sabha election 2024 : कोण असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा स्पर्धक. जो मोदींच्या खुर्चीला देऊ शकतो आव्हान. कोणाचं नाव सर्वाधिक चर्चेत.?

Loksabha election 2024 : कोण असेल नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 7:58 PM

मुंबई : देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक सर्व्हमधून समोर आला आहे. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठा चेहरा असतील. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्चस्व कमी झालेलं नाही. पण पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे राजकीय प्रतिस्पर्धी कोण असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. लोकसभा निवडणुकीला ( Lok Sabha Election 2024 ) आता काही महिने उरले आहेत. भाजपकडून तयारी सुरु झालीये, पण विरोधीपक्ष मोदींची ( Narendra Modi ) सत्ता खाली खेचण्यासाठी काय करते याकडे लक्ष लागलं आहे. भाजपला ( BJP ) पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते एकत्र येत असले तरी मुख्य चेहरा कोण असेल याबाबत अजूनही काहीही स्पष्ट नाही. त्यामुळे मोदींचा खरा प्रतिस्पर्धी कोण याबाबत शंका आहे.

2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींना टक्कर देणारा नेता विरोधी पक्षाला हवा आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी अडचणी निर्माण करणारा विरोधी पक्षातील तो नेता कोण असेल असं जनतेला विचारलं असता त्यांनी यावर वेगवेगळी प्रतिक्रिया दिली.

इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना 24 टक्के लोकांनी ते विरोधी पक्षाचे सर्वोत्तम नेते असल्याचे मान्य केले आहे. यानंतर ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) 20 टक्के, राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना केवळ 13 टक्के मते मिळाली, तर नवीन पटनायक ( Naveen Patnayak ) यांना 5 टक्के मते मिळाली. पण मोदी तिसर्‍या टर्मसाठी सज्ज झाले आहेत. कारण त्यांना सर्वेक्षणात 53 टक्के लोकांनी पुन्हा मोदी हेच पुढचे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.

2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्ष मोदींना आव्हान देण्यात अपयशी ठरले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमधून देखील विरोधक बिथरलेले दिसले. प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करत आहेत. प्रत्येक जण आपलाच नेता पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे विरोधीपक्षाची मुठ बांधली जाणं अशक्य दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर लढवली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ते राष्ट्रीय नेते म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आणि २०२४ साठी ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत.

सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi ) यांनी सत्ता मिळवली आहे. त्यामुळे येथे भाजपला टक्कर देणे विरोधी पक्षांना अवघड जाणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने महाराष्ट्रात देखील विरोधीपक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बिहारमध्ये जेडी(यू)ने भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली आहे. पण तरी देखील नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांच्यापुढील आव्हान काही कमी झालेलं नाही. भाजप त्यांना येथे कडवी टक्कर देताना दिसत आहे.

लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी महाराष्ट्रात ४८ आणि बिहारमध्ये ४० जागा आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांसाठी दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याशिवाय देशात किमान 10 पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. ममता बॅनर्जी स्वतःला पंतप्रधानपदाच्या दावेदार समजतात. कॉंग्रेस आणि डाव्यांना त्यांच्यासमोर कमी समजतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान मोदींचे मोठे प्रतिस्पर्धी समजतात. 2018 पासून, राव राष्ट्रीय स्तरावर प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत.

आता या शर्यतीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केजरीवाल 2015 पासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीनंतर पंजाबमध्ये ‘आप’चं सरकार आल्यानंतर ते देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत दावेदार बनलेत. यानंतर येतात ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर ते देखील आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात देखील रस्सीखेच कमी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार ( Sharad Pawar )यांचे नाव देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिले आहे. दुसरीकडे आता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे देखील पंतप्रधान मोदींना टक्कर देतील असं वक्तव्य ठाकरे गटाकडून होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे राष्ट्रीय राजकारणात यावे अशी आमची इच्छा आहे आम्ही त्यांना त्याबाबत त्यांना सांगितले असून त्याबाबत ते लवकरच निर्णय घेतील असं सांगत संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.