Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माढा लोकसभा मतदारसंघ : शरद पवार यांची खेळी यशस्वी, धैर्यशील मोहिते पाटलांची वाटचाल विजयाकडे

देशाच्या सर्वात मोठ्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक गोष्टी नव्याने बघायला मिळाल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच तब्बल पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक बघायला मिळाली. तसेच अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ तर संपूर्ण निवडणुकीच्या काळात प्रचंड चर्चेचा ठरला.

माढा लोकसभा मतदारसंघ : शरद पवार यांची खेळी यशस्वी, धैर्यशील मोहिते पाटलांची वाटचाल विजयाकडे
धैर्यशील मोहिते पाटील की रणजितसिंह नाईक निंबाळकर, कौल कुणाला?
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 4:24 PM

माढा लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर होताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळपासून आघाडीवर आहेत. नुकतंच मतमोजणीच्या आलेल्या माहितीनुसार, धैर्यशील मोहिते पाटील यांनी हजारो मतांनी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसताना दिसतोय. कारण महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील सोळाव्या फेरीअखेर 65 हजार 994 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणी जसजशी अंतिम टप्प्यात जाईल तसतशी चुरस वाढण्याची शक्यता आहे. आता अंतिम निकाल काय येतो? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक चर्चेचा ठरला. या मतदारसंघात तशा नाट्यमय घडामोडीदेखील घडल्या. या मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु होती. भाजपमधील धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी अनेकदा आपली इच्छा व्यक्तदेखील करुन दाखवली होती. असं असलं तरी माढाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. दोन्ही नेत्यांचा विचार करता भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि इथेच ठिणगी पडली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील गट नाराज झाला. धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी महागात पडू शकते, याची जाणीव भाजपला होती. त्यामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांनी अकलूजला जावून मोहिते पोटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले नेते गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. पण तरीही धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी दूर झाली नाही.

धैर्यशील मोहिते पाटील एकीकडे बैठकांवर बैठका घेत होते. दुसरीकडे भाजपकडून त्यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते. भाजपने माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली नाही त्यामुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना अधिकृतपणे माढ्याची उमेदवारी दिली. मोहिते पाटील हे माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार झाले. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व आलं. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात बोलताना दिसले. त्यामुळे माढ्याच्या निवडणुकीला जास्त रंगत आली.

विशेष म्हणजे या सर्व नाट्यमय घडामोडींदरम्यान आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार करणारे शरद पवार गटाचे पंढरपूरमधील विश्वासून नेते अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी भाजपात प्रवेश केला. या घडामोडमुळे माढ्यातली टक्कर जास्त काँटे की ठरली. कारण अभिजीत पाटील हे पंढरपुरातील बडे प्रस्थ आहेत. त्यांचा समर्थकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मोहिते पाटलांना याचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. या दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळाली. अखेर आता निकाल समोर येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, माढ्यात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे. आता मतमोजणीनंतर खरा विजेता कोण असेल? ते स्पष्ट होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय?

माढा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोनदा, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकदा विजय मिळवला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, 2014 मध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजित नाईक-निंबाळकर येथून खासदार म्हणून निवडून आले. हा मतदार संघ 2008 साली अस्तित्वात आला आहे. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या विधानसभा एकत्र करून महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीतही या जागेवरची लढत चुरशीची ठरली होती. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर 85,764 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5,86,314 मते मिळाली होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना 5,00,550 मते मिळाली होती.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.