Eknath Shinde : लोकसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पराभवाबद्दल काय म्हणाले?

Eknath Shinde : "ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच ठाण्यावर प्रेम होतं. जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरनन प्रतिसाद दिला" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.

Eknath Shinde :  लोकसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पराभवाबद्दल काय म्हणाले?
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 5:14 PM

लोकसभा निवडणूक निकालाच चित्र आता स्पष्ट झालय. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 290 पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. महाविकास आघाडीने बाजी मारलीय. निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. “सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखापेक्षा जास्तीच मताधिक्क्य मिळालं आहे. त्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच अभिनंदन करतो. ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच ठाण्यावर प्रेम होतं. जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरनन प्रतिसाद दिला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.

“ठाण्याचा किल्ला अबाधित ठेवला. ठाणेकरांनी विकासाला मतदान केलं. गेली अनेक वर्ष ठाण्यात झालेली विकासकाम. मी आपल्याला हे सुद्धा सांगेन राज्य सरकारची दोन वर्षातली काम आणि मोदी सरकारच्या 10 वर्षातली विकासकाम याची देखील पोचपावती विजयामध्ये आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा प्रचार झाला, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली. ठाणेकरांनी कार्यक्रम केलेला आहे. नरेश म्हस्के विजयी झाले त्यांच मनापासून अभिनंदन”

‘मोदींना तडीपार करायची भाषा करत होते’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष म्हणून सोबत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार बनेल” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. “इंडिया आघाडीला एकाद्वेषाने पछाडलेल होतं. मोदींना तडीपार करायची भाषा करत होते. पण या देशातील जनतेने विकासाला मतदान केलं. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवाची काय कारण सांगितली?

राज्यात महायुतीचा पराभव का झाला? त्याचही विश्लेषण केलं. “राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. त्यांचा अपप्रचार, गैरसमज दूर करण्यात कमी पडलो. त्यांचा संभ्रम दूर करु. अपप्रचार, गैरसमज दूर करण्यात कमी पडलो, ज्यांनी मतपेटीच राजकारण केलय, त्यांना सांगू इच्छितो हे राजकारण कधी टिकत नाही. त्यांचा खरा चेहरा दिसून येईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 15 जागा लढवल्या, पण कमी जागांवर विजय मिळाला, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “काही जागा अतिशय कमी मतांनी गेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशीर झाला हे देखील कारण असू शकतं. ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करु”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.