Maharashtra Final Exit Poll 2024 LIVE : एक्झिट पोलनुसार महाराष्ट्राचा निकाल काय असेल? एकदा नजर मारा
Maharashtra Exit Poll 2024 LS Election Results LIVE News in Marathi : आज शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कोणाला आहे? मविआ की, महायुतीला? जाणून घ्या एक्झिट पोलमधून.
देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा टप्पा आहे. एकूण सात टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होणार आहेत. त्याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. कारण एक्झिट पोलच्या आकड्यांमधून जनमताचा कौल कोणाला मिळालाय? भाजपाप्रणीत NDA की, काँग्रेसप्रणीत INDIA ते समजेल. त्यामुळे 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी चित्र कसं असेल? त्याचा साधारण अंदाज येईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत? याकडे राजकीय नेत्यांच, जाणकारांच, विश्लेषकांच लक्ष असतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक्झिट पोलचे आकडे काय आहेत? याकडे राज्यातील तमाम जनतेच लक्ष लागलं आहे.
याआधी मागच्या दोन टर्ममध्ये महाराष्ट्राने भाजपाप्रणीत NDA ला भरभरुन दिलय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महायुतीने महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. पण यावेळी अशी स्थिती नाहीय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी गटात सहभागी झाले. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेससोबत विरोधी बाकावर म्हणजे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्राचा कौल कोणाला आहे? याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
उत्तर महाराष्ट्रातून कोण आघाडीवर
नंदुरबारमधून भाजपच्या डॉ. हिना गावित आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी पिछाडीवर आहेत.
धुळे मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव पिछाडीवर आहेत.
जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पिछाडीवर आहेत.
रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत. तर श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत.
दिंडोरीमधून भाजपच्या डॉ. भारती पवार पिछाडीवर आहेत. पवार गटाचे भास्करराव भगरे आघाडीवर आहेत.
-
South Mumbai Exit Poll 2024 : दक्षिण मुंबईत कोण बाजी मारणार? अरविंद सावंत की यामिनी जाधव?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.
-
-
Vardha Exit Poll 2024 : वर्ध्यातून भाजपाचे रामदस तडस आघाडीवर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपाचे रामदस तडस आघाडीवर आहेत. शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर आहेत.
-
Ramtek Exit Poll 2024 : विदर्भात शिवसेना शिंदे गटाला या जागेवर फायदा होऊ शकतो
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे श्याकुमार बर्वे पिछाडीवर आहेत.
-
South central Mumbai Exit Poll 2024 : मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचा हा उमेदवार बाजी मारणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर असून ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत.
-
-
Yavatmal Exit poll 2024 : यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाला बसू शकतो धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत.
-
Chhatrapati sambhaji nagar Exit poll 2024 : चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे? कौल कोणाला?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संदीपमान भुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत.
-
Maval Exit Poll 2024 : अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात काय होणार ?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार शिरुरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार अढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
-
Maval Exit Poll 2024 : मावळचा एक्झिट पोल काय?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पिछाडीवर आहेत.
-
Pune Exit Poll 2024 : पुण्याच्या एक्झिट पोलचा अंदाज काय?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. काँग्रेस मविआचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत.
-
Raigad Exit Poll 2024 : सुनील तटकरे पिछाडीवर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पिछाडीवर आहेत.
-
Dhule Exit Poll 2024 : धुळ्यात महायुती की मविआ कोण सरस?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार धुळ्यात भाजपाचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर आहेत.
-
Jalgaon Exit Poll 2024 : जळगावात ठाकरे गटाला धक्का का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जळगाव भाजपाच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत. ठाकरे गट मविआचे उमेदवार करण पवार पिछाडीवर आहेच.
-
Kalyan Exit Poll 2024 : कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा जिंकणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे. मविआ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर पिछाडीवर आहेत.
-
Dindori Exit Poll 2024 : दिंडोरीमध्ये भाजपाला धक्का बसणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीमध्ये मविआ शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. तेच मंत्रीपद भूषवणाऱ्या महायुती भाजपाच्या उमेदवार भारती पवार पिछाडीवर आहेत.
-
Nashik Exit Poll 2024 : नाशिकचा एक्झिट पोल काय सांगतो?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नाशिकमधून धक्कादायक निकाल येत आहे. राजाभाऊ वाजे आघाडीवर असून हेमंत गोडसे यांना फटका बसू शकतो.
-
Chankya Maharashtra exit poll 2024 : महाराष्ट्राबाबत चाणक्यचा एक्झिट पोल मविआसाठी धक्कादायक
न्यूज 24 चाणक्यच्या पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 33 जागा तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळतील असा अंदाज आहे.
-
Nanded Exit Poll 2024 : नांदेडमध्ये कमळ फुलणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नांदेडमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे वसंत चव्हाण पिछाडीवर आहेत.
-
Parbhani Exit Poll 2024 : होम पीचवर ठाण्यात मुख्यमंत्र्यांना बसू शकतो धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे नरेश म्हस्के पिछाडीवर आहेत. प्रत्यक्ष 4 जूनला असाच निकाल आला, तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल.
-
Parbhani Exit Poll 2024 : परभणीत महादेव जानकरांना धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार परभणीमध्ये ठाकरे गटाचे मविआचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर. महायुतीचे रासपचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत.
-
ABP CVoter Exit Poll 2024 : महाराष्ट्राबाबत सीवोटर एक्झिट पोलचे आकडे वेगळे
सीवोटर एक्झिट पोलनुसार महायुतीला 22 ते 26 आणि मविआला 23 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाचा 45 जागांच स्वप्न अधुर राहणार. भाजपा 17, शिंदे गट 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे. उद्धव ठाकरे गटाला 9 काँग्रेस 8, शरद पवार गट 6 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
-
ABP News Exit poll 2024 : NDA 91-107 And INDIA – 92-117
एबीपी न्यूज एक्झिट पोल 2024 नूसार एनडीएला 91 ते 107 इतक्या कमी जागा दाखविल्या आहेत. तर इंडियाला 92 ते 117 जागा मिळतील असा अंदाज दर्शवण्यात आला आहे.
ABP News Exit poll 2024 : NDA 91-107 And INDIA – 92-117
-
Nagpur Exit Poll 2024 : नागपूरमधून नितीन गडकरी हॅट्ट्रिक करणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नागपूरमधून भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर आहेत.
-
Satara Exit Poll 2024 : साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याच दिसत आहे.
-
Baramati Exit Poll 2024 : बारामतीमध्ये अजित पवार यांना धक्का बसू शकतो
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये अजित पवार यांना धक्का बसू शकतो. शरद पवार गटाच्या मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
-
Mumbai North West Exit Poll 2024 : अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर कोण आघाडीवर?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत. रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत. एक्झिट पोल फक्त अंदाज आहे, निकाल नव्हे. म्हणून आम्ही आघाडी, पिछाडी म्हणत आहोत.
-
Tamil Nadu exit poll 2024 – NDA 5 And INDIA – 35
तामिळनाडूत इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 पोल स्ट्राट एक्झिट पोल नुसार दाखविल्या आहेत. तर एनडीएला कमी जागा दाखविल्या आहेत. Tamil Nadu exit poll 2024 – NDA 5 And INDIA – 35
-
Sindhudurg Exit Poll 2024 : सिंधुदुर्गात नारायण राणे बाजी मारणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सिंधुदुर्गात भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. ठाकरे गट मविआचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर आहेत.
-
Solapur Exit Poll 2024 : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे की, राम सातपुते? जाणून घ्या
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते पिछाडीवर आहेत.
-
Madha Exit Poll 2024 : एक्झिट पोलनुसार माढ्यात कोण मारणार बाजी?
माढ्यातून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. महायुती भाजपाचे उमदेवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत.
-
Allinace Party Wise Maharashtra Exit Poll 2024 : एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात कुठला पक्ष किती जागा जिंकणार?
भाजपा – 18
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – ००
काँग्रेस – 05
ठाकरे गट – 14
पवार गट – 6
-
North Central Mumbai Exit Poll 2024 : उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस उमेदवार आघाडीवर
उत्तर मध्य मुंबईतून TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. भाजपाचे उज्वल निकम पिछाडीवर जाताना दिसत आहेत.
-
Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? एक्जिट पोलचा फायनल आकडा समोर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्षाला एक जागा मिळू शकते.
-
Chandrapur Exit Poll 2024 : चंद्रपूरमध्ये एक्झिट पोल धक्कादायक
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार चंद्रपूरमध्ये मविआच्या उमेदवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. भाजपाचे सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर आहेत. एक्झिट पोल फक्त अंदाज निकाल नव्हे. म्हणून आम्ही आघाडी, पिछाडी म्हणत आहोत.
-
Kolhapur Exit Poll 2024 : कोल्हापुरमध्ये मविआ मारणार बाजी
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापुरमध्ये शाहू महाराज छत्रपती आघाडीवर आहेत. संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. शाहू महाराज छत्रपती मविआचे उमेदवार आहेत तर संजय मंडलिक महायुतीकडून मैदानात आहेत.
-
Ahmednagar Exit Poll 2024 : अहमदनगरच्या एक्झिट पोलनुसार कोण आघाडीवर ?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. डॉ. सुजय विखे पाटील महायुतीकडून भाजपाचे उमेदवार आहेत.
-
Beed Exit Poll 2024 : पहिला एक्झिट पोल समोर बीडचा कौल कुणाला?
बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर असतील. बजंरग सोनावणे पिछाडीवर आहेत. सोनावणे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.
-
Maharashtra Exit Poll : महाराष्ट्राचा आकडा चकीत करणारा, थोड्याच वेळात TV9 मराठीवर
एक्झिट पोल संदर्भात महाराष्ट्राचा आकडा चकीत करणारा आहे. थोड्याच वेळात TV9 मराठीवर हे आकडे जाहीर होतील. एक्झिट पोल फक्त अंदाज निकाल नव्हे. महाराष्ट्राचा पारदर्शक tv9 पोलस्ट्राटचा सर्व्हे.
-
Exit Poll 2024 : मुंबईत 6 पैकी कोण किती जागा जिंकणार? ? पक्षाच्या प्रवक्त्यांचे आकडे काय?
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईत महायुती 6 च्या सहा जागा जिंकणार असा दावा केलाय.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी 6 पैकी 4 जागा ठाकरे गट आणि एक जागा काँग्रेस जिंकेल असा दावा केलाय.
मुंबईत सहापैकी 5 जागा महायुती जिंकेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय.
-
Exit Poll 2024 : केंद्रात बहुमतासाठी किती जागा हव्या?
केंद्रात सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 272 आहे. जर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा करत असेल, तर केंद्रात मग काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच सरकार येईल.
-
Exit Poll 2024 : एक्जिट पोलआधीच इंडिया आघाडीने सांगितलं किती जागा जिंकणार?
भाजपा आणि त्यांचे सहकारी एक्झिट पोलवर खूप चर्चा करतील. लोकांमध्ये गोंधळ होऊ नये, म्हणून सत्य सांगायचय. इंडिया आघाडी कमीत कमी 295 जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
#WATCH | Delhi: After the INDIA alliance leaders meet, Congress National President Mallikarjun Kharge says, “… INDIA Alliance will win at least 295 seats.” pic.twitter.com/ROy2n1EnOa
— ANI (@ANI) June 1, 2024
-
Maharashtra Exit Poll 2024 : संजय शिरसाट यांनी सांगितला महाराष्ट्रातला आकडा
उठाव केल्यानंतरची महाराष्ट्रातील ही पहिली निवडणूक आहे. महायुतीच वादळ महाराष्ट्रात होतं, त्यानुसार आम्ही केलेला प्रचारानुसार असं वाटत आम्ही 40 पार जाऊ. शिवसेनेला 13 जागा मिळतील. भाजपाने 400 पारचा नारा दिलाय त्याच्या जवळपास पोहोचू असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले.
-
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
एक्झिट पोल यायला काही तास उरले असताना प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी नवीन अंदाज काय वर्तवलाय त्याबद्दल इथे क्लिक करा.
-
Maharashtra Exit Poll 2024 : ज्योतीष अनिल थत्ते यांची महाराष्ट्रातील निकालाबद्दल भविष्यवाणी काय?
प्रसिद्ध ज्योतीष अनिल थत्ते यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की, महायुती कोणाला जास्त जागा मिळणार? अनिल थत्ते यांची भविष्यवाणी काय? इथे क्लिक करुन जाणून घ्या.
-
Ahmednagar Exit Poll 2024 : एक्झिट पोलआधीच निलेश लंकेंचा मोठा दावा
एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्याआधीच अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केलाय. त्यांचा सामना भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी आहे. निलेश लंके यांनी किती लाख मतांनी जिंकणार याबद्दल जो दावा केलाय, तो इथे क्लिक करुन जाणून घ्या.
-
Maharashtra Exit Poll 2024 : थोड्याचवेळात समोर येणार महाराष्ट्राचा एक्झिट पोल
महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचे आकडे थोड्याचवेळात समोर येणार आहेत. शेवटच्या टप्प्याच मतदान आज संपेल. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होऊ लागतील.
Published On - Jun 01,2024 4:22 PM