Maharashtra Mumbai Ghatkopar News LIVE : खेड आंबेगाव शिरुर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

| Updated on: May 15, 2024 | 9:47 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Mumbai Ghatkopar News LIVE :  खेड आंबेगाव शिरुर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह एकूण 96 जागांसाठी आज मतदान सुरु झालं आहे. चौथ्या टप्प्यात 8.73 कोटी महिलांसह 17.70 कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानासाठी 1.92 लाख मतदान केंद्रावर 19 लाखापेक्षा जास्त मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. आज तेलंगणमधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 17 जागा, आंध्र प्रदेशमधील 25, उत्तर प्रदेशातील 13, बिहारमधील 5, झारखंडच्या 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओदिशाच्या चार, पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेवर मतदान होत आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा आणि ओदिशाच्या 28 विधानसभा जागांसाठी मतदान संपन्न होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 May 2024 07:52 PM (IST)

    नाशिकमध्ये ठाकरे गटाचे 5 शिवसैनिक नजरकैद

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे शिवसैनिक उद्या मोदींच्या सभेत जाब विचारणार होते.  मोदींची सभा होण्याअगोदरच पोलिसांकडून पाच जण नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या शिवसैनिकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

  • 14 May 2024 07:32 PM (IST)

    शरद पवारांकडून घाटकोपरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी

    शरद पवार यांनी घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळी काय-काय घडलं आणि सध्या स्थितीत काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी शरद पवार हे घटनास्थळी दाखल झाले.

  • 14 May 2024 06:52 PM (IST)

    भाजपला 230 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत: केजरीवाल

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशातील परिस्थिती त्यांच्या (भाजप) विरोधात जात आहे. हरियाणा, राजस्थानमध्ये त्यांचा पराभव होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि पंजाबमध्ये त्यांच्या जागा कमी होत आहेत. ते 400 च्या पुढे म्हणत आहेत, पण 230 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत हे मी लेखी देतो.

  • 14 May 2024 06:37 PM (IST)

    ही निवडणूक म्हणजे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचा संकल्पाचा प्रवास : नड्डा

    ही निवडणूक केवळ स्मृती इराणी यांना खासदार करण्यासाठी नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अमेठीत म्हटले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांना खासदार करून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचा संकल्पाचा प्रवास ही निवडणूक आहे.

  • 14 May 2024 06:25 PM (IST)

    काँग्रेसच्या कमकुवत सरकारांनी देशाला नक्षलवादाच्या आगीत ढकलले: पंतप्रधान मोदी

    झारखंडमधील कोडरमा येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या कमकुवत सरकारांनी देशाला नक्षलवादाच्या आगीत ढकलले. या आगीत डाव्यांनीही आपली भाकरी भाजली. देशातील नक्षलवादी हिंसाचाराला आळा घालणारे हे भाजप सरकार आहे.

  • 14 May 2024 06:10 PM (IST)

    पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर आमच्याकडेही आहेः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी येथे जाहीर सभा घेतली. काही लोक म्हणतात पाकिस्तानविरुद्ध बोलू नका, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, आमच्याकडेही आहे. तुम्ही 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत पाहिला असेल. पूर्वी इथे दंगल व्हायची आणि गरीब भुकेने मरायचे. आज भारताचे नाव जगभरात प्रसिद्ध होत आहे.

  • 14 May 2024 05:32 PM (IST)

    विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पाऊसाला सुरुवात

    खेड आंबेगाव शिरुर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी आवकाळी पाऊसाने हजेरी लागली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे उन्हाळी बाजरीसह जनावरांच्या खाद्य पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचं संकट दुर होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  • 14 May 2024 05:00 PM (IST)

    घाटकोपरमधील रोड शोचा मार्ग बदलणार?

    मुंबईतील घाटकोपर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या रोड शो पार पडणार आहे. या रोड शोचे नियोजन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलुंड येथील कालिदास सभागृहात भाजप पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर रोड शो च्या मार्गात बदल होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

  • 14 May 2024 04:50 PM (IST)

    बीडमध्ये अनेक भागात बुथ कॅप्चरिंग- बजरंग सोनावणे

    बीडमध्ये अनेक भागात बुथ कॅप्चरिंग झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केला. परळीत हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला. बीडचे अधिकारी, कर्मचारी घरगड्यासारखे काम करत असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांनी कुठलीच दखल न घेतल्याचा आरोप केला. 19 गावात फेर मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली.

  • 14 May 2024 04:40 PM (IST)

    मुंबईतील अवैध होर्डिंगसाठी वृक्षांची कत्तल

    मुंबईतील घाटकोपर येथील या अवैध होर्डिंगसाठी आजुबाजूच्या 8 झाडांची अमानुष पद्धतीने कत्तल करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार, या झाडांना विषारी इंजेक्शन टोचण्यात आले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात याची माहिती देण्यात आली आहे.

  • 14 May 2024 04:30 PM (IST)

    ठाकरे गटाला पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र

    ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इगतपुरीत ठाकरे गटाला खिंडार पडले. आज इगतपुरी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केला.

  • 14 May 2024 04:20 PM (IST)

    पीयूष गोयल यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

    काँग्रेस सरकारने कायम मध्यमवर्गीयांची पिळवणूक करण्याचे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम निम्न आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले. पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे या दोन्ही वर्गाला समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.

  • 14 May 2024 04:10 PM (IST)

    दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचे सत्र

    दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्ब धमकीचे सत्र सुरु झाले. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील अनेक शाळा, महाविद्यालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल आले होते. त्यावेळी एकच खळबळ माजली होती. आता बड्या रुग्णालयांना टार्गेट करण्यात आले आहे…

  • 14 May 2024 04:00 PM (IST)

    उद्धव ठाकरे पालघरमध्ये

    पालघर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघरमध्ये दाखल झाले आहेत. वसई येथील वायएमसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होत आहे.

  • 14 May 2024 03:42 PM (IST)

    दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयात आग

    नवी दिल्ली : दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयात आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 14 May 2024 03:36 PM (IST)

    नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा फटका

    नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोवाड आणि परिसरात जोरदार पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याने संत्रा आणि आंब्याच्या पिकाचे होणार नुकसान. सततच्या अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

  • 14 May 2024 02:57 PM (IST)

    पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर कारवाई

    पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. पुणे शहरतील सगळया होर्डिंगस ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

  • 14 May 2024 02:55 PM (IST)

    पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेकडून कारवाई

    पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगस वर पुणे महापालिकेने कारवाई. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर

  • 14 May 2024 02:45 PM (IST)

    सोलपूर अपघातात दोन जखमी

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हैद्राबाद रोडवरील कीर्ती गोल्ड कंपनीसमोर उमरग्याहुन पुण्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • 14 May 2024 01:59 PM (IST)

    अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेकडून कारवाई

    पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेने कारवाई करण्यात आली आहे.  मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे. शहरतील सगळ्या होर्डिंगस ऑडिट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. शहरात एकूण 2500 होर्डिंगस असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्तांनी दिलीय.

  • 14 May 2024 01:45 PM (IST)

    नवी मुंबईत मनसेचं नाराजीनाट्य

    नवी मुंबईत आता मनसेचं नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. आज शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. ही रॅली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालया बाहेरून गेली मात्र मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेचे मध्यवर्ती कार्यालय बंद करुन ठेवलं आहे.  मनसेचे एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झालेले नाहीत. कार्यालयाला कुलूप आणि मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनुपस्थित आहेत.  मनसे कार्यालयाला कुलूप असल्याने नरेश म्हस्के कार्यालयाबाहेरूनच निघून गेले आहेत.
  • 14 May 2024 01:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची आज वसईमध्ये सभा

    महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारीच वसईत दाखल झाले आहेत. वसईच्या वाय एम सी मैदानात आज संध्याकाळी पाच वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. खराब हवामानामुळे दुपारीच हेलिकॉप्टर ने उद्भव ठाकरे वसईत दाखल झाले आहेत.

  • 14 May 2024 01:15 PM (IST)

    रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप

    महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दी चा वापर करण्यात आले आहे. बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आले आहेत. पैशांचे वापर केले असलेतरी काही उपयोग होणार आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

  • 14 May 2024 12:55 PM (IST)

    ऑपरेशन ऑल आउटमध्ये वीस तडीपार कारागृहात

    आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात. यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवले.

  • 14 May 2024 12:38 PM (IST)

    धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आली पदयात्रा

    धुळे लोकसभा मतदार संघाच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस असताना काँग्रेसच्या वतीने मुख्य बाजारपेठेत पदयात्रा काढण्यात आलीये. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या कन्या मयुरी बच्छाव यादेखील घेत आहेत मतदारांच्या गाठीभेटी.

  • 14 May 2024 12:18 PM (IST)

    रोहित पवार यांनी केले मोठे भाष्य

    महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर करण्यात आला आहे. बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला आहे. पैशांचे वापर केले असलेतरी काही उपयोग होणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

  • 14 May 2024 12:07 PM (IST)

    वादळी वाऱ्याचा मोठा फटका

    काल मुंबईत झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा कोल्हापूर बेंगलोर विमान प्रवाशांना फटका. मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरून विमान कोल्हापूरमध्ये यायला झाला उशीर. वैमानिकांच्या ड्युटीची वेळ संपल्याने कोल्हापुरातून रद्द करावी लागली फ्लाईट.

  • 14 May 2024 11:55 AM (IST)

    घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याप्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी व्हावी- किरीट सोमय्या

    “घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी एसआयटीच्या माध्यमातून व्हावी. 1 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2022 पर्यंत परवानगी होती. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली होती. 40 फुटांच्या होर्डिंगची परवानगी असताना 120 फुटांची परवानगी दिली. याबाबत पोलिसांकडे हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. भावेश हा त्याच्या परिवारासोबत पळून गेला आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित करावं,” अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

  • 14 May 2024 11:44 AM (IST)

    मोसमी वारे 19 मे रोजी अंदमानात

    गेले दोन महिने उकाड्याने हैराण झाल्यानंतर आता मोसमी पावसाची उत्सुकता निर्माण झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विषुववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल नैऋत्य दिशेने सुरू होते. अंदमानमध्ये नैऋत्य दिशेने वारे दाखल होतात. या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो.

  • 14 May 2024 11:33 AM (IST)

    पुण्यात अनधिकृत होर्डिंग्ज खपवून घेणार नाही- रवींद्र धंगेकर

    “घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यासह पुण्यातदेखील असे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा अशा घटना घडत राहतील. पुण्यातदेखील अशा घटना घडल्या आहेत. याविषयी आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी करणार आहे. पुण्यात अनधिकृत होर्डिंग्ज खपवून घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.

  • 14 May 2024 11:22 AM (IST)

    मुंबईत झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा कोल्हापूर-बेंगळुरू विमान प्रवाशांना फटका

    कोल्हापूर- काल मुंबईत झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा कोल्हापूर-बेंगळुरू विमान प्रवाशांना फटका बसला आहे. मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरून कोल्हापूरला विमान यायला उशीर झाला. वैमानिकांच्या ड्युटीची वेळ संपल्याने कोल्हापुरातून फ्लाइट रद्द करावी लागली. फ्लाइट अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

  • 14 May 2024 11:11 AM (IST)

    शासनाने पाच लाख रुपये दिलं म्हणजे प्रकरण संपलं का? छगन भुजबळांचा सवाल

    “एअरपोर्टकडे जाताना असे अनेक होर्डिंग्ज दिसतात. त्यांचं वजनसुद्धा खूप आहे. हे सगळे होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय आहे? शासनाने पाच लाख रुपये दिलं म्हणजे प्रकरण संपलं का? होर्डिंग्ज ज्या आकाराचे असायला हवेत, त्यापेक्षा तो खूप मोठ्या आकाराचा होता”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी घाटकोपरमधील होर्डिंग्ज कोसळल्याप्रकरणी दिली.

  • 14 May 2024 10:45 AM (IST)

    Live Update | सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

    अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.

  • 14 May 2024 10:21 AM (IST)

    Live Update | मतदान संपताच उमेदवार झाले फ्री, रविंद्र धंगेकर यांचा पुण्यात फेरफटका

    पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा JM रोड वर मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि टी… प्रचाराची रणधुमाळी, मतदान संपल्यावर धंगेकरांचा निवांतपणा… आज सकाळपासून रविंद्र धंगेकर यांचा पुण्यात फेरफटका

  • 14 May 2024 10:06 AM (IST)

    Live Update | अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आज पासून संपावर

    सहाव्या, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता देण्याची मागणी.. प्रलंबित मागण्यांचा निपटारा करण्यासाठी आयुक्तांची नकारघंटा… बेमुदत कामबंद आंदोलन करत कर्मचारी करनार मनपा बाहेर आंदोलन… संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांची माहिती… कर्मचारी संपावर गेल्याने मनपाचे कामकाज होणार ठप्प

  • 14 May 2024 09:56 AM (IST)

    Natioanl News : पंतप्रधान मोदींची दशश्वमेध घाटावर प्रार्थना

    लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या दशश्वमेध घाटावर केली प्रार्थना.

  • 14 May 2024 09:51 AM (IST)

    Maharashtra News : जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 57.70 टक्के मतदानाची नोंद

    जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 94 हजार 46 मतदारांपैकी 11 लाख 50 हजार 536 एवढ्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे माहिती. रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याचं प्रशासनाकडून सुरू होतं काम

  • 14 May 2024 09:09 AM (IST)

    Maharashtra News : कल्याणमध्ये चाललय तरी काय ?

    कल्याणमध्ये चाललय तरी काय ?. दोन दिवसात बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान भर गर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण ?

  • 14 May 2024 09:08 AM (IST)

    Maharashtra News : पोलिस भरतीसाठी यापुढे एकावेळी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार

    पोलिस भरतीसाठी यापुढे एकावेळी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार. गृह विभागाने काढले आदेश. राज्यात होणाऱ्या 17 हजार पोलिसांच्या भरतीसाठी एक उमेदवार, एक अर्ज नियम लागू असणार. एकाच जिल्ह्यात अर्ज दाखल करत असल्याचं द्यावं लागणार हमीपत्र

  • 14 May 2024 08:57 AM (IST)

    कोल्हापूर कारागृहात सापडले मोबाईल

    कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात मोबाईल सापडण्याचं सत्र सुरूच आहे. 1 ते 10 मे दरम्यान कारागृहात सापडले 25 मोबाईल सापडले आहे.  मागील महिन्यात तब्बल ८० हून अधिक मोबाईल सापडले होते.

  • 14 May 2024 08:47 AM (IST)

    सुनील केदार यांचा खंडपीठात अर्ज

    नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.  शिक्षेला स्थगिती द्यावी या अर्जावर उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.

  • 14 May 2024 08:27 AM (IST)

    इगतपुरीत वादळी पाऊस

    इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाले येथे वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसात गावातील अनेक घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी भिंतही पडली आहे. पावसामुळे घरांसह संसारउपयोगी वस्तू, धान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले.

  • 14 May 2024 08:11 AM (IST)

    परभणी पोलीस दलात शिपाईसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज

    परभणी पोलीस दलात शिपाई आणि चालक पदासाठी 5 हजारापेक्षा पेक्षा अधिक एमबीए, एलएलएमसह उच्चशिक्षित उमेदवारांचा अर्ज आले आहेत. परभणी जिल्हा पोलीस दलात 141 पोलीस शिपाई आणि चालक भरती प्रक्रिया सुरू आहे. तब्बल 11 हजार 962 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

  • 14 May 2024 07:59 AM (IST)

    पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन बदलण्याची वेळ

    पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन बदलण्याची वेळ प्रशासनावर आली. दोन्ही मतदारसंघात प्रशासनाकडून बदलण्यात 57 ईव्हीएम मशीन बदलण्यात आले.

  • 14 May 2024 07:45 AM (IST)

    पुणे शहरात आज पुन्हा पावसाची शक्यता

    पुणे शहरात आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

  • 13 May 2024 10:15 PM (IST)

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 13 May 2024 09:08 PM (IST)

    घाटकोपरच्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू

    घाटकोर येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

  • 13 May 2024 08:57 PM (IST)

    घाटकोपरला घटनास्थळी किरीट सोमय्या आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची

    भाजप नेते किरीट सोमया आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्यात बाचबाची झाली आहे. दोघांमध्ये घाटकोपरला घटनास्थळावर बाचाबाची झालीय.  किरीट सोमया यांना वारंवार घटनास्थळावरून बाहेर जायला सांगत असल्याने सोमय्या आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.

  • 13 May 2024 08:51 PM (IST)

    ‘मी इथे दबलोय, मला वाचवा…’, नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना ‘ती’ ढसाढसा रडली

    घाटकोपर दुर्घटनेनंतर महिलेने टाहो फोडला, बातमी वाचा सविस्तर :

    ‘मी इथे दबलोय, मला वाचवा…’, नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना ‘ती’ ढसाढसा रडली

  • 13 May 2024 08:29 PM (IST)

    घाटकोपर दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, 61 जण जखमी

    घाटकोपरच्या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आतापर्यंत 61 जण या घटनेत जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सर्व जखमींना जवळील राजापूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही 50 नागरीक पेट्रोल पंपावर खाली अडकल्याचा अंदाज आहे.

  • 13 May 2024 08:00 PM (IST)

    घाटकोपर दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    "घटना अतिशय दुर्देवी आहे. अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. जवळपास 57 लोकांना बाहेर काढलं आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम काम करत आहे. नागरिकांना आधी बाहेर काढलं जाईल. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. होर्डिंगविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांच्या मदत केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 13 May 2024 07:52 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरला घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाचा आढावा घेतला जात आहे.

  • 13 May 2024 07:48 PM (IST)

    घाटकोपरच्या घटनेत तिघांचा मृत्यू

    घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. होर्डिंगखाली अद्यापही 50 ते 60 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण घाटकोपरसह मुंबई सुन्न झाली आहे.

  • 13 May 2024 07:42 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरला दुर्घटनास्थळी थोड्याच वेळात पोहोचणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात घाटकोपर येथील दूर्घटनास्थळावर पहाणीसाठी पोहचत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपर येथील राजावाडी हॅास्पिटलमध्ये दूर्घटनेतील जखमी नागरिकांना भेटण्यासाठी जाणार आहेत.

  • 13 May 2024 07:10 PM (IST)

    घाटकोपरच्या घटनेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

    घाटकोरमध्ये घडलेल्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली आहे. "घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

  • 13 May 2024 07:06 PM (IST)

    घाटकोपरच्या घटनेत 54 जखमी, 90 जण अद्यापही अडकल्याची भीती

    घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 54  जखमींना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. पण अजूनही 90 जण अडकल्याची माहिती मिळत आहे.

  • 13 May 2024 07:01 PM (IST)

    घाटकोपरला घटनास्थळी 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात

    मुंबई महानगरात आज (दिनांक १३ मे २०२४) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अचानक कोसळलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच आवश्यक उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी हे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित आहेत.

    घाटकोपर येथील छेडानगर परिसरात कोसळलेल्या होर्डिंगच्या घटनास्थळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी या स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका आणि इतर बचाव यंत्रणांना निर्देश देत आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी २० पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले आहे. पुढील बचाव कार्य सुरू आहे.

  • 13 May 2024 06:58 PM (IST)

    घाटकोपरमधील दुर्घटनेत 100 जण अडकले

    मुंबईत अचानक आज संध्याकाळी पाऊस पडला. पावसासोबत वाराही जोराने वाहत होता. त्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अजूनही 100 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

  • 13 May 2024 05:52 PM (IST)

    बहरमपूर जागेवर आव्हान नाही : युसूफ पठाण

    पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील टीएमसी उमेदवार युसूफ पठाण म्हणाले, "मला विश्वास आहे की आम्ही येथे जिंकू आणि चांगल्या फरकाने जिंकू. जर मला लोकांसाठी बलिदान द्यावे लागले तर मी पूर्णपणे तयार आहे. मी इथे लोकांसाठी आहे.मी यासाठी काम करण्यासाठी आलो आहे. लोकांनी मला खूप पाठिंबा दिला आहे, त्यांना येथे बदल हवा आहे कारण येथे कोणतेही आव्हान नाही कारण येथील जनता माझ्यासोबत आहे."

  • 13 May 2024 05:40 PM (IST)

    वाराणसीत पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू, मुख्यमंत्री योगीही सोबत

    वाराणसीचे लोकसभा उमेदवार पीएम मोदींनी रोड शो सुरू केला आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधानांचा रोड शो महामना चौक ते महादेवाच्या दरबारापर्यंत असेल.

  • 13 May 2024 05:37 PM (IST)

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपावर हल्लाबोल

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, " हे एक भयंकर षड्यंत्र (CAA-NRC) आहे. आणखी एक षडयंत्र रचले गेले आहे आणि ते म्हणजे समान नागरी संहिता (UCC), ज्यामध्ये अल्पसंख्याक, SC-ST, OBC, आदिवासी आहेत. अस्तित्वच राहणार नाही, हिंदूंचेही अस्तित्व राहणार नाही, फक्त 'एक राष्ट्र-एक राजकीय पक्ष नेता' असेल... पंतप्रधान मोदी आले तर भारतात यापुढे निवडणुका होणार नाहीत."

  • 13 May 2024 05:25 PM (IST)

    पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 11 वाजता गंगापूजनानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार

    पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी पंतप्रधान उद्या सकाळी 9.10 वाजता गंगापूजन करतील, त्यानंतर सकाळी 10.15 वाजता काल भैरवाची पूजा करतील आणि त्यानंतर 11.40 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील.

  • 13 May 2024 05:10 PM (IST)

    पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते स्वर्ण सलारिया यांचा 'आप'मध्ये

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्ण सलारिया यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर गुरुदासपूरमध्ये 'आप'ची स्थिती मजबूत मानली जात आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांचा पक्षात समावेश केला. सरवन सलारिया यांनी गुरुदासपूरमधून भाजपकडून लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती.

  • 13 May 2024 04:15 PM (IST)

    बीड लोकसभा मतदारसंघातील परळीत मतदानासाठी तुफान गर्दी

    लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रात एकूण 11 मतदारसंघात मतदानप्रक्रिया पार पडत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात मतदानासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. परळीतील आझाद नगर भागात मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी झाली आहे.  बीड लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.49 टक्के मतदान झालं आहे.

  • 13 May 2024 04:03 PM (IST)

    पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

    पुण्यात पाटील एस्टेटमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. पैसे वाटल्याच्या आरोपावरून गोंधळ झाल्याची माहित आहे.

  • 13 May 2024 04:02 PM (IST)

    ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

    चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

    नंदुरबार - ४९.९१ टक्के जळगाव - ४२.१५ टक्के रावेर - ४५.२६ टक्के जालना - ४७.५१ टक्के औरंगाबाद - ४३.७६ टक्के मावळ - ३६.५४ टक्के पुणे - ३५.६१ टक्के शिरूर - ३६.४३ टक्के अहमदनगर- ४१.३५ टक्के शिर्डी - ४४.८७ टक्के बीड - ४६.४९ टक्के

  • 13 May 2024 04:00 PM (IST)

    मावळ लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 36.54% टक्के मतदान

    मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत 36.54% टक्के मतदान आहे.

  • 13 May 2024 03:59 PM (IST)

    शिर्डी लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 44.87 टक्के मतदान

    शिर्डी लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 44.87 टक्के मतदान झाले आहे.

  • 13 May 2024 03:21 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वसईत जाहीर सभा

    वसई : पालघर लोकसभा मतदार संघाचे महायुती भाजपाचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वसईत जाहीर सभा होत आहे.

  • 13 May 2024 01:38 PM (IST)

    अंजनडोहमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

    छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. तब्बल एक तासापासून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय. ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदार मतदान केंद्रातच बसून आहेत. एक तास बसून मतदान यंत्रात बिघाड झालाय.

  • 13 May 2024 01:30 PM (IST)

    खुलताबादमध्ये ईव्हीएम मशीन चार वेळा बंद

    खुलताबाद शहरातील 56 नंबरच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन चार वेळा बंद पडलं. ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडल्यामुळे मतदारांच्या  रांगा लागल्यात. ईव्हीएम सतत बंद पडत असल्यामुळे मतदारही वैतागले आहेत. सकाळपासून आतापर्यंत चार वेळा ईव्हीएम मशीन बंद पडणे.

  • 13 May 2024 01:20 PM (IST)

    नंदुरबारमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड

    नंदुरबार तालुक्यातील दुधाळे गावांमध्ये असलेले एक मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाला. मतदारांना त्यामुळे बराच तात्काळत थांबावे लागले. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत केली. मतदान प्रक्रिया शांतता पार पडत असताना अचानक यांचा हत्ती काळात झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली.

  • 13 May 2024 01:13 PM (IST)

    अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज मतदान

    अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरू आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल, या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतः च्या प्रचाराचे आणि चिन्हाचे प्रदर्शन केले असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान याबाबत तक्रार प्राप्त होताच जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी संबंधित कर्मचारी तात्काळ बदलण्यात आले आहेत. मतदान सुरळीत सुरू असल्याचे म्हटलं आहे. तर पारनेर तालुक्यातील पैसे वाटपाबाबतचा जो व्हीडीओ व्हायरल होत आहे.त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकारी सालीमठ यांनी म्हटलं आहे.

  • 13 May 2024 12:57 PM (IST)

    बीडच्या कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार

    बीडच्या कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. साठवण तलावाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.  सकाळपासून एका नागरिकाने मतदान केलं नाही. गावात 2079 मतदान आहे. वीस वर्षांपासून तलाव होत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. प्रशासनाने मध्यस्थी करून देखील, यश आले नाही. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

  • 13 May 2024 12:45 PM (IST)

    मतदान यादीत नाव नसल्याने गोंधळ

    जालन्यात मतदाराचे नाव मतदान यादीत नसल्याने गोंधळ झाला. जालना शहरातील मधुबन कॉलनी येथील जवळपास 100 मतदाराचे नाव अचानक मतदार यादीत नसल्याने गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागणार? का असा सवाल आहे.

  • 13 May 2024 11:51 AM (IST)

    मावळमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 14.87 टक्के मतदान

    मावळमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 14.87 टक्के मतदान झालं आहे. तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.74 टक्के मतदान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.89 % आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 19.03 % मतदान झालं.

  • 13 May 2024 11:40 AM (IST)

    शिरूरच्या खेड-राजगुरूनगरमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

    शिरूरच्या खेड-राजगुरूनगरमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदार तासभरापासून रांगेत उभे आहेत. अशा परिस्थितीत मतदान केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मतदारांनी घेतली आहे.

  • 13 May 2024 11:30 AM (IST)

    लोकांना सर्वकाही समजलंय, ते शहाणपणाने मतदान करणार आहेत- पंकजा मुंडे

    बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या, "हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मला लोकांना आवाहन करायचं आहे की त्यांनी बाहेर पडून मतदान करावं. मला माझे वडील गोपीनाथ मुंडे यांची खूप आठवण येत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून मला असं वाटतं की त्यांची ऊर्जा माझ्यासोबत आहे आणि ते मला आशीर्वाद देत आहेत. मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पण लोकांना सर्व काही समजलं आहे आणि ते शहाणपणाने मतदान करणार आहेत."

  • 13 May 2024 11:20 AM (IST)

    साऊथचे अभिनेते पवन कल्याण यांनी केलं मतदान

    जनसेना पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांनी मंगलगिरी याठिकाणी मतदान केलं. पवन कल्याण यांच्या पक्षासाठी चिरंजीवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचार केला होता.

  • 13 May 2024 11:12 AM (IST)

    देशात आणि राज्यात एनडीएला बहुमत मिळणार- नीलम गोऱ्हे

    "देशात आणि राज्यात एनडीएला बहुमत मिळणार आहे. राज्यात महायुतीला चांगलं वातावरण आहे. मतदानाची टक्केवारी वाढणार हे आताच सांगता येणार नाही, मात्र मतदारांमध्ये उत्साह चांगला दिसतोय. काही लोक अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत," असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

  • 13 May 2024 10:59 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : रावेर माजी खासदार उल्हास पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

    रावेर माजी खासदार उल्हास पाटील यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. रावेर लोकसभेचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी सहकुटुंबीयांसह मूळ विवरे गावात मतदानाचा बजावला हक्क.

  • 13 May 2024 10:51 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर आणि साक्री येथे मतदानासाठी मोठ्या रांगा.

    नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर आणि साक्री येथे मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.  मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंl साक्री येथे 8 टक्के तर शिरपूर 7 टक्के मतदान झाले.

  • 13 May 2024 10:34 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : पुण्यात मॉडेल कॉलनीत EVM बंद

    पुण्यात मॉडेल कॉलनी परिसरात EVM मशीन 20 मिनिटांपासून बंद पडलं आहे. त्यामुळे मतदार रांगेत ताटकळले आहेत.

  • 13 May 2024 10:30 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन

    पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन, बुथ परिसरात काँग्रेसचे बॅनर असल्याने हेमंत रासने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

  • 13 May 2024 10:18 AM (IST)

    जालना लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी केलं मतदान

    जालना लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील पिसादेवी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला.  मतदान झाल्यांनतर ते जालना कडे रवाना झाले.

  • 13 May 2024 10:06 AM (IST)

    पुण्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद सकाळपासून पहायला मिळतोय. जास्तीत जास्त मतदान होईल - प्रकाश जावडेकर

    पुण्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद सकाळपासून पहायला मिळतोय. जास्तीत जास्त मतदान होईल, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

    पुण्यात मोहोळ निवडून येणार या विजयाचा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. राज्यात ४८ पैकी ४१ हून अधिक जागा महायुतीच्या येतील तर देशात ४०० पार करू.

  • 13 May 2024 09:55 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मतदान

    पारनेरच्या राळेगण सिद्धी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदान केले. यावेळी अण्णा हजारे यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

  • 13 May 2024 09:41 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : अमित शाह आज वसईत

    वसई- पालघर लोकसभा मतदार संघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावर यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची आज दुपारी तीन वाजता वसईत जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी वसईच्या सनसीटी मैदानावर भव्य असा मंडप उभारला आहे.

  • 13 May 2024 09:22 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : छत्रपती संभाजीनगरात सकाळी ९ पर्यंत १७ टक्के मतदान

    छत्रपती संभाजीनगरात सकाळी ९ वाजेपर्यंत १७ टक्के मतदान झाले आहे. सकाळापासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. उन्हामुळे लवकर मतदान करण्याची तयारी अनेक मतदरांनी केली आहे.

  • 13 May 2024 09:11 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : संजोग वाघेरे यांनी घेतले काळभैरवनाथाचे दर्शन

    मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाच्या आधी पिंपरी गाव येथील काळभैरवनाथाचे दर्शन घेतले आहे. मतदानापूर्वी संजोग वाघेरे यांचे घरी औक्षण देखील करण्यात आलंय. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी करून आपल्या विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

  • 13 May 2024 09:04 AM (IST)

    Lok Sabha Elections 2024 : बीडमध्ये चिन्ह अंधूक असल्याचा उमेदवाराचा आरोप

    केज, बीडमध्ये मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएम मशीनवर माझे चिन्ह अंधूक असल्याचा आरोप केला आहे. तुतारीधारी माणूस असलेले चिन्ह अंधूक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

  • 13 May 2024 08:54 AM (IST)

    Live Update | जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान..

    मंत्री गिरीश महाजन करणार मतदान... जामनेर येथील इंग्लिश स्कूल मध्ये महाजनांचा मतदान... कुटुंबा समवेत करणार मतदान... मंत्री गिरीश महाजन रांगेत उभे राहून मतदानाच हक्क बजावणार

  • 13 May 2024 08:45 AM (IST)

    Live Update | रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात

    मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान केंद्रावर... मतदान केंद्रांवर लागल्या रांगा... निसर्गाच्या सानिध्यात मतदान व्हावं यासाठी मोठ्या उपाययोजना देखील करण्यात आल्या... वृद्ध व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर तरीही मतदानाचा मतदारांनी बनवला हक्क... एक एक मताची आवश्यकता असते त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावला.....

  • 13 May 2024 08:30 AM (IST)

    Live Update | बजरंग सोनावणे यांचं कुटुंबियांकडून औक्षण

    बजरंग सोनावणे यांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात बजरंग सोनावणे करणार मतदान... सारणी आनंदगाव येथे करणार मतदान... मतदानाला जाण्यापूर्वी आई, मुलीकडून औक्षण

  • 13 May 2024 08:20 AM (IST)

    Live Update | मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे - सुबोध भावे

    आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे.. याची जाणीव आम्हाला आहे.. असं वक्तव्य सुबोध भावे यांनी केलं आहे.

  • 13 May 2024 08:07 AM (IST)

    Live Update | मावळ लोकसभेसाठी आज मतदान पार पडणार

    मावळ लोकसभेसाठी आज मतदान पार पडणार आहे. या जागेसाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत तर प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार समोरासमोर... त्यामुळे मावळ लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार... महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे, महायुती कडून श्रीरंग बारणे,वंचित कडून माधवी जोशी अशी थेट लढत होणार... श्रीरंग बारणे देव दर्शनासाठी मंदिरात आलेत

  • 13 May 2024 07:57 AM (IST)

    Pune Loksabha Voting : मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर सुबोध भावे काय म्हणाला?

    "आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं, तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे. याची जाणीव आम्हाला आहे. राजकारणावर बोलणं टाळलं. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल" असं सुबोध भावे म्हणाला.

  • 13 May 2024 07:55 AM (IST)

    Ahmednagar Loksabha Voting : कामांच्या आधारावर जनता मला मतदान करेल - सुजय विखे पाटील

    "कामांच्या आधारावर जनता मला मतदान करेल अशी खात्री आहे. निवडणूक अटी-तटीची नाही. सोशल मीडियावर चित्र वेगळं रंगवण्यात आलं. हे चित्र वास्तविकतेपासून लांब होतं. पण अहिल्या नगरची जनता सूज्ञ आहे. लागणारा निकाल हा सूज्ञ, वैचारिक आणि सुसंस्कृत मतदारांचा निकाल असेल. म्हणून एक चांगला निकाल समोर येईल" असं महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील म्हणाले.

  • 13 May 2024 07:44 AM (IST)

    Pune Loksabha Voting : सुबोध भावेने केलं मतदान

    प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क. सुबोध भावे यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

  • 13 May 2024 07:40 AM (IST)

    Raver Loksabha Voting : श्रीराम पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेरमध्ये सहकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या विरोधात श्रीराम पाटील हे रिंगणात आहेत.

  • 13 May 2024 07:39 AM (IST)

    Beed Loksabha Voting : बीडच्या कुठल्या गावात मतदानावर बहिष्कार?

    बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार. साठवण तलावाच्या प्रश्नावरून बहिष्कार. गावात 2130 मतदार. साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा, तरच मतदान करणार, ग्रामस्थांचा पवित्रा

  • 13 May 2024 07:37 AM (IST)

    Maval Loksabha Voting : मावळमध्ये मतदानाचा उत्साह

    मावळ लोकसभेसाठी आज मतदान. शांततेत मतदानाला सुरुवात. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी लढत मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात ही लढत होत आहे

  • 13 May 2024 07:34 AM (IST)

    Maharashtra Loksabha Voting : महाराष्ट्रात कुठल्या 11 मतदारसंघात मतदान?

    जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.

  • 13 May 2024 07:28 AM (IST)

    Jakna Loksabha Voting : जालन्यात मतदानाला संथ गतीने सुरुवात

    जालना लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून संथ गतीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळच सत्र असल्यामुळे मतदारांची संख्या मतदान केंद्रावर कमी दिसून येत आहे. जालना लोकसभेचा विचार केला असता, रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे अशी थेट लढत आहे.

Published On - May 13,2024 7:26 AM

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.