Mumbai north lok sabha Election Final Result 2024 : मुंबईतून पहिला निकाल जाहीर, भाजपाची बाजी

Mumbai North Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : उत्तर मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून भूषण पाटील मैदानात आहेत. उत्तर मुंबईतून आज बाजी कोण मारणार? याची उत्सुक्ता आहे.

Mumbai north lok sabha Election Final Result 2024  : मुंबईतून पहिला निकाल जाहीर, भाजपाची बाजी
piyush goyal vs bhushan patil
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 3:03 PM

मुंबई उत्तर हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलं होतं. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक रिंगणात होते. भाजपासाठी या मतदारसंघात जमेची बाजू म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा तगडा जनसंर्पक नव्हतं.  हीच गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारी होती. मराठी भाषिक मतदारांपेक्षा या मतदारसंघात अन्य भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. मागच्या दोन टर्मपासून भाजपाने या मतदारसंघात आरामात विजय मिळवलाय. उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मराठी मतदारांपेक्षा त्यांचे प्रमाण जास्त आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार नेहमीच भाजपाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे इथून भाजपा उमेदवाराने आरामात विजय मिळवला. बोरिवली, दहीसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून गोपाळ शेट्टी यांनी घवघवीत यश मिळवलय. एकदा शेट्टी यांनी काँग्रेसच्या उमदेवार उर्मिला मातोंडकर आणि त्याआधी संजय निरुपम यांच्यावर मोठा विजय मिळवला.

उमेदवाराचे नाव आघाडी-पिछाडीनिकाल
पीयूष गोयल (भाजपा)-विजयी
भूषण पाटील (काँग्रेस)-पराभूत

पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व

बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. मागाठणेमधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. फक्त मालाड पश्चिमेला काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत. म्हणजे पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व आहे. त्याच कारणामुळे पीयूष गोयल यांचा विजय सोपा मानला जातोय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.