AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, विदर्भ लोकसभा निवडणूक निकाल 2024 Final Results

| Updated on: Jun 05, 2024 | 3:09 PM

VIDARBHA Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : एक्झिट पोलमधून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत आहे. त्यातही विदर्भाने नेहमी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, विदर्भ लोकसभा निवडणूक निकाल 2024 Final Results
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, विदर्भ लोकसभा निवडणूक निकाल 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. देशाच्या निकालाकडे जगाचे लक्ष असणार आहे. एक्झिट पोलमधून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत आहे. त्यातही विदर्भाने नेहमी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. विदर्भात केंदीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी विरुद्ध कॉंग्रेसचे विकास ठाकरे ही लढत सर्वाधिक महत्वाची मानली जात आहे. तर, अमरावतीमध्ये नवनीत राणा, अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर, रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे या महत्वाच्या लढतीमध्ये जनता कुणाला पसंती देणार हे स्पष्ट होणार आहे. विदर्भातील एकूण 10 लोकसभा मतदार संघापैकी किती मतदारसंघावर भाजपचे कमळ फुलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विदर्भातील निकालाच्या सर्व अपडेट्स टीव्ही9 मराठीवर पाहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2024 05:29 PM (IST)

    Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : संजय देशमुख यांचा 76 हजार 411 मतांचा लीड

    यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या 23 व्या मतमोजणीच्या फेरीत ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी 76 हजार 411 मतांची आघाडी घेतली आहे. संजय देशमुख यांना 5 लाख 7 हजार 420 तर राजश्री पाटील यांना 4 लाख 31 हजार 009 मते मिळाली आहेत.

  • 04 Jun 2024 05:06 PM (IST)

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखडे विजयी, अधिकृत घोषणा बाकी.

    अमरावती लोकसभा मतदार संघातून बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा बाकी आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. निकाल घोषित केल्यानंतर नवनीत राणा यांचे कार्यकर्ते पुन्हा मतदान मोजणीची मागणी करण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 04 Jun 2024 04:35 PM (IST)

    Bhandara – Gondiya Lok Sabha Election Result 2024 : प्रशांत पडोळे 10177 मतांनी पुढे

    भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू आहे. भाजपचे सुनील मेंढे यांना 324134 मते तर काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना 334311 मते मिळाली आहेत. प्रशांत पडोळे हे 10177 मतांनी पुढे आहेत.

  • 04 Jun 2024 03:00 PM (IST)

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का, बळवंत वानखडे विजयी

    काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा अखेर विजय झाला आहे.  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा त्यांनी पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 02:43 PM (IST)

    Gadchiroli Lok Sabha Election Result 2024 : डॉ. नामदेव कीरसान हे 57626 मतांनी आघाडीवर

    गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान हे 57626 मतांनी आघाडीवर आहेत. डॉ. नामदेव कीरसान यांना  2,97,882 मते मिळाली आहेत. तर, भाजपाचे अशोक नेते यांना 2,40,256 मते पडली आहेत.

  • 04 Jun 2024 02:31 PM (IST)

    Bhandara – Gondiya Lok Sabha Election Result 2024 : भंडारा – गोंदियात चुरशीची लढत, कॉंग्रेसचे प्रशांत पडोळे 717 मतांनी पुढे

    भंडारा – गोंदियामध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. कॉंग्रेसचे प्रशांत पडोळे हे अवघ्या 717 मतांनी पुढे आहेत. भाजपचे सुनील मेंढे यांना 2,21,399 मते मिळाली आहेत. तर, प्रशांत पडोळे यांना 2,22,116 मते मिळाली.

  • 04 Jun 2024 01:56 PM (IST)

    Gadchiroli Lok Sabha Election Result 2024 : कॉंग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान आघाडीवर

    गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातील 10 व्या फेरीतील मतमोजणीमध्ये कॉंग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान हे 46008 मते घेऊन आघाडीवर आहेत. डॉ. नामदेव कीरसान यांना 2,60,504 तर भाजपचे अशोक नेते यांना 2,14,496 मते मिळाली आहेत.

  • 04 Jun 2024 01:43 PM (IST)

    Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : संजय देशमुख यांची 46 हजार 945 मतांची आघाडी

    यवतमाळ वाशिम मतदार संघाच्या 14 व्या फेरीच्या मतमोजणीत संजय देशमुख यांनी 46 हजार 945 मतांची आघाडी घेतली आहे. संजय देशमुख यांना 3 लाख 6 हजार 812 मते मिळाली आहेत. तर, राजश्री पाटील यांनी 2 लाख 59 हजार 867 मते घेतली आहेत.

  • 04 Jun 2024 01:17 PM (IST)

    Wardha Lok Sabha Election Result 2024 : अमर काळे 16586 मतांनी आघाडीवर

    वर्धा लोकसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर अमर काळे यांनी 16586 मतांची आघाडी घेतली आहे. अमर काळे यांना 1,54,393 मते तर रामदास तडस यांना 1,37, 807 मते मिळाली आहेत.

  • 04 Jun 2024 01:05 PM (IST)

    RAMTEK Lok Sabha Election Result 2024 : अनपेक्षित कलाटणी श्यामकुमार बर्वे यांना 26444 मतांची आघाडी

    रामटेक लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या चौथी फेरीअंती अनपेक्षित अशी कलाटणी मिळाली आहे. शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांना 96 हजार 071 मते मिळाली आहेत. तर, कॉंग्रसचे श्यामकुमार बर्वे यांना 1 लाख 22 हजार 515 मते मिळाली आहेत. श्यामकुमार बर्वे यांनी 26 हजार 444 मतांची आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 11:45 AM (IST)

    Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : संजय देशमुख 32 हजार मतांनी आघाडीवर

    यवतमाळ – वाशिम मतदार संघात ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना 7 व्या फेरीअखेर 1 लाख 56 हजार 253 मते मिळाली आहेत. तर. शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना 1 लाख 24 हजार 040 मते मिळाली आहेत. संजय देशमुख यांनी 32 हजार 213 मतांची आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 11:40 AM (IST)

    Gadchiroli Lok Sabha Election Result 2024 : काँग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान आघाडीवर

    गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान यांना 61162 मते मिळाली आहेत. तर, भाजपाचे अशोक नेते यांना 52 हजार 309 मते मिळाली आहेत. डॉ. नामदेव कीरसान हे 8853 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 11:14 AM (IST)

    Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : संजय देशमुख यांची लाखमोलाची आघाडी

    यवतमाळ लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनी 5 व्या फेरीअखेर 1 लाख 13 हजार 69 मते मिळाली आहेत. महायुतीच्या राजश्रीताई पाटील यांनी 84 हजार 287 मते घेतली आहेत. संजय देशमुख हे 28 हजार 782 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 09:31 AM (IST)

    Bhandara – Gondiya Lok Sabha Election Result 2024 : महायुतीचे सुनील मेंढे आघाडीवर

    भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत महायुतीचे सुनील मेंढे हे 9069 मते मिळवून आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांना 7096 मते मिळाली आहेत.

  • 04 Jun 2024 09:21 AM (IST)

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर

    अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे हे मेळघाटमध्ये 3500 मतांनी पुढे आहेत.

  • 04 Jun 2024 09:19 AM (IST)

    Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : 6188 मतांनी संजय देशमुख आघाडीवर

    यवतमाळ वाशिम मतदार संघातील पहिल्या फेरीत कारंजा, राळेगाव, यवतमाल, या दिग्रस, पुसद, वाशिम विधानसभेत 6188 मताने संजय देशमुख आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना 21157 तर महायुतीच्या राजश्री पाटील यांना 14969 मते मिळाली आहेत.

  • 04 Jun 2024 09:01 AM (IST)

    Nagpur Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरी यांची 10 हजार मतांची आघाडी

    नागपूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढविणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्याविरोधात 10 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 08:58 AM (IST)

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : बळवंत वानखेडे आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर

    दोन महिन्यापासून चर्चेत राहिलेली अमरावती लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनीत राणा, काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब यांच्यात लढत होत आहे. आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे हा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे.

  • 04 Jun 2024 08:54 AM (IST)

    CHANDRAPUR Lok Sabha Election Result 2024 : चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांची आघाडी

    CHANDRAPUR Lok Sabha Election Result 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:49 AM (IST)

    AKOLA Lok Sabha Election Result 2024 : अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

    अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत. तर, भाजपचे अनुप धोत्रे सध्या आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:42 AM (IST)

    RAMTEK Lok Sabha Election Result 2024 : रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर…

    रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे हे आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 01:36 AM (IST)

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यांच्यात लढत होत आहे

    Amravati Lok Sabha Election Result 2024 : दोन महिन्यापासून चर्चेत राहिलेली अमरावती लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनीत राणा, काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब यांच्यात लढत होत आहे. आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे हा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे.

  • 04 Jun 2024 01:16 AM (IST)

    NAGPUR Lok Sabha Election Result 2024 : नागपूरमध्ये हेविवेट लढत, ठाकरेंचा सामना गडकरींविरोधात

    NAGPUR Lok Sabha Election Result 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस उमदेवार आमदार विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. विकास ठाकरे हे पश्चिम नागपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Published On - Jun 04,2024 1:12 AM

Follow us
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.