नागपूर लोकसभा निकाल 2024: भाजप उमेदवार नितीन गडकरी आघाडीवर काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर
Nagpur Lok Sabha Election Result 2024 News in Marathi: नागपूर हा नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा आहे. गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा 2,84,828 मतांनी पराभव केला. गडकरींना 5,87,767 मते मिळाली.
नागपूर लोकसभा मतदार संघात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदार संघात नितीन गडीकर यांनी ११ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. नागपूरमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (bjp candidate nitin gadkari) यांच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे (nagpur congress candidate vikas thakre) निवडणूक मैदानात होते. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा दिला होता. तसेच 11 अपक्ष सुद्धा रिंगणात आहेत. विदर्भातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे नितीन गडकरी यांची जागा महत्वाची होती. नितीन गडकरी यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाही प्रचंड शक्तीप्रदर्शन झाले होते.
नागपूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Nagpur Lok Sabha Seat Winner History)
विदर्भ कधीकाळी काँग्रेसचा गड होतो. नागपूरमध्ये 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रथमच आपले खाते उघडले. भाजपचे बनवारीलाल पुरोहित खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 ते 2004 पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली आणि विलास मुत्तेमवार सलग चार वेळा खासदार झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नितीन गडकरी यांना येथून उमेदवारी दिली. नागपूर हा नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा आहे. गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा 2,84,828 मतांनी पराभव केला. गडकरींना 5,87,767 मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नितीन गडकरी काँग्रेसचे उमेदवार नानाभाई फाल्गुन राव पाटोळे यांचा पराभव करून विजय मिळवले.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स