NASHIK Election Final Result 2024 : राजाभाऊ वाजे यांनी राखला शिवसेनेचा बालेकिल्ला, शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पराभूत,

Nashik Lok Sabha Election Final Result 2024 : नाशिकचा खासदार होण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले होते. शांतिगिरी महाराज यांच्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

NASHIK Election Final Result 2024 : राजाभाऊ वाजे यांनी राखला शिवसेनेचा बालेकिल्ला, शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पराभूत,
Nashik Lok Sabha Election Results 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 4:05 PM

नाशिक : मुंबईची परसबाग, कुंभ नगरी, वाईन कॅपिटल मंदिरांचे शहर, तपोभूमी, द्राक्ष पंढरी अशी विविध ओळख असलेल्या नाशिकचा खासदार (Nashik Constituency MP) होण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase Candidate of Shinde Group), ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje Candidate of Thackeray Group) आणि शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj indipendant Candidate) असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. अपेक्षेनुसार शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात प्रमुख लढत झाली. गेल्या अनेक निवडणुकीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले. शिवसेना ( शिंदे गटाचे ) विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा त्यांनी पराभव केला. 14 व्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 47 हजार 012 मतांची आघाडी घेतली त्याचवेळी शिवसैनिकांनी ढोल – ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला. राजाभाऊ वाजे यांच्यासह माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना राजाभाऊ वाजे यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई झाली. त्यात जनशक्तीचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली. आता सर्वत्र जल्लोष आणि आनंदाचे वातावरण आहे. या विजयात कुणा एकाचे नाव घेऊन चालणार नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्नेयांचे आभार मानतो. आज आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक विकासाचा रोड मॅप आखला जाईल. राऊत साहेबांशी बोलणं झालं आहे अजून कोणाशी बोलणं झालं नाही. तसेच वरिष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ मुंबईला जाऊ असेही ते म्हणाले.

कोण आहेत राजाभाऊ वाजे ?

राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सुमारे दीड लाख मते राजाभाऊंकडे आहेत. यासोबतच इगतपुरी ग्रामीण भागात त्यांचा अधिक संपर्क आहे. संयमी, शांत नेता आणि मराठा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये चौरंगी लढत झाली होती. वंचितचे उमेदवार पवन पवार यांनी 1 लाखाहून अधिक मते घेतली होती. पण, हेमंत गोडसे यांनी 5 लाख 63 हजार 599 इतकी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता. समीर भुजबळ यांना 2 लाख 71 हजार 395 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी 1 लाख 34 हजार 527 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीतील पहिले तीन उमेदवार म्हणजेच हेमंत गोडसे, समीर भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले. तर, शिवसेना (ठाकरे गट) यांची पारंपारिक मते याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची मते यावर ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून होते.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाकडून पुन्हा एकदा लोकसभा लढविली. त्यांना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी आव्हान दिले होते. जय बाबाजी भक्त परिवारातील जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनीही लोकसभेची तयारी सुरु केल्याने या लढतीत चुरस निर्माण झाली होती. अयोध्येतील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तपोभूमी असलेल्या धार्मिक नाशिकला राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही नाशिकमधील काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले होते. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे मनसे उमेदवार देण्याची शक्यता असतानाच राज ठाकरे यांनी भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार असल्याने ही निर्णायक मते कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता होती.

सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा सत्ताधारी पक्षाकडे

नाशिकमधील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे सत्ताधारी पक्षाकडे आहेत. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीन शहरातील मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर देवळाली, सिन्नर हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत. उर्वरित इगतपुरी या एकाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.