Chandrababu Naidu : चंद्राबाबू पंतप्रधान मोदींबद्दल कसा विचार करतात? त्यांचा दृष्टीकोन काय? त्यासाठी एकदा हे वाचा

Chandrababu Naidu : "चांगला नेता हा देशाची संपत्ती असतो. भारताकडे आज योग्य वेळी योग्य नेता आहे. भारताला ही खूप चांगली संधी आहे. ही संधी हुकली तर कायमची निघून जाईल" असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. चंद्राबाबू नायडू काय विचार करतात ते एकदा त्यांच्या भाषणातून जाणून घ्या.

Chandrababu Naidu : चंद्राबाबू पंतप्रधान मोदींबद्दल कसा विचार करतात? त्यांचा दृष्टीकोन काय? त्यासाठी एकदा हे वाचा
TDP chief N Chandrababu Naidu
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 1:56 PM

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरु आहे. NDA मधील सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. एनडीए संसदीच्या पक्षाच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी समर्थन दिलं. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच भरभरुन कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ असणार आहे. इंडिया आघाडीचे नेते चंद्राबाबू नायडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चंद्राबाबू नायडू काय विचार करतात ते एकदा त्यांच्या भाषणातून जाणून घ्या. “मागचे तीन महिने नरेंद्र मोदींनी अजिबात आराम केला नाही. दिवस-रात्र त्याच उत्साहाने, आवेशाने प्रचार केसा. आंध्र प्रदेशात तीन जाहीर सभा घेतल्या, एक मोठी रॅली केली. त्यामुळे खूप मोठा फरक पडला. आंध्र प्रदेशात आम्ही जिंकलो. अनेक नेते आंध्र प्रदेशात आले. केंद्र आपल्यासोबत आहे, हा आत्मविश्वास त्यामुळे लोकांमध्ये आला” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

“आज देशाच्या इतिहासात आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. नरेंद्र मोदींच्या रुपाने एनडीएकडे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. मोदींनी मागच्या 10 वर्षात खूप महत्त्वाची पावल उचलली. त्यामुळे देशाची प्रगती झाली. परिवर्तन झालं” असं चंद्राबाबू म्हणाले. “मी मागच्या 40 वर्षांपासून राजकारणात आहे. मी अनेक नेते बघितलेत. आज भारत जागतिक शक्ती बनला आहे. आज जगात भारताचा डंका वाजतोय, त्याच सर्व श्रेय मी मोदींना देतो” असं चंद्राबाबू म्हणाले. “आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या-दुसऱ्या नंबरवर पोहोचेल. आज जगात कुठेही पाहा, भारतीय दरडोई उत्पन्नात आघाडीवर आहेत” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

‘आज भारताकडे योग्य वेळी योग्य नेता’

“मित्रांनो, मी अनेक वर्ष सरकार पाहिली आहेत. तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तर बऱ्याच गोष्टी शक्य होतात. मोदींकडे दूरदृष्टी आहे. मोदींकडे उत्साह, आवेश आहे. राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक संतुलन ठेऊन चालायच आहे. मोदीं जमिनीवर योजनांची अमलबजावणी एकदम परफेक्ट करतात. चांगला नेता हा देशाची संपत्ती असतो. भारताकडे आज योग्य वेळी योग्य नेता आहे. भारताला ही खूप चांगली संधी आहे. ही संधी हुकली तर कायमची निघून जाईल” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

‘मोदींच्या नेतृत्वाखाली गरीबी दर शुन्यावर आणणं शक्य’

“आज जगात बहुतांश देशात 2 ते 3 टक्के ग्रोथ रेट आहे. पण मागच्या 10 वर्षात भारताचा ग्रोथ रेट जास्त आहे. अजून 10-20 वर्ष हीच स्थिती कायम राहिलं. प्राचीन काळात सुद्धा स्त्रोत होते. आता आपण आक्रमकपणे त्या स्त्रोतांकडे जात आहोत. कारण तसा नेता आपल्याकडे आहे. एनडीमध्ये गरीबी दर शुन्यवर जाईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. .

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.