Narendra Modi Swearing-in Ceremony Live : मोदींचं जम्बो मंत्रिमंडळ; 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 40 राज्यमंत्र्यांची वर्णी
Central Government Formation Live News Updates in Marathi: महाराष्ट्रातून नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रांतीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मोदी 3.0 मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी ७.१५ वाजता होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील अन्य सहकारी शपथ घेणार आहेत. एनडीएमधील घटकपक्षातील सदस्य मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रांतीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. महाराष्ट्रातून भाजप आणि शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये असणार आहे. परंतु अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोणाचे नाव आले नाही. नरेंद्र मोदी सरकारमधील शपथविधी समारंभातील प्रत्येक अपडेट वाचा…
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्राला फक्त सहा मंत्रीपदं, 2 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रीपदं
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला केवळ सहा मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
-
मोदींचं जम्बो मंत्रिमंडळ; 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 40 राज्यमंत्र्यांची वर्णी
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदींनी जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 40 राज्यमंत्र्यांची वर्णी
-
-
मुरलीधर मोहोळ शपथ घेण्यास येत असताना पुण्यातील टिळक रोडवरील एसपी कॉलेज चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी एसपी कॉलेज चौकात लाईव्ह शपथविधीचे प्रक्षेपण केले. भरपावसात देखील मुरलीधर मोहोळ यांच्या शपथविधीचा भाजपा कार्यकर्त्यांनी फटाकडे फोडून जल्लोष केला.
-
मुरलीधर मोहळ यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
भाजपचे पुण्यातील नेते मुरलीधर मोहळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुणे महापालिका ते थेट केंद्रीय मंत्री असा मोहोळ यांचा प्रवास राहिला आहे. मोहोळ हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.
-
रक्षा खडसे केंद्रीय मंत्रीपदी, खान्देशात जल्लोष
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. रक्षा खडसे या रावेरमधून तीनदा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच खान्देशात प्रचंड जल्लोष करण्यात आला.
-
-
पराभूत नेत्याचीही मंत्रीपदी वर्णी
भाजपचे लुधियानातील पराभूत उमेदवार रवनीत सिंग बिट्टू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. बिट्टू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बिट्टू हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते तीनवेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपचा पंजाबमध्ये एकही खासदार निवडून आलेला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपने बिट्टू यांना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जात आहे.
-
मोदींचं सोशल इंजीनिअरिंग, दलित, ओबीसी नेत्यांना रेड कार्पेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात सोशल इंजीनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात 27 ओबीसी आणि 10 दलित खासदारांना मंत्री म्हणून संधी दिली आहे.
-
केरळचा एकमेव खासदार केंद्रीय मंत्रीपदी
सुरेश गोपी यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सुरेश गोपी हे केरळमधून निवडून आलेले भाजपचे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. सुरेश गोपी हे अभिनेते होते. अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. केरळमध्ये भाजप वाढवण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जात आहे.
-
अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, बीएल वर्मा यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ
अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, बीएल वर्मा यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
-
नित्यानंद राय यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
नित्यानंद राय यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
-
रामदास आठवले पुन्हा राज्यमंत्रीपदी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आठवले गेल्या दोन टर्मपासून मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
-
श्रीपाद नाईक मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी
श्रीपाद नाईक यांना मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
-
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
-
जितेंद्र सिंह, अर्जुनराम मेघवाल केंद्रीय मंत्रीपदी
जितेंद्र सिंह आणि अर्जुनराम मेघवाल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
-
सीआर पाटील आणि राव इंद्रजीत सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सीआर पाटील यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सीआर पाटील हे गुजरातमधील भाजपचे नेते आहेत. राव इंद्रजीत सिंह यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली.
-
चिराग पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चिराग पासवान हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे चिरंजीव आहेत
-
किरेन रिजीजू यांनी घेतील पद आणि गोपनीयतेची शपथ
किरण रिजीजू यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी रिजीजू मोदी मंत्रिमंडळात होते
-
अन्नपूर्णा देवी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अन्नपूर्णा देवी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. अन्नपूर्णा देवी या झारखंडमधून येतात. मोदी मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अन्नपूर्णा देवी पहिल्या महिला आहेत.
-
भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
भूपेंद्र यादव आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
-
ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्रीपदी
ज्योतिरादित्य सिंधिया यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. ज्योतिरादित्य यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
-
अश्विनी वैष्णव पुन्हा मंत्रिपदी
अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आलं आहे. वैष्णव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम केलं आहे.
-
गिरीराज सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बिहारचे दिग्गज नेते गिरीराज सिंह यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
-
प्रल्हाद जोशी यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ
प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकाच्या धारवाडमधून जोशी चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
-
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
-
सर्वानंद सोनोवाल केंद्रीय मंत्रिपदी
सर्वानंद सोनोवाल यांना मोदी मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालं आहे. त्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
-
राजीव रंजन सिंह मोदींच्या मंत्रिमंडळात
राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे.
-
जीतनराम मांझी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बिहारचे महत्त्वाचे नेते जीतनराम मांझी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते हिंदुस्थान आवाम मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
-
धर्मेंद्र प्रदान यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
मोदी मंत्रिमंडळात धर्मेंद्र प्रधान यांना स्थान देण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
-
पीयूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पीयूष गोयल यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोयल हे तीन वेळा राज्यसभेतील खासदार होते. यावेळी ते मुंबईतून विजयी झाले आहेत.
-
एचडी कुमारस्वामी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
कर्नाटकातील जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत.
-
मनोहरलाल खट्टर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
मनोहरलाल खट्टर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री होते.
-
डॉ. एस. जयशंकर केंद्रीय मंत्रीपदी
डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. जयशंकर यांनी या आधी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.
-
निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी
निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. सीतारामण यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या आधी मोदी मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या. यावेळी त्यांना कोणती जबाबदारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्रीपदी
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान पाचवेळा खासदार राहिलेले आहेत.
-
जेपी नड्डा यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. नड्डाही मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी
जेपी नड्डा यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. नड्डाही मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी
-
नितीन गडकरीही मोदींच्या मंत्रिमंडळात. मंत्रिपदाची घेतली शपथ
नितीन गडकरीही मोदींच्या मंत्रिमंडळात. मंत्रिपदाची घेतली शपथ
-
अमित शाह यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
अमित शाह यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, राजनाथ सिंह यांच्यानंतर शाह यांनी घेतली शपथ
-
राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांचा शपथविधी
-
नरेंद्र मोदी यांची शपथ घेताच जल्लोष
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनात एकच जल्लोष करण्यात आला
-
मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ… नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या सोहळ्यलाा देशविदेशातील तब्बल 8 हजार प्रमुख पाहुणे उपस्थित होते. देशातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि सफाई कामगारहीया सोहळ्याला उपस्थित होते.
-
राष्ट्रपती भवनात राष्ट्रगीताला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रगीत सुरू झाले
-
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं राष्ट्रपती भवनात आगमन
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं राष्ट्रपती भवनात आगमन झालं आहे. थोड्याच वेळात राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली जाणार आहे.
-
मोदीनंतर कोण कोण शपथ घेणार?, गडकरींचा नंबर कितवा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामण, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतनराम मांझी हे शपथ घेणार आहेत. एकूण 71 मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
-
शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात कोण कोण?
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपालचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.
-
मोदींचा शपथविधी सोहळा, रत्नागिरीत ढोलताशांचा गजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजपकडून रत्नागिरीत जल्लोष करण्यात येत आहे. ढोलताशांच्या गजरात भाजप कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पाहण्यासाठी शहरातील मारुती मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.
-
दिल्लीत शपथविधी, मुंबईत जल्लोष
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्याआधी कांदिवलीत भाजपकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जात आहे. कांदिवलीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांवर गरबा खेळताना मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा केला. भाजप कार्यकर्ते एकमेकांना मिठाई भरवून, फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत.
-
मुकेश अंबानी, नीता अंबानी, गौतम अदानी, शाहरुख खानही हजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला दिग्गज उपस्थित आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, गौतम अदानी आणि शाहरुख खानही या सोहळ्याला उपस्थित आहेत.
-
उत्तर प्रदेशाला सर्वाधिक मंत्रीपद, गुजरातचंही पारडं जड; महाराष्ट्राला किती?
गुजरात
1.अमित शाह
2.एस जयशंकर
3.मनसुख मंडाविया
4.सीआर पाटिल
5.नीमू बेन बंभनिया
हिमाचल
1.जे पी नड्डा
ओडिशा
1.अश्विनी वैष्णव
2.धर्मेंद्र प्रधान
3.जुअल ओरम
कर्नाटक
1.निर्मला सीतारमण
2.एचडीके
3.प्रहलाद जोशी
4.शोभा करंदलाजे
5.वी सोमन्ना
महाराष्ट्र
1.पीयूष गोयल
2.नितिन गडकरी
3.प्रतापराव जाधव
4.रक्षा खडसे
5.रामदास आठवले
6.मुरलीधर मोहोळ
गोवा
1.श्रीपद नाइक
जम्मू-कश्मीर
1.जितेंद्र सिंह
मध्य प्रदेश
1.शिवराज सिंह चौहान
2.ज्योतिरादित्य सिंधिया
3.सावित्री ठाकुर
4.वीरेंद्र कुमार
उत्तर प्रदेश
1.हरदीप सिंह पुरी
2.राजनाथ सिंह
3.जयंत चौधरी
4.जितिन प्रसाद
5.पंकज चौधरी
6.बी एल वर्मा
7.अनुप्रिया पटेल
8.कमलेश पासवान
9.एसपी सिंह बघेल
बिहार
1.चिराग पासवान
2.गिरिराज सिंह
3.जीतन राम मांझी
4.रामनाथ ठाकुर
5.ललन सिंह
6.निर्यानंद राय
7.राज भूषण
8.सतीश दुबे
अरुणाचल
1.किरन रिजिजू
राजस्थान
1.गजेंद्र सिंह शेखावत
2.अर्जुन राम मेघवाल
3.भूपेंद्र यादव
4.भागीरथ चौधरी
हरियाणा
1.एमएल खट्टर
2.राव इंद्रजीत सिंह
3.कृष्ण पाल गुर्जर
केरल
1.सुरेश गोपी
2.जॉर्ज कुरियन
तेलंगाना
1.जी किशन रेड्डी
2.बंदी संजय
तमिलनाडु
1.एल मुरुगन
झारखंड
1.संजय सेठ
2.अन्नपूर्णा देवी
छत्तीसगढ़
1.तोखन साहू
आंध्र प्रदेश
1.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
2.राम मोहन नायडू किंजरापु
3.श्रीनिवास वर्मा
पश्चिम बंगाल
1.शांतनु ठाकुर
2.सुकांत मजूमदार
पंजाब
1.रवनीत सिंह बिट्टू
असम
1.सर्बानंद सोनोवाल
2.पबित्रा मार्गेह्रिता
उत्तराखंड
1.अजय टम्टा
दिल्ली
1.हर्ष मल्होत्रा
-
रजनीकांत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याने दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आपण राष्ट्रपती भवनात आल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.
-
अक्षय कुमार, महादेव जानकर राष्ट्रपती भवनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेता अक्षय कुमार राष्ट्रपती भवनात दाखल झाला आहे. तसेच राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकरही कार्यक्रमस्थळी आले आहेत.
-
अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे राष्ट्रपती भवनात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंतप्रधान म्हणून शपथविधी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
-
सात देशातील पाहुणे शपथविधी सोहळ्याला हजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सात देशातील पाहुणे हजर आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवसह विविध देशाचे पंतप्रधान या सोहळ्याला आले आहेत. त्यासाठी दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी पाहा
राजनाथ सिंह- BJP- UP
अमित शाह- BJP- गुजरात
ललन सिंह-JDU-बिहार
पीयूष गोयल-BJP-महाराष्ट्र
प्रह्लाद जोशी- BJP- कर्नाटक
मनसुख मंडाविया-बीजेपी- कर्नाटक
ज्योतिरादित्य सिंधिया- BJP- MP
सर्वानंद सोनोवाल-BJP- असम
नितिन गडकरी-BJP- महाराष्ट्र
जुएल ओरम- BJP- ओडिशा
चिराग पासवान- LJPR-बिहार
एसपी सिंह बघेल-बीजेपी-UP
रामदास अठावले- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)- महाराष्ट्र
जयन्त चौधरी-राष्ट्रीय लोकदल-यूपी
शोभा करंदलाजे-BJP- कर्नाटक
पंकज चौधरी-BJP-UP
श्रीपद नाइक-BJP-गोवा
किरण रिजिजू- BJP-अरुणाचल
बीएल वर्मा- BJP-UP
कमलेश पासवान-BJP-UP
रवनीत बिट्टू-BJP-पंजाब
रामनाथ ठाकुर-JDU- बिहार
डीके अरुणा- BJP- तेलंगाना
एचडी कुमारस्वामी-JDS-कर्नाटक
एस जयशंकर- BJP-कर्नाटक
निर्मला सीतारमण- बीजेपी-कर्नाटक
भूपेन्द्र यादव-बीजेपी-राजस्थान
राव इंद्रजीत-BJP- गुड़गांव
गिरिराज सिंह-BJP- बिहार
धर्मेंद्र प्रधान -BJP- ओडिशा
अर्जुन राम मेघवाल-BJP-राजस्थान
अन्नपूर्णा देवी-BJP- झारखंड
कृष्ण पाल गुर्जर-BJP- हरियाणा
मनोहर लाल खट्टर-BJP- हरियाणा
हरदीप सिंह पुरी-BJP- यूपी
अश्वनी वैष्णव-BJP- ओडिशा
पवित्रा मार्घेरिटा-BJP- ओडिशा
नित्यानंद राय-BJP- बिहार
सुकांत मजूमदार-BJP- बंगाल
अनुप्रिया पटेल- अपना दल (सो.)- यूपी
सीआर पाटिल-BJP- गुजरात
एल मुरुगन-BJP- कर्नाटक
जितिन प्रसाद-BJP- यूपी
जितेन्द्र सिंह-BJP- जम्मू
राम मोहन नायडू- TDP- आंध्र प्रदेश
बंडी संजय-BJP- तेलंगाना
श्रीनिवास वर्मा-BJP- आंध्र प्रदेश
शिवराज चौहान-BJP- मध्य प्रदेश
पी. चन्द्रशेखर-TDP- आंध्र प्रदेश
हर्ष मल्होत्रा-BJP- दिल्ली
संजय सेठ-BJP-झारखंड
रक्षा खडसे-BJP-महाराष्ट्र
पीसी मोहन-BJP-कर्नाटक
जीतन राम मांझी- HAM- बिहार
सतीश दुबे-BJP- बिहार
राजभूषण निषाद-BJP-बिहार
बी सोमन्ना-बीजेपी-कर्नाटक
वीरेंद्र खटीक-BJP-मध्य प्रदेश
-
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर धीरज घाटेंकडून 100 किलो जिलेबी वाटप
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नागरिकांना 100 किलो जिलेबी वाटून हा जल्लोष साजरा केला जातोय.
-
शपथविधी सोहळ्याला 8 हजार पाहुणे दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला 8 हजार देशीविदेशी पाहुणे हजर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसर गर्दीने भरून गेला आहे.
-
दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता
9 आणि 10 जून रोजी दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 9 जूनपासून वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता असल्याचं आयएमडीने सांगितलं.
-
Narendra Modi Swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र सदनात बैठक
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र सदनात बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्रातून निवडून गेलेले सर्व खासदार उपस्थित होते.
-
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला खर्गे उपस्थित राहणार
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. पक्ष आणि मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी त्याच्या सहभागावर सस्पेंस होता.
-
Narendra Modi Swearing-in Ceremony: मुरलीधर मोहोळ यांची लॉटरी
पुण्यातील खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले आहे. पहिल्यांदाच खासदार, अन् सरळ मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ गेले आहेत….सविस्तर वाचा
-
Narendra Modi Swearing-in Ceremony : नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट,
भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी 2 मध्ये नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते….सविस्तर वाचा
-
Narendra Modi Swearing-in Ceremony : टीडीपीचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी नेमके कोण
5000 कोटींचा मालक, प्रथमच खासदार, आता मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार कोण आहेत टीडीपीचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी नेमके कोण आहेत? वाचा सविस्तर
-
राष्ट्रवादीला मंत्रिपद का नाही- फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद देणार होते. परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवे होते. एका पक्षासाठी एनडीएमधील निकष बाजूला ठेवता येणार नाही. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीला मंत्रीपद दिले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही मंत्री का नाही?
मोदी 3.0 मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी समारंभात प्रत्येक पक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद न मिटल्यामुळे पीएमओतून राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदार फोन गेला नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा, असे भाजप हायकंमाडने राष्ट्रवादीमधील नेत्यांना सांगितले आहे. सविस्तर वाचा
Published On - Jun 09,2024 3:13 PM