आज शहरभर.. ; चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. या मतदानाच्या दिवशी अभिनेते प्रवीण तरडे यांची फेसबुक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आज शहरभर.. ; चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
Pravin TardeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 10:02 AM

आज चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या 11 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. यापैकी शरद पवार गटाकडील शिरुर आणि एमआयएमकडील औरंगाबादची जागा वगळता सर्व विद्यमान खासदार महायुतीत असून या जागा कायम राखण्याचं आव्हान आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर अशी लढत आहे. गेल्या वर्षी कसब्याचा भाजपचा गड रवींद्र धंगेकर जिंकले होते. त्यामुळे काँग्रेससाठी ते हिरो बनले होते. आता त्यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पण धंगेकर यांना मोहोळ यांचं तगडं आव्हान आहे. अशातच मतदानाच्या दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

‘शहरभर मुरलीधर’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट बॉक्समध्ये काहींनी मुरलीधर मोहोळ यांची बाजू घेतली आहे तर काहींनी धंगेकरच निवडून येणार, असं म्हटलंय. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारानिमित्त पुण्यात काही दिवसांपूर्वी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा हजेरी लावली होती. तर प्रवीण तरडेंनी या सभेत केलेलं भाषण विशेष चर्चेत आलं होतं. यावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मतांनी जिंकून आणण्याचं आवाहन पुण्याच्या नागरिकांना केलं होतं.

हे सुद्धा वाचा

“मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी एवढंच सांगेन, दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो, पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भाजप पक्षाने पुणे शहराला दिलं आहे. त्यांना भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट ज्या लीडने जिंकून आले होते त्याच्यापुढे जाऊन जास्त मतदान करा. आपल्या मुरली अण्णाला मोठ्या डौलात दिल्लीत पाठवा”, असं प्रवीण तरडे भाषणात म्हणाले होते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.