परिपक्वता, नियंत्रण आणि वारसा… 2024मधील राहुल गांधींमध्ये बदल झालाय?

गांधी कुटुंब आणि काँग्रेसच्या अंगणात एका लाजाळू मुलाची तोडकीमोडकी हिंदी आता एक परिपक्व राजकीय भाषा बनली आहे. या नव्या आवतारात पार्टीवर नियंत्रणही आहे आणि राजकीय कौशल्य सुद्धा आहे.

परिपक्वता, नियंत्रण आणि वारसा... 2024मधील राहुल गांधींमध्ये बदल झालाय?
Rahul Gandhi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 2:02 PM

राजकारणाच्या आरशातील प्रतिमा कधीच स्थिर नसतात. त्यातील चित्र सातत्याने बदलत असतं. आपण ज्याला जे समजतो तो वेगळाच निघतो. प्रतिमा बनणे आणि बिघडणे हे राजकारणातील घड्याळात नियती सारखं आहे. या नियतीच्या घड्याळात कधी एकचा गजर होतो, कधी 6चा गजर होतो, तर कधी 12 ही वाजतात.

राहुल गांधी आता चष्मा लावत नाहीत. परंतु लोकांच्या मनातील त्यांची पहिली छवी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रेतील आहे. इंदिरा गांधी यांच्या पार्थिवाशेजारी चष्मा घातलेला एक छोटा मुलगा उभा आहे. फ्रेम बदलते, चष्मा राहतो. राजीव गांधी यांच्या पार्थिवाशेजारी उभे असतानाही राहुल गांधी यांच्या डोळ्यावर चष्मा आहे. तेव्हा राहुल याच चष्म्यातून जग पाहत होते. राहुल यांचा चेहरा त्यांचा आपला आहे. त्यावर चष्मा आहे. नुकसान वैयक्तिक आहे. जग वैयक्तिक आहे. काहीच राजकीय नाही, फक्त आजूबाजूचे लोक तेवढे राजकीय आहेत.

rahul gandhi

rahul gandhi

त्यानंतर राहुल हे 90 च्या दशकातील शेवटच्या वर्षातील राहुल आहेत. आईसाठी मते मागणारे. बहीण प्रियंका गांधीमध्ये लोक भविष्यातील इंदिरा गांधी पाहत होते आणि राहुल यांच्यात राजकारणाबाबतचा संकुचितता. याच संकुचिततेतून राहुल गांधी यांनी राजकारणाच्या मंचावर पाऊल ठेवलं. हिंदीचा अभाव, गर्दीत असहज असणं, समज आणि समजावण्याचा दुष्काळ आणि तात्काळ निर्णय घेण्याचा अभाव. पण राहुल रोड शोमध्ये चेहरा बनू लागले. 2004मध्ये अमेठीतून काँग्रेसचे उमदेवार बनले. अमेठीतून लढणं सर्वात सोपं होतं. राहुल जिंकलेही. 2014पर्यंत विजयाचा रथ उधळत होता. तीन वेळा ते अमेठीतून खासदार म्हणून निवडून आले.

याच काळात कुटुंब आणि पक्षाने त्यांच्यावर 2007मध्ये एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपवली. तसेच पार्टी महासचिव पदाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली. राहुल यांनी लिंगदोह यांच्या शिफारशीनुसार विद्यार्थी संघटनेत अनेक प्रयोग केले, पण दुर्देवाने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. महासचिव म्हणून त्यांची एक गोष्ट लक्षात राहिली. ती म्हणजे मनमोहन सरकारचा अध्यादेश फाडणं. शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना रोखणारा हा निर्णय होता. पण राहुल यांनी हा अध्यादेश फाडून मनमोहन सिंग यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमाच ढासळून टाकली होती.

वारश्याचा दुस्वास

नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांच्या नेतृत्वानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आता रुळली होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातच सत्तेची 10 वर्ष काँग्रेसने भोगली. पण त्याच काँग्रेसला आता राहुल गांधी वारस म्हणून आपलेसे वाटत नव्हते. राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर शेरेबाजी केली जाऊ लागली. राहुल यांच्या क्षमतेवर सवाल केले जाऊ लागले. राहुल गांधी राजकारणाकडे गंभीरपणे पाहत नाही अशी चर्चा घडवून आणली जाऊ लागली. त्यातच अण्णा हजारे यांचं आंदोलन सुरू झालं आणि विरोधकांनी उरलेली कसर भरून काढली. विरोधकांनी सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला. राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन केल्या गेली. राहुल गांधी सोशल मीडियात टिंगलटवाळीचा विषय झाले.

rahul gandhi

rahul gandhi

दुसरीकडे आपल्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राहुल गांधी पक्षाच्या आत आणि बाहेर संघर्ष करत होते. या काळात काँग्रेस आळसावलेला होता. ग्राऊंडवर कार्यकर्ते नव्हते आणि डोक्यावर अनेक नेते बसलेले. या ओल्डगार्डमुळे राहुल यांना राजकारण करणं कठिण जात होतं. 2014मध्ये पक्ष हारल्यानंतर राहुल यांनी नवीन काँग्रेस उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, एकामागोमाग होणारे पराभव, मोदींचा करिश्मा आणि सलग अपयशी होणारे रिफॉर्म यामुळे राहुल गांधी अजूनच घेरले गेले. काही नेत्यांनी तर पक्षत्याग केला. काहींनी तर कधी सोनिया गांधी तर कधी प्रियंका गांधी याच जनतेची पसंत असल्याचं सांगत राहुल यांना आडवळणाने विरोध कायम ठेवला.

राहुल या काळात विरोधकांसाठी पप्पू आणि पक्षासाठी अडचण होत होते. 2013मध्ये पार्टीचे उपाध्यक्ष आणि नंतर 2017मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी पोहोचले. परंतु, 2019च्या पराभवानंतर विद्रोहाला वाट मोकळी करून दिली. राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कोपभवनमध्ये निघून गेले. एव्हाना हातातून अमेठीची सीटही गेली होती. काँग्रेसमधील फूट आता दरवाज्यात आली होती.

किती तरी चेहरे आहेत. कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, संदीप दीक्षित, गुलाम नबी आझाद, आरपीएन सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, कॅप्टन अमरिंदर सिंग, वीरेंद्र सिंह, अश्विनी कुमार, एसएम कृष्णा, अशोक चव्हाण… हे लोक एक तर पार्टीतून मुक्त झाले तर काहींनी बंड केलं. निवडणुकीतही राहुल गांधी यांचे प्रयोग चालले नाहीत. लोकांनी स्वीकारले नाही. काँग्रेस आणि राहुल सतत कमकुवत होत गेले.

भारत यात्रा आणि सामाजिक न्याय

राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासात भारत जोडो यात्रा हा एक महत्त्वाचा टप्पा बनला. आतापर्यंत राहुल चष्म्यातच होते. परंतु आता चष्मा काढण्याची वेळ आली. डोळ्यावरून नाही, नजरेतून. जुन्या फ्रेममधून बाहेर पडत राहुल यांनी देश, समाज आणि जनतेला नव्याने पाहण्यास सुरुवात केली. याच यात्रेमुळे देशाबाबतची त्यांची धारणा बदलली आणि त्यांच्याबाबतची देशाची. सफेद टी शर्ट घातलेला हा तरुण काही तरी करत आहे, असं लोकांना पहिल्यांदाच वाटलं. या विस्कटलेल्या आणि वाढलेल्या दाढीमध्ये लोकांना प्रामाणिकपणा दिसून आला. राहुल यांच्याबाबत तयार झालेला निगेटिव्ह नरेटीव्ह आता ढासळू लागला होता.

दुसरा मोठा मंत्र बनला सामाजिक न्याय. महिला, मागासवर्ग, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि गरिबांचे अधिकार आणि हितांना राहुल यांनी आपली भाषा बनवलं. राहुल यांचा नरेटिव्ह आता एक प्रो-पीपल नरेटिव्ह आहे. राहुल कार्पोरेटवर हल्ला चढवतात. भीख नव्हे तर अधिकार देणाऱ्या परिवर्तनाची भाषा करतात. धोरणात्मक भ्रष्टाचारावर सवाल करतात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी बुस्टर घोषणापत्र तयार करतात. या सर्वांमध्ये एक मोठा शब्द आहे, तो म्हणजे जातींवरील अन्याय, संविधानाचं रक्षण आणि आरक्षणावरील हल्ले रोखणं.

देशाची एक मोठा वर्ग या नरेटिव्हशी रिलेट आहे. या रिलेटिव्हिटीतून जी सहजता येते, त्यामुळे लोक हळूहळू राहुल यांच्याशीही रिलेट करतात. हे विनाकारण घडत नाहीये. तर गेल्या काही काळापासून राहुल गांधी आणि काँग्रेसकडे मुस्लिम मते येत आहेत. दलितांचे मोठ मोठे नेते शरणागती पत्करताना दिसत असताना देशातील हा सर्वात मोठा वर्ग राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवताना दिसत आहे. राहुल गांधी काही तरी करतील असं त्यांना वाटत आहे. जातींत गुरफटून न जाता पुढे जाण्याचे दावे केले जात असल्याच्या काळात जाती ज्या सामाजिक न्यायाचं आपल्या काळजात घर करून ठेवते, त्यासाठी राहुल गांधींनी मशाल हाती घेतली आहे.

2024मधील राहुल

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी एका नव्या भूमिकेत लोकांच्या समोर आले. चष्मा निघून गेला आहे. धूळ साचली आहे. पार्टीतील विरोधाने एक तर शरणागती पत्करली आहे, नाही तर निवडणुकीत पराभूत होऊन शेवटची संधीही गमावून बसला आहे. आई-वडिलांच्या काळापासूनचे अनिवार्य चेहरे आता नेपथ्यात गेले आहेत. वारसा असलेली अनेक घराणी नतमस्तक झाली आहेत वा पंगू तरी झालीत. आता राहुल यांचीच विचारधारा ही काँग्रेसची विचारधारा आहे. राहुल यांचा विचारच काँग्रेसचा नरेटिव्ह आहे. आता सर्व काही राहुल यांच्या अवतीभोवती आलेलं आहे.

आजची काँग्रेस ही राहुल यांची काँग्रेस आहे. राहुल यांचे लोकच आता काँग्रेसचं संघटन सांभाळत आहेत. जुने मॅनेजर आता फक्त बैठकांपुरते शिल्लक राहिले आहेत. हळूहळू तिथेही गर्दी कमी होईल. नवीन चेहरे पक्षात आपलं स्थान मजबूत करत आहेत. राज्यात हे नवे चेहरे उदयाला आले आहेत. केंद्रीय समितीतही त्यांचं प्रतिनिधीत्व वाढलं आहे. आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी एकजीव झाले आहेत. जुनी कात टाकून पुढे जाताना दिसत आहेत.

15 वर्षातील ही पहिलीच निवडणूक असेल ज्यात राहुल आणि पप्पू शब्दाचा एकत्रित वापर केला गेला नाही. राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत, त्यांची अशी अवहेलना केल्यावर नुकसानच होणार आहे, हे विरोधक आणि विरोधी पक्षांना कळून चुकलं आहे. सोशल मीडियावर राहुल यांना ऐकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. टीव्हीवरील काँग्रेसच्या जाहिराती यावेळी भाजपवर वरचढ ठरल्या. जुन्या मुलाखतीच्या रिल्सच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी जी ट्रोलिंग पहिल्या निवडणुकीपर्यंत झेलली होती, त्यामुळे यावेळी मीडिया राहुल यांच्या मुलाखतीपासून वंचित राहिला. राहुल यांनी अशा प्रकारे मीडियाला वंचित ठेवलं आणि एक कठोर संदेशही दिला.

उत्तर प्रदेशातील लोकमतात राहुल यांची मोठी भूमिका आहे. दलितांना समाजवादी पार्टीपर्यंत खेचून आणणं सोपं नव्हतं. पीडीए फॉर्म्युला अखिलेश यादव यांच्यासाठी रामबाण होता, पण त्याचा पूल सांधण्याचं काम राहुल यांनीच केलं. संविधान आणि आरक्षणाचा नरेटिव्ह दलितांमध्ये मुद्दा तर बनला होता, पण दलित मते समाजवादी पार्टीकडे शिफ्ट करने हे सर्वात मोठं आव्हान होतं. राहुल यांनी ते काम सोप्पं केलं.

Rahul Gandhi

Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी

उत्तर प्रदेशात गेल्या दहा वर्षात मुस्लिम मतांची विभागणी झालेली पाहायला मिळाली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये गटांगळ्या खात असलेल्या या व्होट बँकेने काँग्रेसकडे पाठ फिरवली होती. अखिलेश यादव यांनी या मूड शिफ्टचा अंदाजा घेऊन 2024च्या सुरुवातीला सपा आणि काँग्रेसच्या फेल झालेल्या प्रयोगाला पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे मुस्लिम मते या आघाडीकडे आली. मुस्लिमांनी सपाला साथ दिली. कारण काँग्रेस समाजवादी पार्टीच्या सोबत खंबीरपणे उभी होती.

आज काँग्रेस पुन्हा मजबूत झालीय. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालंय, पण तिथेही पॉवर बॅलन्स दिसत आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस अधिक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उभा राहील. राहुलच त्यांचे नायक असतील. राहुल यांच्यासमोर आव्हानं नाहीत आणि त्यांच्यात काही उणीवाच नाहीत, असं नाहीये. पण राजकारणात एक आदर्श असावा लागतो. राजकारणाच्या चष्म्याच्या बाहेर जाऊन पाहिलं पाहिजे. दूरपर्यंत पाहणं आवश्यक असतं. पाहत राहणंही महत्त्वाचं असतं. मोहब्बतची दुकान आता सुरू झालीय आणि ती आता नव्या ग्राहकांची वाट पाहत आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.