Exit Poll 2024 आधी उत्सुक्ता शिगेला, महाराष्ट्रात कोण? प्रसिद्ध विश्लेषक संजीव उन्हाळेंच भाकीत काय? Video

प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी एक्झिट पोल जाहीर होण्याआधी काही भाकीत वर्तवली आहेत. महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? महायुती की, महाविकास आघाडी? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. दरम्यान संजीव उन्हाळे यांनी महाराष्ट्र आणि देशाबद्दल काही अंदाज वर्तवले आहेत.

Exit Poll 2024 आधी उत्सुक्ता शिगेला, महाराष्ट्रात कोण? प्रसिद्ध विश्लेषक संजीव उन्हाळेंच भाकीत काय? Video
Poll prediction
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 1:33 PM

“महाराष्ट्रातील लोकभावना आघाडीच्या बाजूने आहे. पण ऐन निवडणुकीत काही मतदारसंघात त्यांनी जे कार्यक्रम केले, त्यामुळे काही बदल होऊ शकतो. ज्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार वीक तिथे महायुतीला जागा मिळू शकतात” असं प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांचं मत आहे. ‘2014, 2019 मध्ये भाजपाचा एक मतदार तयार झाला, हे मान्य केलं पाहिजे’, असं ते म्हणाले. “निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विधान केली, त्यामुळे जनमत सातत्याने बदलत गेलं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरुन जी विधान केली, त्यामुळे मुस्लिम मत एकगठ्ठा झाली. संविधानाबद्दल विरोधीपक्षांनी जी शंका व्यक्त केली, त्या शंकेमुळे संविधान बदलणार असं दलित समाजाच मत झालं. 400 पार जाहीर करतान समोर लक्ष्य असाव, हा भाजपा हेतू असू शकतो. पण 400 पारमुळे संविधान बदल करतील हे भाजपाच्या अंगलट आलं” असं संजीव उन्हाळे म्हणाले.

“तुमच मंगळसूत्र काढून घेणार, तुमचं सोन काढून घेणार. लोक शहाणे झालेत. महात्मा गांधी हे गांधी चित्रपटानंतर माहिती झाले, हे हास्यास्पद आहे. त्यातून भाजपाचा खरा चेहरासमोर आला” असं संजीव उन्हाळे यांनी म्हटलय. “जिथे प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत. अखिलेश यादव, केजरीवाल त्या सगळ्या ठिकाणी मतदानामध्ये इंडियाने आघाडी घेतली आहे” असं संजीव उन्हाळे यांचं मत आहे. उत्तर प्रदेशात 5 ते 7 टक्के मतदानाचा फरक पडला तरी, ते भाजपाकडे टर्न होऊ शकतं” असं संजीव उन्हाळे यांना वाटतं. ‘भाजपासाठी ही निवडणूक केक वॉक नाही’

“इलेक्शन कमिशन रात्री जे मतदानाचे आकडे जाहीर करायचं, त्यानंतर जाहीर होणाऱ्या आकड्यांमध्ये फरक असायचा. याची राष्ट्रपतींकडे तक्रार केली. त्याची काय दखल घेतली?. शेवटच्या क्षणी झालेल्या मतदानाने फरक पडणार” असं संजीव उन्हाळे म्हणाले. “भाजपासाठी ही निवडणूक केक वॉक नाही. ही निवडणूक अटी-तटीच राहील. भाजपा सगळ्याठिकाणी फेल होईल असं म्हणणार नाही. पण भाजपा सर्वात मोठा पक्ष राहणार. सगळे पक्ष एकत्र आल्याने इंडियाच आघाडीचा आवाज मोठा होईल. भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही. 400 पार म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने पाहण्यासारख झालं. या निवडणुकीत सात टप्पे झाले. सत्तेच्या जवळ जातील, एवढी बेगमी ते करतील” असं संजीव उन्हाळे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.