AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Election Final Result 2024 : बदल नाही प्रणिती शिंदे यांचा बदला! आमदारांच्या लढाईत सोलापूरमध्ये पुन्हा शिंदेशाही विजयी

Solapur Lok Sabha Election Results 2024 News in Marathi : सोलापूर लोकसभेत वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या आमदार कन्या प्रणिती शिंदे रिंगणात उतरल्या होत्या. तर, भाजपने राम सातपुते या आमदारांना उमेदवारी देत त्यांच्यासमोर कडवे आव्हान दिले होते.

Solapur Election Final Result 2024 : बदल नाही प्रणिती शिंदे यांचा बदला! आमदारांच्या लढाईत सोलापूरमध्ये पुन्हा शिंदेशाही विजयी
solaur Lok Sabha Election Results 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 5:00 PM

सोलापूर : सोलापूर मतदारसंघातून (Solapur loksabha Constituency) काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Congress Candidate MLA Praniti Shinde) यांची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भाजपचे राम सातपुते (BJP Candidate MLa Ram Satpute) यांच्यापेक्षा 44,636 अधिक मते घेऊन त्या पुढे आहेत. प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 17 व्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना 4,77,173 आणि भाजपचे राम सातपुते यांना 4,32,537 मते मिळाली आहेत. सोलापूर मतदार संघात यावेळी 53.91 टक्के मतदान झाले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी विधानसभेतील दोन प्रतिस्पर्धी आमदार एकमेकांविरोधात निवडणूक लढवीत होते. भाजपने या निवडणुकीत विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना डावलून आमदार राम सातपुते  यांना उमेदवारी दिली होती. सोलापूर हा मतदार संघ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. 1998 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून गेले. 2003 मध्ये त्यांना लोकसभेची टर्म पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या  जागेवर पोटनिवडणुक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांना भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी विजय मिळविला. 1998 ते 2009 या काळात त्यांनी सोलापूरमधून विजय खेचून आणला होता. 2014 मध्ये मात्र या विजयी परंपरेला छेद मिळाला. देशात मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे निवडून आले. नंतर 2019 च्या निवडणुकीतही शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला होता. सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे यांनी जिद्दीने निवडणूक लढवून वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला.

दुसरीकडे भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देऊन मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची परंपरा कायम ठेवली. शरद बनसोडे (2014), जयसिद्धेश्वर स्वामी ( 2019) आणि  2024 च्या निवडणुकीत आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तसेच, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे

आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदार संघ 2009 मध्ये तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 34 हजार मतांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये मतांची आघाडी घसरून 9 हजारांवर आली. मात्र, 2019 मध्ये पुन्हा 13 हजारांनी लीड वाढला.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.