ठाणे, कल्याण, भिवंडी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल Final Results 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विजयी
Thane Konkan Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आज अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. ठाणे-कोकण विभागात ठाणे, कल्याण, भिवंडी,पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकालाचे सर्व अपडेट्स वाचा इथे..
लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज , 4 जून रोजी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी होणार आहे. ठाणे-कोकण मतदारसंघात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे-कोकण विभागात ठाणे, कल्याण, भिवंडी,पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकालाचे सर्व अपडेट्स वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : भिवंडीत सुरेश म्हात्रे केंद्रीय मंत्री कपिल पाटलांवर पडला भारी
भिवंडी मतदार संघात अनपेक्षित निकाल लागला. भाजपाचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांच्यात चुरशीची लढाई झाली. शेवटच्या टप्प्यात बाल्या मामाने 66121 मतांनी विजय मिळवला. बाल्या मामा यांना 4 लाख 99 हजार 464 मतं पडली. तर कपिल पाटील यांना 4 लाख 33 हजार 343 मतं पडली.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 :ठाण्यात एकनाथ शिंदेंचा खास माणूस जिंकला, म्हस्केंचा 2 लाखांहून अधिक मतांनी विजय
ठाण्यात शिवसेनेकडून एकनाथ म्हस्के आणि ठाकरे गटाकडून राजन विचारे मैदानात होते. या दोघांमध्ये पहिल्या फेरीपासून चुरशीची लढाई होती. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात नरेश म्हस्केंनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला. नरेश म्हस्केंना 7 लाख 34 हजार 231 मतं पडली. तर राजन विचारे यांना 5 लाख 17 हजार 220 मतं पडली. नरेश म्हस्के यांनी 2लाख 17 हजार 11 मतांनी विजय मिळवला.
-
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : सुरेश म्हात्रे यांचा दणदणीत विजय
भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा दणदणीत विजय झाला आहे.
-
रायगड निवडणूक निकाल 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विजयी
रायगड मतदारसंघ निहाय निकाल 2024 : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांना पराभूत केले.
-
पालघर निवडणूक निकाल 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघात हेमंत सावरा प्रचंड मताधिक्याने विजयी
पालघर मतदारसंघातून डॉ. हेमंत सावरा यांनी 1 लाख 83 हजार 386 मतांची प्रचंड आघाडी मिळवली आहे. हेमंत सावरा यांना 6 लाख oo हजार 208 मते मिळाली आहेत. तर भारती कामडी 4 लाख 16 हजार 822 मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील 2 लाख 54 हजार 011 मते घेतली.
-
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : सुरेश म्हात्रे 68 हजार मतांनी आघाडीवर
भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसताना दिसत आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा 68 हजार मतांनी आघाडीवर आहे.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : श्रीकांत शिंदे यांचा विजय, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभूत
कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना पराभूत केलं आहे.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी, राजन विचारे यांचा पराभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड राखण्यात यश आलं आहे. ठाण्यातून शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला आहे.
-
पालघर निवडणूक निकाल 2024 : पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा आघाडीवर
पालघर मतदारसंघ निहाय निकाल 2024 : पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना पिछाडीवर टाकून म्हात्रे यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : भिवंडीमध्ये कपिल पाटील मागे, सुरेश म्हात्रे 56150 आघाडीवर
भिवंडी मतदारसंघ निहाय निकाल 2024 : भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आघाडीवर आहेत. भाजपचे कपिल पाटील यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकून म्हात्रे यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. 12 फेरीत बाळ्या मामा 56150 मतांनी आघाडीवर आहेत.
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे आघाडीवर
भिवंडी मतदारसंघ निहाय निकाल 2024 : भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आघाडीवर आहेत. भाजपचे कपिल पाटील यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकून म्हात्रे यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्केंची विजयाच्या दिशेने घोडदौड
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्केंची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. राजन विचारे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे नरेश म्हस्के हे 140957 मतांनी आघाडीवर आहेत.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आघाडीवर
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांना त्यांनी पिछाडीवर टाकले.
-
रायगड निवडणूक निकाल 2024 : रायगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आघाडीवर
रायगड मतदारसंघ निहाय निकाल 2024 : रायग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या अनंत गीते यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. तटकरे 80840 मतांनी आघाडीवर आहेत.
-
सिंधुदुर्ग निवडणूक निकाल 2024 : सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे 45 हजार मतांनी आघाडीवर
सिंधुदुर्ग मतदारसंघ निहाय निकाल 2024 : सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे 45 हजार मतांनी आघाडीवर आहेत. विनायक राऊत यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यात नरेश म्हस्के १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या राजन विचारेंना मागे टाकून नरेश म्हस्के 112884 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Kalyan election result 2024 : कल्याण लोकसभेच्या चार मशीन मध्ये तांत्रिक बिघाड
कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी दरम्यान चार मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे आकडेवारी दाखवत नसल्याने व्हीव्हीपॅड मधील मतपत्रिका मोजली जाणार आहे.
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : भिवंडीमध्ये पवार गटाचे सुरेश म्हात्रे आघाडीवर, कपिल पाटीलना धक्का
भिवंडी मतदारसंघ निहाय निकाल 2024 : भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांनी भाजपच्या कपिल पाटील याना मोठा धक्का दिला आहे. भिवंडीत सुरेश म्हात्रे हे 16 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यात नरेश मस्के आघाडीवर, राजन विचारे यांना टाकलं मागे
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यात शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के आघाडीवर आहेत. ते तब्बल 70963 मतांनी आघाडीवर आहेत.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 70 हजार मतांनी पुढे, दरेकरांची पिछाडी कायम
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : कल्याणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे 70 हजार 232 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची पिछाडी कायम आहे.
-
सिंधुदुर्ग निवडणूक निकाल 2024 : सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे 4 हजार मतांनी आघाडीवर
सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे 4 हजार 239 मतांनी आघाडीवर आहेत. राणे आणि विनायक राऊत यांच्यात काटे की टक्कर होत आहे.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : श्रीकांत शिंदेंची मोठी आघाडी, वैशाली दरेकरांना धक्का
भिवंडी मतदारसंघ निहाय निकाल 2024 : कल्याणध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. श्रीकांत शिंदे हे २ लाख ६२ हजार ५७६ मतांनी आघाडीवर असून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
-
भिवंडी निवडणूक निकाल 2024 : भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे आघाडीवर
भिवंडी मतदारसंघ निहाय निकाल 2024 : भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे हे आघाडीवर आहेत. सुरेश म्हात्रे हे 6,941 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे कपिल पाटील हे त्यांच्याविरोधात उभै आहेत.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची आघाडी कायम
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : कल्याणमध्ये मतमोजणी सुरू असून शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. ते तब्बल 79 हजार मतांनी आघाडीवर आहेत. वैशाली दरेकर त्यांच्याविरोधात लढत देत आहेत.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : कल्याणमध्ये मतमोजणी सुरू असून शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. ते 524 मतांनी आघाडीवर आहेत.
-
सिंधुदुर्ग निवडणूक निकाल 2024 : सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर
सिंधुदुर्ग मतदारसंघ निहाय निकाल 2024 : सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे 1203 मतांनी आघाडीवर आहेत. विद्यमान खासदार विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यात नरेश म्हस्के यांची आघाडी कायम
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यात 5व्या फेरीत नरेश म्हस्के यांची आघाडी कायम आहे. 1448 मतांनी नरेश मस्के हे आघाडीवर आहेत.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाणे मतदारसंघातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के आता आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे राजन विचारे सध्या पिछाडीवर आहेत. 613 मतांनी नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
-
रायगड निवडणूक निकाल 2024 : रायगडमध्ये सुनील तटकरे पुढे
रायगड मतदारसंघ निहाय निकाल 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. काही वेळापूर्वी आघाडीवर असलेले ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आता पिछाडीवर गेले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत.
-
कल्याणमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणी थांबवण्यात आली
कल्यामध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काही काळासाठी मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
-
रायगड निवडणूक निकाल 2024 : रायगडमधून अनंत गीते आघाडीवर
रायगड मतदारसंघ निहाय निकाल 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात झाली असून ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आघाडीवर आहेत.
-
ठाणे निवडणूक निकाल 2024 : ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर
ठाणे मतदारसंघ निहाय निकाल 2024 : ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर असून शिंदे गटाचे नरेश म्हस्के त्यांच्याविरोधात उभे आहेत.
-
पालघर निवडणूक निकाल 2024 : पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी आघाडीवर
पालघर मतदारसंघ निहाय निकाल 2024 : पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी आघाडीवर आहेत. भाजपचे डॉ. हेमंत सावरा हे त्यांच्याविरोधात उभे आहेत.
-
सिंधुदुर्ग निवडणूक निकाल 2024 : सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत
सिंधुदुर्ग मतदारसंघ निहाय निकाल 2024 : सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची लढत आहे.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : शिवसेना शिंदे गट उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या वैशाली दरेकर यांच्याविरोधात त्यांची लढत आहे.
-
Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाण्यातील न्यू होरायझन स्कूल या ठिकाणी मतमोजणी होणार
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाण्यातील न्यू होरायझन स्कूल या ठिकाणी मतमोजणी होणार. 8 वाजता पोस्टल मतमोजणी सुरू होणार, त्यानंतर त्यानंतर evm मशीनची मतमोजणी होईल.
-
कल्याण लोकसभेत एनडीए आणि इंडिया आघाडीची बॅनर बाजी
कल्याण लोकसभेत एनडीए आणि इंडिया आघाडीची बॅनर बाजी सुरू आहे. एनडीए कडून विजयाअगोदरच श्रीकांत शिंदे याचे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे लागले बॅनर. तर 100% विजय… ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है अशा आशयाचे बॅनर इंडिया आघाडी कडून लावण्यात आले आहेत.
-
ठाण्याचा गड कोण राखणार ?
लोकसभा निवडणबक मतमोजणी सुरू होण्यास आता अवघा काही वेळच उरला आहे. ठाण्यात यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीतर्फे शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के वि. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे, यांच्यात कांटे की टक्कर पहायला मिळाली. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : कल्याण लोकसभेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष, डोंबिवलीच्या क्रीडा संकुलामध्ये थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी थोड्याच वेळात डोंबिवलीच्या क्रीडा संकुलामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदानाची मोजणी २९ फेऱ्यामध्ये होणार असून यासाठी ८४ टेबलवर एकाच वेळी मोजणी सुरू केली जाणार आहे.
-
कल्याण निवडणूक निकाल 2024 : कल्याणमध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल ?
कल्याण मतदारसंघ निहाय निकाल 2024 : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे की शिवसेना उबाठा गटाच्या वैशाली दरकेर, यांच्यापैकी कोण बाजी मारणार ? विजयाचा गुलाल कोण उधळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Published On - Jun 04,2024 6:43 AM