महायुतील घटक पक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत यश कमी मिळाल्याने चर्चेसाठी बैठक होणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ऑनलाईन उपस्थित राहणारे आहेत. दरम्यान मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेण्यात आली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतल्यानंतर मनसेकडून घोषणा करण्यात आली. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अिजत पवार हे दिल्लीत दाखल झाले असून त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी एनडीचे प्रमुख नेते नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जेपी नड्ड यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची बैठक संपली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार आणि आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. गिरीश महाजन यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून देंवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील निवासस्थानी अमित शाह यांच्यासह फडणवीस यांची बैठक सुरु आहे. आता या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला गेला आहेत. महाराष्टात महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन फडणवीस मोकळे होऊ इच्छितात. याबाबत ही बैठक असल्याचं म्हटलं जात आहे.
ससुन रुग्णालयाचे डॅाक्टर तावरे, डॅाक्टर हळणोर आणि शिपाई घटकांबळे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अमर गायकवाड या आरोपीला देखील पोलिसांनी कोर्टात हजर करत न्यायालयीन कोठडी मागितली आहे. अमर गायकवाडला १० जुन पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन पोलिसांनी त्याची आज न्यायालयीन कोठडी मागितली. कोर्टाने अमर गायकवाड १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. गायकवाड डॅाक्टरांना पैसे देण्या प्रकरणात आरोपी आहे. त्याला आणि अशपाक मकानदार यांना ४ जूनला अटक करण्यात आली होती.
एकनाथ शिंदे गटाला एनडीएच्या सरकारमध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 5 खासदारांमागे एक मंत्रिपद असा निकष असल्याचं म्हटलं जात आहे. मंत्रिपदासाठी श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. एनडीएच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय.
तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले.
एनडीएकडून राष्ट्रपतींकडे समर्थनाचे पत्र सादर करण्यात आले आहे. अमित शहा, जे पी नड्डा आणि राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे समर्थन पत्र सादर केले आहे. पत्रा मधून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता होणार मोदी सरकारचा शपथविधी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दाखल. अजित पवार , देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहांना भेटायला जाण्यापूर्वीची एकत्र बैठक होत आहे.
आम्हाला अजून मागितलेल्या जागा मिळ्याल्या असता तर मोदींना चांगला डॅमेज केला असता. तेवढे शक्य नाही मात्र देश आमचा आहे असं म्हणत होते त्या मोदींनाही फटका बसला आहे. आता कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला पुढे यावे लागणार आहे. उद्या दिल्लीला जायचं आहे खासदारांनी आपली बॅग भरून ठेवावी. मात्र ती कपड्याची असाव्या मात्र एकनाथ शिंदे सारखे नको. एकनाथ शिंदे यांना नाना पटोले यांचा ठेवला टोला
नाना पटोले याच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले, त्याचे आभार. असे मोठे विधान पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राणे 50 हजारने निवडून गेले त्यांचाही प्रचार प्रामाणिक केला. राज्यात वातावरण चुकीचे जात आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले.
कॉंग्रेसकडून देशाला दिशाभूल करण्याचे काम करण्यात आल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एनडीएची युती सर्वात यशस्वी असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
10 वर्षानंतरही कॉंग्रेस 100 चा आकडा गाढू शकली नाहीये, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
नुकताच नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य केले आहे. मोदी म्हणाले की, राज्यांमध्ये केंद्र शासनाची आणि राज्याची स्पर्धा असावी
“मी देशवासियांना सांगेन की, आईच्या वाढदिवशी किंवा इतर शुभ दिवस असेल तर एक तरी झाड लावा. आई असेल तर तिला सोबत घेऊन जा किंवा नसल्यास त्यांचा फोटो सोबत घेऊन झाड लावा,” असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
नरेंद्र मोदी- आपण दहा वर्षात जो विकास केला तो फक्त ट्रेलर आहे. ते माझं निवडणुकीचं भाषण नव्हतं. आपल्याला वेगाने विकास करायचा आहे. आपणच आपलं रेकॉर्ड तोडावं असं जनतेला वाटत आहे.
नरेंद्र मोदी- एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, अॅस्पिरेशनल इंडिया. आमच्याकडे हे सर्व पूर्ण करण्यासाठी रोडमॅप आहे. इंडिया आघाडीची ओळख घोटाळ्यांचीच आहे. नाव बदललं तरी ओळख मात्र तीच आहे. जनतेनं त्यांच्या याच ओळखीला नाकारलं आहे.
नरेंद्र मोदी- देशाला फक्त आणि फक्त एनडीएवरच विश्वास आहे. इतका विश्वास आहे म्हणजे स्वाभाविकच लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतील. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करू. आम्हाला आणखी जलद गतीने देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.
नरेंद्र मोदी- यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर हा निकाल म्हणजे एनडीएचा महाविजय आहे, हेच लोक सांगतील. जगही हे मान्य करेल. याआधीसुद्धा एनडीए होती, आजसुद्धा एनडीए आहे आणि उद्यासुद्धा एनडीएच राहील. दहा वर्षांनंतरही काँग्रेसने १०० च्या आकड्यालाही स्पर्श केला नाही.
नरेंद्र मोदी- 4 जून रोजी निकाल लागत होता, तेव्हा मी इतर कामात व्यस्त होतो. मला फोन येत होते. आकडे सांगितले जात होते. मी त्यांना म्हटलं, आकडे वगैरे ठिक आहे, पण ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? आता विरोधकांच्या तोंडाला टाळं लागलंय. या लोकांनी भारताच्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडवला. सातत्याने ईव्हीएमला शिव्या घातल्या.
नरेंद्र मोदी- दक्षिणेत आम्ही चांगलं यश मिळवलं. कर्नाटक आणि तेलंगणात मोठा विजय मिळाला. तामिळनाडूतही जोरदार प्रचार केला. तामिळनाडूत जागा जिंकलो नसेल, पण ज्या वेगाने एनडीएचा व्होट बँक वाढलं आहे, त्यावरून उद्या काय होणार हे स्पष्ट होत आहे.
नरेंद्र मोदी- एनडीएतील सर्व पक्षांचे सदस्य माझ्यासाठी समान आहेत. आपण विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू. आपण विकासाचा नवा अध्याय लिहू. दक्षिण भारतात एनडीएनं नव्या भारताचा पाया रचला आहे.
नरेंद्र मोदी- गरीबांचं कल्याण हे माझ्या केंद्रस्थानी आहे. एनडीएनं या देशाला सुशासन दिलं आहे. गेल्या दहा वर्षांत लोकांनीसुद्धा हे अनुभवलं. एनडीए हा मजबूत भारताचा आत्मा आहे.
नरेंद्र मोदी- मी हे विश्वासाने सांगतो ही सर्वांत यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने पाच-पाच वर्षांचे तीन टर्म यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत आणि आता चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करतोय.
नरेंद्र मोदी- 22 राज्यांनी एनडीएला सेवा करण्याची संधी दिली. आम्हाला बहुमत मिळालं आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. मात्र देश चालवण्यासाठी सर्वमत खूप गरजेचं असतं. हे मी याआधीही अनेकदा म्हणालो आहे.
“आपल्या सर्वांमध्ये विश्वासाचा सेतू मजबूत आहे. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. मी तुम्हा सर्वांचे जितके आभार मानू तितकं कमी आहे. विश्वास हीच मोठी संपत्ती आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. इतक्या मोठ्या समूहाचं स्वागत करण्याची संधी आज मला मिळाली आहे. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र अथक परिश्रम केला. आज मी त्यांना वाकून नमस्कार करतो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींमुळे एनडीएला विजय प्राप्त झाला आहे… याचं पूर्ण श्रेय मोदी यांना जातं… तुमच्यामध्येच ती इच्छाशक्ती होती ज्यामुळे इतिहासात मोठा विक्रम रचला आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येणं सामान्य गोष्ट नाही… असं वक्तव्य चिराग पासवान यांनी केलं आहे..
एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड… राजनाथ सिंह यांच्या मागणीला आमच्या पक्षाकडून पाठिंबा… अनेकांनी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अफवा पसरवणाऱ्यांना जनतेने नाकारलं आणि मोदी यांना स्वीकारलं आहे… असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
तीन महिने नरेंद्र मोदी यांनी आराम केलेला नाही… दिवस-रात्र त्यांनी काम केलं आहे. रॉली रोड शो केले आहेत… मोदींच्या प्रयत्नांमुळे भारताचा विकास झाला आहे… असं वक्तव्य चंद्राबाबू नायडू यांनी केलं आहे…
देशाचं नेतृत्व पुढच्या 5 वर्षांसाठी नरेंद्र मोदी यांनी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. 10 वर्षांमध्ये पंतप्रधानपदी मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन केल्याचं काम त्यांच्या नेतृत्वात भाजप एनडीए सरकारने केलं आहे…. असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे…
एनडीए सरकारने 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची सेवा केली आहे. त्या सेवेची फक्त भारतात नाहीतर, दुसऱ्या देशांमध्ये देखील प्रशंसा होत आहे. तिसऱ्यांचा एनडीएची सरकार स्थापन होणार… असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
केंद्रीय सभागृहात NDA ची बैठक सुरु आहे. पंतप्रधानपदाचा शपथविधी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे..
लोकसभेत स्मिता वाघ यांच्यासाठी काम केलं आता त्यांनी विधानसभेत आमच्यासाठी काम करावं, अशी अपेक्षा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
मनसेचे काही राहिलेलं नाही. मनसे हा सेटिंग वाला पक्ष असल्याचा आरोप पदवीधरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित सरया यांनी केला आहे. मनसेने माघार घेतल्याच्या भूमिकेवर लोक नाराज आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केली होती त्यांना इतकं वाईट वाटत आहे. सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क झाले, ते मला पाठिंबा देणार असल्याचे सरया म्हणाले.
60 वर्षात शरद पवार नावाला डाग लागून दिला नाही,दिल्लीपुढे त्यांना झुकवून दिले नाही याबद्दल कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो. रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघात मोठे कष्ट घेतले, असे कौतुक त्यांनी केले.
गेली आठ महिने आम्ही नोंदणी करत आहोत.सिंधुदुर्ग ते पालघर या पाच जिल्ह्यात नोंदणी व्यवस्थितपणे झालेली आहे. महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शरद पवार यांच्या ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. आघाडी मधे बिघडी काही झालं नाही एकच उमेदवार इथे असेल वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे बोलणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरया यांनी दिली.
खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना काल पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली होती. मी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे. मात्र येत्या काळात जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी काम करणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. 70 टक्के कुटूंब एका बाजूला तर एक कुटूंब एका बाजूला आहे अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया सुनंदा पवार यांनी दिली. रोहित पवारांवर आता पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात यावी, रोहित ती नक्कीच पार पाडणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीत आज एनडीएची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
“नितीश कुमार, चंद्राबाबू आज तुमच्यासोबत उद्या आमच्यासोबत असतील. शिंदे गट चोऱ्या माऱ्या करुन निवडून आलाय. फक्त राजकीय विरोधकांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या जातात. सरकार चालवताना मोदींच्या नाकीनऊ येतील. आपल्या आईसाठी महिला जवानांन कायदा हाती घेतला. खासदारावर हात उचलणं चुकीच” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वरळीच्या सिजे हाऊसमधल्या मालमत्ता जप्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. इक्बाल मिरचीशी संबंधित प्रकरणात ईडीकडून कारवाई झाली होती. प्रफुल पटेलांसारखा सर्वांनाच एक न्याय लावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन आभार मानले आहेत. बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयात सुप्रिया यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची महाराष्ट्र सदनात बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री संसद भवनात जाणार आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर महामंडळाची बस व ट्रकचा भीषण अपघात होऊन 5 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या बस मध्ये एकूण ३० प्रवासी होते. पुण्याहून ठाण्याच्या दिशेने जात असलेली ही बस खोपोली येथील फुड मॉलजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघाताची खबरबातमी कळताच डेल्टा फोर्स, खोपोली पोलीस, अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी दाखल झाली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी तसेच विधानसभा निवडणूक तयारीवर होणार चर्चा. या बैठकीला नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिरीष सावंत यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी हजर आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात संदीपान भुमरे यांची वर्णी लागण्याची शक्यता. भाजप आणि शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदी संदीपान भुमरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून एकमेव खासदार निवडून आल्यामुळे संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये काल मध्यरात्री राजधानीत बैठक झाली. मला सरकारमधून मोकळं करा अशी फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावर या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी गरज असल्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली असून ते राजीनाम्यावर ठाम आहेत.