Maharashtra Political News live: गोंदिया जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाचे आगमन
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 8 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला. भाजपचे 18 मंत्री मंत्रिमंडळात असतील तर NDA घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्री पदं असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांची आज राजधानी दिल्लीत बैठक होणार काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार पहिल्यांदाच दिल्लीत येणार. तसेच लोकसभा निवडणूकीनंतर काँग्रेस कार्यसमितीची देखील बैठक होणार आहे. कार्यसमितीच्या बैठकीत कोणकोणते ठराव पास केले जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या (रविवार 9 जून) नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासह इतरही काही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पावसामुळे नागरिकांना दिलासा, मात्र काही भागात अजूनही प्रतीक्षा
गोंदिया जिल्ह्यात आज काही भागात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचे आगमन झाले आहे. जिल्ह्यात काही भागात उन तर काही भागात पाऊस अशी स्थिती आहे. अनेक भागातील नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर काही भागांमध्ये उकाडा कायम असल्याचं चित्र आह.
-
सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार?
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. इच्छा नसताना फक्त पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे लोकसभा निवडणूक लढवणारे आणि पराभूत होणारे सुधीर मुगगंटीवार हे आगामी विधानसभा निवडणूक बल्लापूरमधून लढवण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
-
दिल्लीत 9 जून रोजी शपथविधी, तयारी सुरु
दिल्लीत शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. दिल्लीत 9 जून रोजी शपथविधी होणार आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सुरक्षेची तयारी सुरु झाली आहे. वाहतुकीच नियोजन आणि सुरक्षेचा आढावा घ्यायला सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
-
प्रवक्त्यांनी समजून उमजून बोलले पाहिजे – फडणवीस
प्रवक्त्यांनी समजून बोलले पाहिजे. तटकरे निवडून आले. सगळ्यांनी काम केले. एकमेकांना सोबत घेऊन चालणं महत्त्वाचं आहे.
-
विरोधी पक्षनेता होण्याबाबत विचार करणार – राहुल गांधी
विरोधी पक्षनेता होण्याबाबत विचार करणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधीपक्ष नेता व्हावं असा प्रस्ताव
-
-
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या – बार्शीत अर्धनग्नावस्थेत उपोषण
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बार्शीत मराठा समाजाचे कार्यकर्ते आनंद काशीद अर्धनग्न अवस्थेत आमरण उपोषणाला बसले आहेत.
-
प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्री पद द्यावे – संजय रायमुनकर
बुलढाण्याचे चार वेळा निवडून आलेले खासदार तीन वेळेचे आमदार प्रतापराव जाधव यांनी मंत्री करावे अशी मागणी आमदार संजय रायमुनकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
-
मिरजेत बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त
सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजारांच्या बनावट नोटासह नोटा छापण्याची 2 लाखांची मशीन,असा 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहद शेख असे बनावट नोटा छपाई करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
-
बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त
मिरजेत बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. 1 लाख 90 हजारांच्या बनावट नोटासह नोटा छापण्याची 2 लाखांची मशीन,असा 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहद शेख असे बनावट नोटा छपाई करणाऱ्या इसमाचे नाव आहे. 50 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्यात येत होती. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
शिंदे गटाकडून व्हीप म्हणून कुणाची निवड?
शिंदे गटाकडून संसदीय पक्षाच्या व्हिप म्हणून श्रीरंग बारणे यांची निवड झालीय. संसद अधिवेशन काळात व्हिप म्हणून काम पाहणार आहेत. गटनेते पदी श्रीकांत शिंदे यांची निवड झाली आहे.
-
नाशिक आयुक्त कार्यालय राडा प्रकरणी महत्वाची अपडेट्स…
नाशिक आयुक्त कार्यालय राडा प्रकरण… अपक्ष उमेदवार किशोर दराडे अदयापही संपर्काबाहेर आहेत. नाशिक शिक्षक पदवीघर मतदार संघ निवडणुकीत राजकारण तापले. कोपरगाव तालुक्यातील किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार अद्यापही घरी पोहचले नाहीत. कुटुंबीय दहशतीखाली , माध्यमांशी बोलण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय. किशोर दराडे नाव साधर्म्य असलल्याने त्यांचेवर हल्ला झाल्याचा विवेक कोल्हे यांचा आरोप आहे. सत्तेचा गैरवापर होत असुन दराडे कुटूबियांना सरंक्षण देण्याची कोल्हेंनी मागणी केली आहे. बेपत्ता असलेल्या दराडेंचा शोध घ्यावा, अशीही मागणी आहे.
-
रांजणगावमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी निमोणे येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वायाला जात आहे. सध्या उन्हाळा चालु असल्याने औद्योगिक वसाहतीत आधीच पाणी टंचाई असताना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. तसेच जलवाहिनी फुटून आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
-
रवींद्र धंगेकर यांचा खोचक टोला
खासदार मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दिल्लीतल्या फोटोचा प्रश्न विचारताच रवींद्र धंगेकरांनी जोडले हात. मेधाताई आणि त्यांचे पटलं हेच महत्त्वाचा आहे कोथरूडचे हे दोघे एकत्र आले हेच पुण्यासाठी मोठी गोष्ट, रवींद्र धंगेकर यांचा खोचक टोला
-
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंबडच्या तहसीलदार
मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंबड तहसीलदार धनश्री भालचिम भेटण्यासाठी आल्या आहेत, मनोज जरांगे यांना सरकारची भूमिका अवगत करून, उपोषण आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
-
किरीट सोमय्या यांची टीका
राहुल गांधी यांनी आरोप केला शेअर बाजार घोटाळा केला. 30 लाख कोटींचा घोटाळा झाला. सेन्सेक्स ने परत उच्चांक गाठला. भारताच कॅपिटल मार्केट डाऊन करून कोणाचा भाल करायचं आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
-
प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
उद्धव ठाकरेंनी २१ जागा लढल्या ९ जागा मिळाल्या, शिंदेंनी १५ लढवल्या ७ मिळाल्या, कोंकणाचीही जागा गेली. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली पण यश मिळालं नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
-
एकही आमदार सोडून जाणार नाही
एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही. अजित दादा यांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारण पाहिजे.या काळात आम्ही जर अजित दादा यांना सोडलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू असे वक्तव्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.
-
शपथविधीपूर्वी भाजप कार्यालयात मोठी घडामोड
मोदी सरकारच्या शपथविधीच्या तयारीसंदर्भात भाजप कार्यालयात मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित असतील. उद्याच्या सोहळ्याच्या तयारीचा बैठकीत आढावा घेण्यात येईल.प्रत्येक राज्यात शपथविधी सोहळ्यानंतर केला जाणार जल्लोष, त्याच्याही बैठकीत सूचना दिल्या जात आहेत.
-
बावनकुळेंना अनिल देशमुखांचा चिमटा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावं, 18 हजाराने काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे यांचा आम्हाला फायदा आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
-
शपथविधी होताच मोदी जाणार वाराणसीला
शपथविधीनंतर नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. वाराणसी मध्ये जाऊन मोदी, गंगा आरती करणार आहेत.पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी मतदारसंघात जाणार आहेत.
-
सोडून गेलेल्यांना परत यायचे आहे -अनिल देशमुख
आम्हाला सोडून गेले ते चलबिचल झाले आहे, त्यांना राजकीय भवितव्य आहे, वर्षभरापूर्वी त्याचा निर्णय चुकला. अजित पवार गटातील आमदार संपर्कात आहे, चार महिन्यांनी निवडणुका असल्याने त्यांना चिंतेने ग्रासलं आहे.शरद पवारांना कठीण काळात सोडून गेले, वयक्तिक टीका केली, आमचे जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
-
संजय राऊत यांचा मोदी सरकारवर मोठा आरोप
सेन्सेक्स स्टॉक, एक्सचेंज स्टॉक मार्केट, शेअर बाजार घोटाळा जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून चालू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत आहेत राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजा भिकारी होते, असे ते म्हणाले.
-
मनोज जरांगे आक्रमक
पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी निवेदन दिले ती लोक आमच्या लोकांना त्रास देताय, शिवीगाळ करताय, कायदा सुववस्था बिघडू देऊ नये.. जर काही झालं तर जबाबदार निवेदन देणारे असतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
-
Live Update | सुरेंद्र आणि विशाल अग्रवालवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल
सुरेंद्र आणि विशाल अग्रवालवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्टेट एजंटच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी 32 लाखांची फसवणूक केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे…
-
Live Update | महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर कारवाई
महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने विशाल अग्रवालच्या MPG क्लबवर बुलडोझर चालवला आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने कारवाई….
-
Live Update | कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगबग
कृषी केंद्राबाहेर बियाणे आणि औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा… गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीच्या कामाला ही वेग… यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात भात बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल… गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला कमी दर आल्याने यावर्षी बी खरेदीत घट
-
Live Update | संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं – संजय राऊत
संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं…एनडीएचं सरकार टिकणार नाही… प्रफुल पटेल, शिंदे, अशोक चव्हाणांची फाईल बंद झाली… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं…
-
Live Update | येणारं सरकार कॉर्पोरेट, उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी – संजय राऊत
येणारं सरकार कॉर्पोरेट, उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आहे. हे सगळे लाभार्थी एकत्र येवून सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत… हे सरकार टिकणार नाही… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Live Update | शपथविधीमुळे जनतेला त्रास होणार असेल तर शपथविधी घेणार नाही का? जरांगे पाटील
शपथविधीमुळे जनतेला त्रास होणार असेल तर शपथविधी घेणार नाही का? सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करावा अशी मागणी… हरकतींसाठी 5 -5 महिने लागत नाहीत… आता अम्ही सरकारला वेळ देणार नाही… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं…
-
Live Update | आंदोलनाविराधात निवेदन देणारे कोण हे सर्वांना माहिती – जरांगे पाटील
आंदोलनाविराधात निवेदन देणारे कोण हे सर्वांना माहिती आहे. मला राजकारणात जायचं नाही. सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करावा अशा मागणी… सरकारने फक्त निवेदनं दिली. आता गरिबांना वेठिस धरलं जात आहे…. असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केल आहे.
-
सरकारने फक्त निवेदनं दिली – मनोज जरांगे पाटील
आम्ही जातीवाद केला नाही. सरकारने फक्त निवेदनं दिली. आंदोलनाविरोधात निवेदन देणारे कोण हे सर्वांना माहीत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
मी आचारसंहितेचा सन्मान केला – मनोज जरांगे पाटील
मी आचारसंहितेचा सन्मान केला. आता गरिबांना वेठीस धरलं जात आहे. सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी आजपासून जरांगे हे अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.
-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी जरांगे हे उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.
-
विशाल व सुरेंद्र अग्रवालवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण – विशाल व सुरेंद्र अग्रवालवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
बारामती – शरद पवार यांचे निवासस्थान गोविंदबागेसमोर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा बॅनर
बारामती – शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेसमोर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा बॅनर लावण्यात आला आहे. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांची सलग चौथ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
-
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला
मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपचे 18 मंत्री या मंत्रिमंडळात असतील . तर NDA घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्री पदं असतील. टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी दोन मंत्री असतील. शिवसेना, NCP, LJP, JDS, हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रीपद असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
Published On - Jun 08,2024 9:16 AM