Exit Poll: 2009, 2014 अन् 2019 मधील एग्झिट पोल कसे होते…मोदी लाटेत एग्झिट पोल ठरले होते फेल
Lok Sabha Elections Exit Poll: 2019 मध्ये 13 एग्झिट पोलने एनडीएला सर्वाधिक 306 जागा दाखवल्या होत्या तसेच UPA ला 120 जागा दाखवल्या. परंतु प्रत्यक्षात एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या तर युपीएला 93 जागा मिळाल्या. भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या.
लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आला आहे. या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. देशभरातील एकूण ५७ जागांवर मतदान सुरु आहे. हे मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलच आकडे जाहीर होणार आहेत. विविध संस्थांनी केलेला एग्झिट पोल समोर येणार आहेत. एग्झिट पोल कोणाला बहुमत दाखवणार आहे, हे आजच निश्चित होईल. परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यापूर्वी 2009, 2014 अन् 2019 मधील एग्झिट पोल कसे होते…त्यावेळी ते अंदाज अचूक ठरले का? कोणत्या पक्षाला सत्ताधारी बनवले आणि निकालात प्रत्यक्षात कोणता पक्ष सत्ताधारी बनला…
मागील दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला होता. 2014 मधील लोकसभा निवडणूक 7 एप्रिल ते 12 मेपर्यंत चालली आणि निकाल 16 मे रोजी आला. 2019 मधील निवडणूक 11 एप्रिल ते 19 मेपर्यंत चालली आणि निकाल 23 मे रोजी आला.
2009 मध्ये युपीएचा विजय
लोकसभा निवडणूक 2009 मध्येय UPA सत्ता पुन्हा आली होती. त्यावेळी चार एग्झिट पोलने काँग्रेसच्या जागा कमी दाखवल्या होत्या. एग्झिट पोलने युपीएला 195 तर एनडीएला 185 जागा दाखवल्या होत्या. प्रत्याक्षात युपीएला 262 तर एनडीएला 158 जागा मिळाल्या. काँग्रेसला 206 जागांवर विजय मिळाला होता तर भाजप 116 जागांवर विजयी झाली होती.
2014 मध्ये आली मोदी लाट
2014 मध्ये आठ एग्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखील एनडीए सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी एनडीएला 283 जागा तर युपीएला 105 जागा मिळणार असल्याचा अंदाज होता. परंतु मोदी लाटेमुळे सर्व एग्झिट पोल फेल ठरले. त्यावेळी 336 जागा मिळाल्या तर युपीएला केवळ 60 जागा मिळाल्या. केवळ भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.
2019 मध्ये असे घडले होते
2019 मध्ये 13 एग्झिट पोलने एनडीएला सर्वाधिक 306 जागा दाखवल्या होत्या तसेच UPA ला 120 जागा दाखवल्या. परंतु प्रत्यक्षात एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या तर युपीएला 93 जागा मिळाल्या. भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या.
हे ही वाचा…
Exit Polls 2024: एग्झिट पोल 2019 मध्ये कसे होते, मोदी सरकार बाबत काय होती भविष्यवाणी?