UP Loksabha Election Result 2024 : यूपीमध्ये गेम कसा फिरला? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या भाजपाच्या पराभवाची कारणं

UP Loksabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. या सर्व जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला यावेळी 33 जागांवर समाधान मानाव लागलं. भाजपाला पूर्ण बहुमताचा आकडा गाठता आला नाही. आता प्रश्न हा आहे की, 2014 आणि 2019 मध्ये भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या यूपीमध्ये भाजपा हरली कशी? पाच पॉइंटमधून समजून घ्या या पराभवाची कारणं.

UP Loksabha Election Result 2024 : यूपीमध्ये गेम कसा फिरला? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या भाजपाच्या पराभवाची कारणं
Bjp Leaders
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 1:51 PM

मागच्या दहा वर्षात उत्तर प्रदेशमुळे भाजपाला स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचता आलं. या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी उत्तर प्रदेश महत्त्वाच राज्य असतं. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातून भाजपाचे सर्वाधिक 73 खासदार निवडून आले. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातून भाजपाचे 62 खासदार निवडून आले. 2024 मध्ये मात्र, उत्तर प्रदेशने भाजपला झटका दिला. भाजपाला फक्त 33 जागांवर समाधान मानाव लागलं. भाजपाच्या खासदारांची संख्या 29 ने घटली. त्याचवेळी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचे 37 खासदार निवडून आले. भाजपासाठी हे झटक्यापेक्षा कमी नाही. कारण उत्तर प्रदेशने साथ दिली असती, तर भाजपाला स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचता आलं असतं. उत्तर प्रदेशात भाजपाच गणित कुठे चुकलं? अखिलेश यादव यांची कुठली स्ट्रॅटजी चालली ते समजून घेऊया.

– उत्तर प्रदेशमध्ये भाजपा यावेळी आपल्या आघाडीचा विस्तार करुन मैदानात उतरलेली. त्यांनी अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस) आणि संजय निषाद यांच्या निषाद पार्टीसह जयंत चौधरी यांच्या आरएलडी आणि ओम प्रकाश राजभर यांच्या सुभासपासोबत आघाडी केली होती. तेच समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने आघाडी केली होती. सपा-काँग्रेस आघाडीने उत्तर प्रदेशात एकूण 43 जागा जिंकल्या.

– मायावती यांच्या बसपाला यावेळी एकट्याने निवडणूक लढण महाग पडलं. त्यांच खातही उघडू शकलं नाही. भाजपाला सर्वात मोठा झटका पूर्वांचलमध्ये बसला. याच पूर्वांचलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघ येतो.

– दहावर्षांपूर्वी भाजपाने उत्तर प्रदेशात सवर्ण वोट बँकसह बिगर यादव ओबीसी आणि बिगर जाटव दलितांना जोडून नवीन सोशल इंजिनिअरींग केलं होतं. त्या आधारावर उत्तर प्रदेशात भाजपाने आपली पाळमुळे घट्टं केली. पण यावेळी भाजपाच हे समीकरण बिघडलं.

– सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी यावेळी पीडीएला (पिछडा-दलित-अल्पसंख्याक) सोबत घेऊन रणनिती आखलेली. त्याशिवाय संविधान आणि आरक्षण हे मुद्दे विरोधकांनी लावून धरले. त्यामुळे भाजपाची सोशल इंजिनिअरींग बिघडली.

-बिगर यादव ओबीसीमधील मल्लाह, कुर्मी आणि मौर्य-कुशवाहा या जाती भाजपाला सोडून सपा-काँग्रेससोबत गेल्या. संविधानामुळे दलित मतदार सपा-काँग्रेसकडे वळला. त्यामुळे यूपीमध्ये भाजपाला मात खावी लागली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.