Assembly Election 2023 | काँग्रेसच्या चिरकूट नेत्यांची काय औकात? INDIA आघाडीतून मोठा पक्ष फुटणार?

Assembly Election 2023 | लोकसभा निवडणुकीआधी काही राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. या विधानसभा निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडी स्थापन झालीय. पण आता या आघाडीत मतभेदांची दरी स्पष्टपणे दिसू लागलीय.

Assembly Election 2023 | काँग्रेसच्या चिरकूट नेत्यांची काय औकात? INDIA आघाडीतून मोठा पक्ष फुटणार?
india Alliance
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 6:26 PM

नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आमने-सामने आहेत. काँग्रेसने विश्वासात न घेता उमेदवारांची यादी जाहीर केल्याने समाजवादी पार्टी नाराज आहे. समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवरुन INDIA आघाडीतील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. यूपीएमध्ये INDIA एलायंस जवळपास तुटल्यात जमा आहे. गुरुवारी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठ वक्तव्य केलं. “मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीला जी वागणूक मिळाली, तसाच व्यवहार उत्तर प्रदेशात होईल” असं अखिलेश यादव म्हणाले. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीला काँग्रेसने मूर्ख बनवलं. आमच्यासोबत धोका झाला. रात्री एक वाजेपर्यंत बैठक चालली. पण दुसऱ्यादिवशी यादी जाहीर झाली, त्यात आम्हाला एकही सीट मिळाली नाही. काँग्रेसचे लोक भाजपाला मिळालेले आहेत.

“काँग्रेसच्या चिरकूट नेत्यांची काय औकात आहे, जे त्यांच्याबद्दल बोलतील” असं अखिलेश यादव म्हणाले.  लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन INDIA आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टीसह अन्य पक्ष या विरोधी पक्षाच्या आघाडीत आहेत. पण विधानसभा निवडणुकीपासून INDIA आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. खासकरुन मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमधील अंतर स्पष्टपणे दिसून आलं.

‘प्रत्यक्ष निकाला आला, तेव्हा…’

“काँग्रेस पक्षाचा कुठला नेता बोलतोय? एमपीच्या माजी मुख्यमंत्र्यांने बैठक बोलावली. समाजवादी पार्टीचे नेते तिथे गेले. समाजवादी पार्टीने एक ते दोन जागा जिंकल्या होत्या. सगळी चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांना यादी दिली. एक वाजेपर्यंत समाजवादी पार्टीचे नेते जागे होते. त्यांनी आकडे पाहिले. सहा जागांवर विचार होईल, असं आश्वासन दिलं. प्रत्यक्ष निकाला आला, तेव्हा समाजवादी पार्टीला शून्य जागा मिळाली” असं अखिलेश यादव म्हणाले.

‘तसाच व्यवहार काँग्रेससोबत होईल’

“विधानसभा स्तरावर आघाडीची बोलणी झाली नसती, तर आपले नेते कधी तिथे गेलेच नसते. आघाडी फक्त यूपीत केंद्रासाठी होणार असेल, त्यावर विचार होईल. समाजवादी पार्टीसोबत जो व्यवहार झाला, तसाच व्यवहार त्यांच्यासोबत होईल” अस अखिलेश यादव म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.