MP Election | ‘मी मुख्यमंत्रीपदाचा….’, निवडणूक जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचं मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं विधान
Madhya Pradesh Election Result 2023 | विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाचा चेहरा होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मगं मध्य प्रदेशात आता मुख्यमंत्री कोण होणार?. या सगळया परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. भाजपा हा पक्ष धक्का तंत्रासाठी ओळखला जातो. भाजपाने त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.
भोपाळ : दोन दिवसांपूर्वी नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत काँग्रेसवर 3-1 ने मात केली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेकडच्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसला मोठ्या फरकाने पराभूत केलं. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपासाठी हा आत्मविश्वास उंचावणारा विजय आहे. भाजपाने मिळवलेल्या या यशात मध्य प्रदेशच यश लक्षणीय आहे. कारण तिथे बऱ्याच वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. प्रस्थापित भाजपा सरकार विरोधात तिथे कुठलीही लाट दिसली नाही. हे एक मोठ यश आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवलाय. पण आता तिथे मुख्यमंत्री कोण होणार? हा राजकीय विश्लेषकांना पडलेला प्रश्न आहे. कारण शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. विद्यमान विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली असली, तरी भाजपाचा चेहरा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा मुख्य मुद्दा आहे.
मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा सुरु असतानाच शिवराज सिहं चौहान यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि ना आहे’ असं शिवराज यांनी म्हटलं आहे. एमपी विधानसभा निवडणुकीत भाजपाने 230 पैकी 163 जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 66 जागांवर समाधान मानाव लागलं. “पंतप्रधान मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करण ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी भाजपा कार्यकर्ता आहे. मी जनतेचा ह्दयापासून आभारी आहे. मला जितकं शक्य झालं, तितक मी काम केलं” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. त्यांनी ANI ही मुलाखत दिली.
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says, “…Neither was I CM contender earlier nor now. I am just a party worker and whatever post or duty the party will give I will fulfil that….” pic.twitter.com/AxjDd7pnD5
— ANI (@ANI) December 5, 2023
भाजापच्या यशामागची गेम चेंजर योजना कुठली?
या निवडणुकीत शिवराज सिंह चौहानच भाजपाच्या विजयाचे खरे नायक आहे. 64 वर्षाच्या शिवराज यांनी राज्यातील प्रस्थापित सरकारविरोधी लाटेवर मात करुन विजय मिळवला. भाजपाच्या या विजयामागे सर्वाधिक चर्चा ‘लाडली बहना’ योजनेची आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या विजयासाठी या योजनेला गेम चेंजर म्हटलं जात आहे. पक्षाने निवडणुकीआधी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रस्तुत केलं नव्हतं.