Maharashtra Assembly Election Dates Announced 2024 : महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या किती? किती नवीन मतदार?

Maharashtra Election Dates Announced : महाराष्ट्रात एकूण रजिस्टर मतदारांची संख्या किती कोटी आहे? किती पुरुष, किती महिला मतदार आहेत. नव मतदारांची संख्या किती आहे? किती मतदान केंद्र असतील, जाणून घ्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Maharashtra Assembly Election Dates Announced 2024 : महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या किती? किती नवीन मतदार?
Maharashtra Assembly Election Dates Announced 2024
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 4:16 PM

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेच लक्ष ज्या तारखांकडे लागलेलं, त्या जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल.

मतमोजणी म्हणजे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 29 ऑक्टोबर आहे.

30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल.

उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.

महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.

एससी 25 मतदारसंघ आहेत.

एसटी 29 मतदारसंघ आहेत.

महाराष्ट्रात एकूण नोंदणीकृत रजिस्टर मतदारांची संख्या 9 कोटी 3 लाख आहे.

यात पुरुष मतदार 4 कोटी 93 लाख, महिला मतदार 4 कोटी 60 लाख आहे.

तरुण नव मतदारांची संख्या 18 लाख 67 हजार आहे.

दिव्यांग मतदारांची संख्या 6 लाख 2 हजार आहे.

ज्येष्ठ मतदारांची संख्या 12 लाख 5 हजार आहे.

महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत.

57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन

शहरात 42 हजार 582 पोलिंग स्टेशन असतील.

85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरुन मतदानाची सोय.

सर्व पोलिंग स्टेशनवर सुविधा देण्यात येणार आहेत. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत.

लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल.

सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे.

जास्तीत जास्त मतदान करावं. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात म्हणून सख्त निर्देश दिले आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे.

कोणत्याही प्रकारचं प्रलोभन, पैसे वाटप, ड्रग्स वाटप, दारूचं वाटप यावर लक्ष असेल.

विमानतळासह सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चेकपोस्टवर ही लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मल्टिपल टीम तैनात राहील.

24 तास चेकिंग करणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील. चेकिंगचा अर्थ असा नाही की सर्व सामान्यांना त्रास द्यावा, असंही सांगितलं आहे.

पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.