North Maharashtra Election Results 2024 LIVE: सातव्या फेरी फेरीत छगन भुजबळ 8700 मतांनी आघाडीवर
North Maharashtra Assembly Constituency Election Results 2024 LIVE Updates in Marathi: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हे येतात. विधानसभा निवडणुकीत या भागात संमिश्र निकाल राहिले आहेत. आता २०२४ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतील कोणाला या भागातील जनता साथ देते, ते आज स्पष्ट होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Nashik Election Results 2024: निफाडमध्ये बनकर यांची आघाडी
- निफाड मतदार संघ
- आठवी फेरी
- दिलीप बनकर 53965
- अनिल कदम.33459
- आघाडी दिलीप बनकर 20506
-
Dhule Election Results 2024: जयकुमार रावल यांना मोठी आघाडी
भाजप उमेदवार जयकुमार रावल यांना पाचव्या फेरीअंती 22 हजार 826 मतांची आघाडी
-
-
Jamner Election Results 2024: जामनेरात गिरीश महाजन यांची मुसंडी
- सातव्या फेरी अखेर मिळालेली मते
- गिरीश महाजन 38149
- दिलीप खोडपे 28967
-
Pachora Election Results 2024: संग्राम जगताप यांची मोठी आघाडी
पाचोरा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील सहाव्या फेरीतही 7721 मतांनी आघाडीवर आहे. पाचोरा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांची आघाडी कायम आहे.
-
Nashik Election Results 2024: छगन भुजबळ 7900 मतांनी आघाडीवर
सहावी फेरी फेरीत छगन भुजबळ 7900 मतांनी आघाडीवर आहेत. माणिकराव शिंदे पिछाडीवर आहेत.
-
-
Nashik Results 2024: संग्राम जगताप यांची मोठी आघाडी
देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांची घोडदौड सुरू आहे. सरोज अहिरे यांनी १६१२५ मतांची आघाडी घेतली आहे.
-
Ahmednagar Election Results 2024: संग्राम जगताप यांची मोठी आघाडी
नगर शहर मतदार संघात पाचव्या फेरी अखेरीस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 17715 मतांनी आघाडीवर आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहे.
-
-
Jamner Election Results 2024: भाजपाचे मंत्री गिरीश महाजन 2887 मतांनी आघाडीवर
जामनेरमधून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन 2887 मतांनी आघाडीवर आहे.
- चौथी फेरी
- गिरीश महाजन – 14678
- दिलीप खोडपे – 11791
-
Ahmednagar Election Results 2024: शिवाजी कर्डिले 2578 मतांनी आघाडीवर
- भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले 2578 मतांनी आघाडीवर आहे.
- शिवाजी कर्डिले (भाजप) … 19189
- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार) पक्ष 16611
- भाजपचे शिवाजी कर्डिले 2578 मतांनी आघाडीवर.
-
Nashik Election Results 2024: चौथ्या फेरीत छगन भुजबळ 3000 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीत छगन भुजबळ 3000 मतांनी आघाडीवर आहे. माणिकराव शिंदे पिछाडीवर गेले आहे. यापूर्वी झालेल्या फेरीत भुजबळ पिछाडीवर पडले होते. सुहास कांदे चौथ्या फेरी अखेर 19 हजारांच्या आघाडीवर आहे.
-
Dhule Election Results 2024: राघवेंद्र भदाणे 5 हजार 248 मतांनी आघाडीवर
धुळे ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाणे 5 हजार 248 मतांनी आघाडीवर आहे.
-
Nashik Election Results 2024: नाशिकमधील पंधरा मतदार संघाचा कल
- येवलात छगन भुजबळ 86 मतांनी आघाडी
- नांदगाव मध्ये सुहास कांदे 14000 आघाडीवर
- पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे 5660 आघाडीवर दिनकर पाटील दुसऱ्या क्रमांकावर
- देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे 12000 आघाडीवर
- मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे 4066 आघाडीवर
- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले 4000 आघाडीवर
- मालेगाव मध्ये दादा भुसे 17400 आघाडीवर
- इगतपुरीत हिरामण खोसकर 3600 आघाडीवर
- दिंडोरीतून नरहरी शिरवळ 4456 आघाडीवर
- निफाड मधून दिलीप बनकर 8199 आघाडीवर
- चांदवड मधून राहुल आहेर 7006 आघाडीवर
- मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख 3637 मतांनी आघाडीवर
- बागलान मधून दिलीप बोरसे 10660 आघाडीवर
- कळवण मधून नितीन पवार 655 मतांनी आघाडीवर
- सिन्नर मधून माणिकराव कोकाटे 13900 आघाडीवर
-
Jamner Election Results 2024: भाजपच्या संकटमोचक यांना धक्का, राष्ट्रवादी उमेदवाराची आघाडी
जामनेर मतदार संघात भाजपच्या संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप खोडपे आघाडीवर आहे.
-
Nashik Election Results 2024: नरहरी झिरवळ 1344 मतांनी आघाडीवर
दिंडोरी मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर नरहरी झिरवळ 1344 मतांनी आघाडीवर
-
Dhule Election Results 2024: धुळे शहर विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरीचा निकाल
- अनुप अग्रवाल (भाजप)-8811
- अनिल गोटे ( (शिवसेना-उबाठा)-1678
- आनंद सैंदाणे (बहुजन समाज पार्टी)-16
- इर्शाद जहागिरदार (समाजवादी पार्टी)-16
- जितेंद्र शिरसाठ (वंचित बहुजन आघाडी)-83
- फारुक शाह (एमआयएम)-141
- ॲड. रईस अन्सारी (अपक्ष)-03
- जितेंद्र मोरे (अपक्ष)-07
- NOTA-52
- एकूण-10807
-
Ahmednagar Election Results 2024: काशिनाथ दाते 1612 मतांनी आघाडीवर
पारनेर मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशिनाथ दाते 1612 मतांनी आघाडीवर आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणी लंके पिछाडीवर आहे.
-
Ahmednagar Election Results 2024: संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर
अहिल्यानगर जिल्ह्यात तिसऱ्या फेरीत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर आहे. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहे.
-
Chopda Election Results 2024: चंद्रकांत सोनवणे पिछाडीवर
- चंद्रकांत सोनवणे शिंदे गट -4130
- प्रभाकर सोनवणे उबाठा गट -4618
- प्रभाकर सोनवणे उबाठा उमेदवार 488 मतांनी आघाडी
-
Muktainagar Election Results 2024: रोहिणी खडसे पिछाडीवर
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहिणी खडसे पिछाडीवर आहे. या ठिकाणी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतली.
-
Nandurbar Election Results 2024: आमदार शिरीष नाईक यांची आघाडी
- दुसऱ्या फेऱ्यात नवापूर काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक 8805
- भरत गावित 3655
- शरद गावित 7053
-
jalgaon gramin Election Results 2024: गुलाबराव पाटील यांची आघाडी
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर निवडणूक रिंगणात आहे.
-
nandurbar Election Results 2024: विजयकुमार गावित 2000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयकुमार गावित 2000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर
-
Maharashtra Election Results 2024: छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर
छगन भुजबळ सलग दुसऱ्या फेरीत पिछाडीवर छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहे. ईव्हीएम मतमोजणीत राहुल ढिकले यांना चार हजारांची आघाडी आहे.
-
Maharashtra Election Results 2024: धुळे जिल्ह्यात भाजपची मुसंडी
- धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघा पैकी चार मतदार संघात भाजपाची मुसंडी
- धुळे शहरात भाजपाचे अनुप अग्रवाल
- शिरपूरमध्ये भाजपाचे काशीराम पावरा
- धुळे ग्रामीण मध्ये भाजपाचे राम भदाणे
- शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे विजयकुमार रावळ आघाडीवर
-
Maharashtra Election Results 2024: रावेर विधानसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर
रावेर विधानसभा निवडणूक
- दुसरी फेरी अखेर-
- अमोल हरिभाऊ जावळे – भाजप 6620- मते.
- धनंजय शिरीष चौधरी – काँग्रेस – 8555 मते.
- धनंजय चौधरी 2035 मतांनी आघाडीवर
-
Maharashtra Election Results 2024: भाजपाचे अनुप अग्रवाल आघाडीवर
धुळे शहर भाजपाचे अनुप अग्रवाल यांना पोस्टल मतदानात 600 मतांची आघाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: नावापूरमध्ये शिरीष नाईक आघाडीवर
नवापूर पहिली फेरीत काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांना 5059 मते मिळाली आहे. भरत गावित 1959 तर शरद गावित 2492 मते मिळाली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: किशोर पाटील पहिले फेरीनंतर 1240 मतांनी आघाडीवर
पाचोरा भडगाव मतदार संघाचे महायुतीची उमेदवार किशोर पाटील पहिले फेरीनंतर 1240 मतांनी आघाडीवर
-
Maharashtra Election Results 2024: अहिल्यानगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात कांबळे आघाडीवर
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे पहिल्या फेरी नंतर 1700 मतांनी आघाडी घेतली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: भाजपचे मंगेश चव्हाण आघाडीवर
चाळीसगाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर आहे. पहिली फेरी पूर्ण झाली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: काशीराम पावरा यांना आघाडी
पहिल्या फेरीत भाजप उमेदवार काशीराम पावरा यांना 4139 मतांची आघाडी घेतली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची आघाडी
चाळीसगाव विधानसभेतून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण 2200 मतांनी आघाडीवर आहे.
-
येवल्यात भुजबळांची 100 मतांची आघाडी
येवलात टपाली मतमोजणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना 100 मतांची आघाडी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे पिछाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: आमदार जयकुमार रावळ यांची आघाडी
शिंदखेडा मतदारसंघात आमदार जयकुमार रावळ यांची पहिल्या फेरीत 3 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: गुलाबराव पाटील यांची सहा हजार मतांनी आघाडी
जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यामान मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहा हजार मतांची आघाडी पहिल्या फेरीत घेतली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद आघाडीवर
मालेगाव मध्यमध्ये समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद टपाल मतमोजणीत आघाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: नाशिकमधील दिंगडोरीत झिरवाळ आघाडीवर
नाशिकमधील दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ आघाडीवर आहेत.
-
Maharashtra Election Results 2024: चाळीसगावमध्ये मतमोजणीला विलंब
चाळीसगाव विधानसभेत पोस्टल मतमोजणीला विलंब होत आहे. अजूनही पोस्टल मतमोजणी सुरू झाली नाही. धुळे शहर मतदार संघात अत्यंत धिम्या गतीने पोस्टल मतमोजणी होत आहे.
-
Maharashtra Election Results 2024: जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर पिछाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: देवळालीमध्ये योगेश घोलप आघाडीवर
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे योगेश घोलप आघाडीवर, तर अजित पवार गटाच्या सरोज आहेर पिछाडीवर आहेत.
-
Maharashtra Election Results 2024: नाशिकमध्ये भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर
नाशिक पूर्व मध्ये भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहे. सध्या पोस्टल मतांची मतमोजणी सुरु झाली आहे.
-
Maharashtra Election Results 2024: पाचोरा भडगाव मतदार संघात किशोर पाटील आघाडीवर
पाचोरा भडगाव मतदार संघात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतमोजणी शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांची आघाडी आहे. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे दुसऱ्या नंबरवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: नाशिकच्या ओझर विमानतळावरती खाजगी विमान तैनात
नाशिकच्या ओझर विमानतळावर निरमा ग्रुपचे विमान दाखल झाले आहे. 6 सीटर खाजगी विमान अहमदाबादहून नाशिकमध्ये दाखल झाले आहे. विजयी उमेदवारांना नेण्यासाठी हे विमान आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
Maharashtra Election Results 2024: नाशिक मध्य मतदार संघात फरांदे आघाडीवर
नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे आघाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: निफाडमध्ये कदम आघाडीवर
निफाडमध्ये टपाली मतमोजणीत अनिल कदम आघाडीवर, दिलीप बनकर पिछाडीवर आहे.
-
नगरमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: छगन भुजबळ, दादा भुसे आघाडीवर
येवल्यातून टपाली मतमोजणीत छगन भुजबळ आघाडीवर आहे. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे टपाली मोजणीत आघाडीवर आहे.
-
Maharashtra Election Results 2024: डॉ. विजयकुमार गावित, के सी पाडवी लढतीकडे लक्ष
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बॅलेट पेपरची मतमोजणी होत आहे. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी सुरू होणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी मंत्री के सी पाडवी यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Maharashtra Election Results 2024: पोस्टल मतमोजणीचा कल अर्ध्या तासात येणार
सरमिसळीनंतर कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या टेबलावर नियुक्ती केली आहे. पहिला टप्प्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मतपेट्यांमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतमोजणीचा कल अर्ध्या तासात येणार आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : उत्तर महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात
उत्तर महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर
जळगाव जिल्ह्यामध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. आता अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणारा मतमोजणी आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : हाय व्होल्टेज ड्रामामुळे नांदगाव मतदारसंघ चर्चेत
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदगाव मतदार संघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट ) आ.सुहास कांदे, अपक्ष उमेदवार माजी खा. समीर भुजबळ, शिवसेना ( ठाकरे गट ) गणेश धात्रक, अपक्ष डॉ. रोहन बोरसे आदींमध्ये झालेली चौरंगी लढत आहे. हाय व्होल्टेज ड्रामामुळे नांदगाव मतदारसंघ चर्चेत आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर
निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. चाळीसगाव विधानसभेतून मंगेश चव्हाण यांनी दुसऱ्यांदा भाजप महायुतीकडून निवडणूक लढवली.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : आरोग्य सेविका चिमुकल्या बाळासह केंद्रात
निवडणूक कर्तव्यावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल झाली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर चिमुकल्या बाळासह आरोग्य सेविका कर्तव्यावर आली आहे. कडाक्याच्या थंडी भल्या पहाटे सात महिन्यांचे बाळ आरोग्य सेविका आईसह मतमोजणी केंद्रावर पोहचली आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : नंदुरबारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त
नंदुरबार जिल्ह्यातील मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. मतमोजणी सुरू होण्याअगोदर उमेदवार प्रतिनिधींची मतमोजणी सेंटरवर सोडले जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त
नाशिक शहरातील मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या मध्य,पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघात काटे की टक्कर असल्याने या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी उमेदवारांमध्ये झालेले राडे या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : कर्मचाऱ्यांची तपासणी
धुळे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी अवघ्या काही वेळात मत मोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधी निवडणूक यंत्रणेकडून सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुक्ताईनगरकडे राज्याचे लक्ष
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिदेंसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यात लढत आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : धुळ्यात मतमोजणीची तयारी पूर्ण
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. 14 टेबलांवर 24 फेऱ्यातून मतदानाचा कौल समजणार आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील निवडणुकीची चर्चा सुरु होती. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. यामुळे गेल्या 30 वर्षांचा विक्रम मोडला गेला. राज्यात जास्त झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला मिळाला? ते आज समोर येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात चार, धुळे जिल्ह्यात पाच, जळगाव जिल्ह्यात ११, नाशिक जिल्ह्यात १५ तर अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे.
Published On - Nov 23,2024 6:56 AM