Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : देशात बंगालमध्ये सर्वाधिक, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

| Updated on: May 08, 2024 | 7:59 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting Live News and Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ जागा आहे. राज्यात नव्हे तर देशात सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहेत. तर धाराशीवमध्ये पैसे आणि दारु वाटप केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : देशात बंगालमध्ये सर्वाधिक, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान
Lok Sabha Election 2024

लोकसभेच्या निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. देशातून एकूण 1,351 उमेदवार तर महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी आपले नशिब अजमवत आहेत. आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती मतदार संघात सीआरपीएफच्या 12 तुकड्या तैनात केल्या आहेत. तर राज्य पोलीस दलाचे देखील 8509 कर्मचारी देखील बारामतीत बोलवण्यात आले आहे. सकाळीच अजित पवार मातोश्रीसह मतदान करण्यासाठी दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्का बजावला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 May 2024 10:08 PM (IST)

    महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

    महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशभरात तिसऱ्या टप्प्यात एकूण 93 जागांवर मतदान पार पडलं. भारतात तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालंय, ज्यात सर्वाधिक मतदान पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये झालंय. बंगालमध्ये 73.93 टक्के इतकं मतदान झालंय. उत्तर प्रदेशात 55.13 टक्के, मध्य प्रदेशात 62.28 टक्के मतदान, छत्तीसगडमध्ये 66.87 टक्के, बिहारमध्ये 56.01 टक्के मतदान, आसाममध्ये 74.86 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रातच झालंय. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झालं.

  • 07 May 2024 08:13 PM (IST)

    सांगली लोकसभेसाठी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद

    सांगली : सांगली लोकसभेसाठी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उद्या दुपारपर्यंत अंतिम टक्केवारी स्पष्ट होईल. 20 केंद्रावर मतदान प्रक्रिया आद्यप सुरू आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    सांगली लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय सरासरी टक्केवारी

    59 % – मिरज 57 %- सांगली 58 %- पलूस 51 % – खानापूर-आटपाडी 61 %- तासगाव -कवठेमहांकाळ 59 % जत

  • 07 May 2024 06:26 PM (IST)

    सोलापुरात पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आमने-सामने

    सोलापुरात पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आमने-सामने आले. सोलापुरातल्या श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यावेळी भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील होते उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मतदान केंद्रासमोर जमलेली गर्दी पांगवली.

  • 07 May 2024 06:23 PM (IST)

    धाराशिवमध्ये मतदानाची वेळ संपली तरी मतदानासाठी गर्दी

    धाराशिव लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 6 वाजता मतदानाची वेळ संपली तरी काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले आहे. 6 वाजेपर्यंतपर्यंत अंदाजे 60 टक्केपेक्षा जास्त मतदान होईल. मतदानाची वेळ संपल्यावर नागरिकांना रांगेत थांबवून ठेवले असून त्यांचं मतदान करुन घेतले जाणार आहे.

  • 07 May 2024 05:40 PM (IST)

    सातारा लोकसभा मतदारसंघात दुुपारी 5 वाजेपर्यंत 54.01 टक्के मतदान

    सातारा :  दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

    सातारा लोकसभा एकूण मतदान 54.01%

    वाई विधानसभा -51.09

    कोरेगाव विधानसभा- 57.21

    कराड उत्तर – 54.89

    कराड दक्षिण- 56.99

    पाटण – 50.03

    सातारा- 53.55

  • 07 May 2024 04:52 PM (IST)

    सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन

    सोलापूर :  सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आले. संबंधित मतदान केंद्रावर शांतता असून सुरळीत मतदान सुरू आहे.  जे मशीन जळाले आहेत त्यावरील मतदान मोजता येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याची कोणतीही गरज नाही. सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका युवकाने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला होता.

  • 07 May 2024 04:41 PM (IST)

    माढा लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न

    माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्या तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदार केंद्रावरती मतदारांनी ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • 07 May 2024 04:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांची लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका

    इंडिया आघाडीचे सर्वात मोठे नेते जेलमधून बाहेर आलेत. चारा घोटाळ्यात ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली. ते म्हणतायत इंडिया आघाडीचं सरकार आले तर मुस्लिमांना पुर्ण आरक्षण देणार. पुर्ण आरक्षण कोणाकडे आहे. एससी , एसटी आणि ओबीसीकडे आहे. हे सर्व आरक्षण हिसकावून मुस्लिमांना देणार म्हणतायत. वोट बँक पक्की करण्याच काम करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केलीय.

  • 07 May 2024 04:28 PM (IST)

    तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार, त्यामुळे विचार करून मतदान करा- मोदी

    तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा. देशात आणथीन विकास होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सरकार अनेक योजना आणत आहे- नरेंद्र मोदी

  • 07 May 2024 04:15 PM (IST)

    इंडिया आघाडीतील मोठे नेते नुकतेच बाहेर आलेत- नरेंद्र मोदी

    आमच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशहिताचा एकही मुद्दा नाही. काँग्रेसने 50 वर्षे फक्त गरिबी हटावचे नारे दिले. इंडिया आघाडीतील मोठे नेते नुकतेच बाहेर आलेत- नरेंद्र मोदी

  • 07 May 2024 04:10 PM (IST)

    देशात भाजप आणि एनडीएला मोठं समर्थन मिळत आहे- नरेंद्र मोदी

    देशात भाजप आणि एनडीएला मोठं समर्थन मिळत आहे. काँग्रेसजवळ बोलण्यासाठी काहीच नाही. गरिबी हटवण्यासाठी खोटी आश्वासने देत त्यांची फसवणूक केल्याचं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची नगरमध्ये सभा सुरू आहे.

  • 07 May 2024 03:52 PM (IST)

    पंजाबमधील फिरोजपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शेर सिंग यांना तिकीट दिले

    लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शेरसिंग घुबया यांना फिरोजपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली.

  • 07 May 2024 03:37 PM (IST)

    अभिनेता शेखर सुमन यांच्या हाती कमळाचं फूल, पक्ष प्रवेशानंतर म्हणाले…

    भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, अभिनेते शेखर सुमन म्हणतात, “मी येथे कोऱ्या पाटीसह आलो आहे.आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, म्हणूनच मी येथे आलो आहे. बरोबर काय अयोग्य यावर आपण खूप चर्चा करतो पण आपल्याला या व्यवस्थेत सामील होण्याची गरज आहे.मी याच विचाराने आलो आहे.”

  • 07 May 2024 03:25 PM (IST)

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मतदान केलं

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बारपेटा लोकसभा मतदारसंघात मतदान केले. एनडीएने काँग्रेसच्या दीप बायन यांच्या विरोधात असम गण परिषदेचे (एजीपी) उमेदवार फणी भूषण चौधरी यांना उभे केले आहे.

  • 07 May 2024 03:10 PM (IST)

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली एसएम कृष्णा यांची भेट

    माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मी त्यांना भेटायला आलो आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की, ते लवकर बरे व्हावेत.”

  • 07 May 2024 03:06 PM (IST)

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळाहून नगरकडे रवाना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळाहून नगरकडे रवाना झाले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी नगर येथे मोदींची सभा होत आहे. नगर दक्षिण मधून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत.

  • 07 May 2024 03:05 PM (IST)

    रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी गिरीश महाजन मैदानात

    रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात रक्षा खडसेंची भव्य प्रचार रॅली होत आहे.

  • 07 May 2024 03:04 PM (IST)

    अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

    महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर येथे महाविजय संकल्प सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस या सभेला उपस्थित राहणार आहेत.

  • 07 May 2024 03:02 PM (IST)

    दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

    लातूर – ३२.७१ टक्के

    सांगली – २९.६५ टक्के

    बारामती – २७.५५ टक्के

    हातकणंगले – ३६.१७ टक्के

    कोल्हापूर – ३८.४२ टक्के

    माढा – २६.६१ टक्के

    उस्मानाबाद – ३०.५४ टक्के

    रायगड – ३१.३४ टक्के

    रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ३३.९१ टक्के

    सातारा – ३२.७८ टक्के

    सोलापूर – २९.३२ टक्के

  • 07 May 2024 03:01 PM (IST)

    सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 32.78 टक्के मतदान

    दुपारी 1 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 32.78 टक्के मतदान

    वाई विधानसभा -31.29

    कोरेगाव विधानसभा- 33.93

    कराड उत्तर – 31.97

    कराड दक्षिण- 33.46

    पाटण – 33.09

    सातारा- 33.05

  • 07 May 2024 03:00 PM (IST)

    कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान

    कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान झाले आहे.
    चंदगड- 271- 37.15 टक्के
    कागल- 273-  40.03 टक्के
    करवीर -275- 42.12 टक्के
    कोल्हापूर उत्तर 276- 37.85 टक्के
    कोल्हापूर दक्षिण 274- 35.46 टक्के
    राधानगरी- 272- 38.18 टक्के
  • 07 May 2024 03:00 PM (IST)

    पश्चिम बंगालमधील मालदा येथील राजदौल भागात मतदानावर बहिष्कार

    मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, “आमच्या भागाचा कोणताही विकास झालेला नाही. रस्ते, पूल बांधले गेले नाहीत. इथले खासदार, आमदार गायब आहेत. सरकार आमचे म्हणणे ऐकून घेईपर्यंत कारण आम्ही इथेच बसून मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.”

  • 07 May 2024 03:00 PM (IST)

    हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान

    हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान झाले आहे. हातकणंगले- 278 – 39.65 टक्के इचलकरंजी 279 – 33.77 टक्के इस्लामपूर- 283- 37.20 टक्के शाहूवाडी- 277- 35.48 टक्के शिराळा- 284- 34.98 टक्के शिरोळ – 280- 35.71 टक्के

  • 07 May 2024 02:53 PM (IST)

    राज्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.55 टक्के मतदान

    देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. यात दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92 टक्के मतदान झालं आहे. राज्यात हा आकडा 31.55 टक्के इतका आहे.

  • 07 May 2024 02:47 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी 20 मे पर्यंत

    दिल्लीच्या एक्साईज पॉलिसी प्रकरणात दिल्ली कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीने कोठडी 20 मे पर्यंत वाढवली.

  • 07 May 2024 02:00 PM (IST)

    महाडमधील खैरे गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

    महाड मधील खैरे गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.  आमच्या गावात दोन कंपन्या होत आहे. त्यांचा आम्ही आधीपासून विरोध करत होतो, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही यावेळी मतदान करणार नाही, अशा भावना खैरे गावातील नागरिकांनी बोलून दाखवल्या.

  • 07 May 2024 01:50 PM (IST)

    सोलापूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत किती झाले मतदान?

    सोलापूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी अशी आहे. सोलापूर लोकसभा 29.31 टक्के तर माढ्याचे मतदान 26.77 टक्के इतके मतदान झाले.

  • 07 May 2024 01:45 PM (IST)

    धाराशिवमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत किती टक्के मतदान?

    लोकसभा साठी सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत 30.54 % मतदान

    औसा 31.89 उमरगा 32 तुळजापूर 31.57 उस्मानाबाद 29.13 परंडा 30.6 बार्शी 28.24

  • 07 May 2024 01:40 PM (IST)

    सांगलीत जिवंत असलेल्या मतदाराला यादीत दाखवलं मयत

    सांगलीमध्ये जिवंत असलेला मतदाराला मतदार यादीत चक्क मयत दाखवलं आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदार केंद्रावर अजब प्रकार समोर आला आहे.  दिनकर संकटे आणि ग्रामस्थांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. इतकंच नाहीतर निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदार सचिन दिनकर सकटे, वय 36 राहणार वाळवा तालुक्यातील साखराळे गाव असे जिवंत असताना मयत दाखवलेल्या नागरिकांचे नाव आहे.

  • 07 May 2024 01:30 PM (IST)

    विद्यमान सरपंच मंदाकिनी भिसे यांच्या मुलाला पैसे देतानाचे व्हिडिओ व्हायरल

    काटेवाडीच्या माजी सरपंच यांचे विद्यमान सरपंच मंदाकिनी भिसे यांचा मुलगा सागर भिसे याला पैसे देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  पैसे देतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आहे.

  • 07 May 2024 01:22 PM (IST)

    बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोपावर जयंत पाटील म्हणाले….

    बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, ‘पोलीस आणि सरकारी यंत्रणा सत्ताधारी सरकारला बळी पडत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच पराभवाच्या भीतीने ज्यांचा पराभव होणार आहे, तो प्रचंड पैसे खर्च करत आहे, अशी देखील टीका जयंत पाटलांनी केली आहे.’

  • 07 May 2024 01:15 PM (IST)

    हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्त्यांत जोरदार राडा

    हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर गोंधळ उडाला.  महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला. या दोन्ही गटात जोरात बाचाचची आणि जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते.

  • 07 May 2024 12:55 PM (IST)

    धैर्यशील माने यांची राजू शेट्टींवर सडकून टीका

    दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं काम राजू शेट्टी करतात. त्यांच्या बुडक्या डोक्याला मीच फेटा बांधणार. इचलकरंजी शहराला पाणी कोण देणार हा येणारा काळच ठरवेल. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काय कामे केली हे जनतेला माहित आहे, असे धैर्यशील माने यांनी म्हटले.

  • 07 May 2024 12:38 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका

    भावनिक मुद्दे करून निवडणूक जिंगता येत नाही. रोहित पवारांना अजून शिकायचं आहे, लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही. तुमचा पराभव निश्चित आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

  • 07 May 2024 12:29 PM (IST)

    उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची पहिली सभा

    धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा…

    उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंची पहिलीच सभा…

  • 07 May 2024 12:22 PM (IST)

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोक उत्सुक- राधाकृष्ण विखे पाटील

    प्रत्येक तालुक्यातून सभेला येण्यासाठी लोकांची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे ही सभा रेकॉर्डब्रेक होईल, राधाकृष्ण विखे यांचा विश्वास

  • 07 May 2024 12:11 PM (IST)

    लातूरच्या सुनेगावच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

    लातूरच्या सुनेगावच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार पुढे आलाय.

  • 07 May 2024 12:02 PM (IST)

    सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी

    काकी आशा पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे या नुकताच अजित पवार यांच्या घरी पोहचल्या आहेत.

  • 07 May 2024 12:00 PM (IST)

    Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये मशीन बदलल्या

    धाराशिवमध्ये तांत्रिक कारणांमुळे मशीन बदलल्या. 29 ठिकाणी vvpat, 22 evm मशीन व 9 कंट्रोल युनिट काही तांत्रिक कारणांमुळेल बदलल्या, हे प्रमाण 1 टक्का पेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले. 10 ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्यात आला मात्र प्रशासनाने तो प्रश्न सोडवत मागे घ्यायला लावल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 07 May 2024 11:50 AM (IST)

    लोकसभा निवडणूक 2024 : सरकारवर जनता नाराज

    बारामती लोकसभा मतदारसंघामधील भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या दहा वर्षात जे सरकार होतं, त्यांनी 10 वर्षात दिलेल्या आश्वासनबद्दल जनतेची नाराजी दिसत आहे, असे मतदानानंतर ते म्हणाले.

  • 07 May 2024 11:40 AM (IST)

    Lok Sabha Election 2024 : गौतम अदानी यांनी केले मतदान

    अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी मतदान केले. अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  • 07 May 2024 11:40 AM (IST)

    लोकसभा निवडणूक 2024 : काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केले मतदान

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटक मधल्या कलबुर्गी मतदार संघातल्या मतदान केंद्रावर खर्गे यांनी मतदान केलं.

  • 07 May 2024 11:30 AM (IST)

    Solapur Lok Sabha Election : 101 वर्षांच्या आजोबांचे मतदान

    सोलापुरात 101 वर्षांच्या आजोबांनी मतदानाचा अधिकार बजावला. 100 किलोमीटर अंतरावरून शहरात दाखल होत शिवलाल मछले यांनी मतदान केले. ह भ प शिवलाल महाराज मछले यांचे वय 101 वर्षांचे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून ते मतदानासाठी सोलापुरात दाखल झालेत.

  • 07 May 2024 11:20 AM (IST)

    Lok Sabha Election 2024 : आमदार राजेंद्र राऊत यांचे मतदान

    बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला.धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी विधानसभेचा समावेश आहे. देशाची सुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला मतदान करण्याचे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

  • 07 May 2024 11:10 AM (IST)

    Maharashtra Elections 2024 : क्योंकि बात मुल्क बचाने की है…

    …क्योंकि बात मुल्क को बचाने की है, क्योंकि बात संविधान बचाने की है, अशी समाज माध्यमावर पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी मतदान केले. सुषमा अंधारे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला.

  • 07 May 2024 11:00 AM (IST)

    Osmanabad Lok Sabha Election : पैसे-दारु वाटपाबाबत गुन्हा

    धाराशिव जिल्ह्यात पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटणयाचा प्रकारात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्यासाठी 500 रुपये व दारू वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 07 May 2024 10:49 AM (IST)

    Election Voting : मतदानासाठी निघालेल्या मतदाराच दुःखद निधन

    मतदान केंद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असताना दाभेकर कोंड गावातील रहिवासी प्रकाश चिनकटे यांचं दुःखद निधन. आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली घटना. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पायी जात होते. प्रकाश चिनकटे चक्कर येऊन रस्त्यावर जागीच कोसळले. महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या मतदान केंद्रानजीक हे घडलं.

  • 07 May 2024 10:41 AM (IST)

    Baramati Loksabha : ‘आई तर सर्वांकडे आहे’, राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया

    मेरे पास माँ है असं अजित पवार आज सकाळी मतदान करताना म्हणाले. त्यावर राजेंद्र पवार यांनी, ‘आई तर सर्वांकडे आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार यांच्या विचारांना जनता साथ देईल. महागाईमुळे जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. 4 जूनला सुप्रिया सुळेच विजयी झाल्याचे पाहवयास मिळेल” असं राजेंद्र पवार म्हणाले.

  • 07 May 2024 10:30 AM (IST)

    Sindhudurg Loksabha Election : गाडा बिडा हे तुमच्या स्वप्नात झालं – नारायण राणे

    “विरोधी उमेदवाराला माझ्या समोर यायला तरी सांगा. गाडा बिडा हे तुमच्या स्वप्नात झालं. तुम्ही चालताय ते माझ्यासारखे शिवसैनिक शिवसेनेत होते म्हणून. शिवसेना नारायण राणेसारख्या शिवसैनिकांनी उभी केली. यांच्या बस की बात नाही” असं नारायण राणे म्हणाले.

  • 07 May 2024 10:27 AM (IST)

    Sangli Loksabha Election : विश्वजीत कदम यांचं संपूर्ण कुटुंबासह मतदान

    काँग्रेसचे आमदार, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी संपूर्ण कुटुंबासह केलं मतदान. कडेगाव तालुक्यातील सोनसळ या मूळ गावी बजावला मतदानाचा हक्क. विश्वजित कदम यांनी आई विजयमाला कदम आणि पत्नी स्वप्नाली कदम यांच्या बजावला मतदानाचा हक्क.

  • 07 May 2024 10:26 AM (IST)

    Solapur Loksabha Election : करमाळा तालुक्यात EVM मशीनची दुरुस्ती

    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे ईव्हीएम मशीन काही काळ बंद होते. मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. ईव्हीएम मशीनचे कनेक्शन लूज असल्याने बंद झाले होते ते तात्काळ सुरू करण्यात आले. मतदान करत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे

  • 07 May 2024 09:55 AM (IST)

    Live Update | बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळपासून ५.७७ टक्के मतदान

    बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळपासून ५.७७ टक्के मतदान… बारामती विधानसभा मतदारसंघात ७.७५ टक्के मतदान… पुंरदर विधानसभा मतदारसंघात ४.९४ टक्के मतदान… दौंड विधानसभा मतदारसंघात ७.०० टक्के मतदान

  • 07 May 2024 09:47 AM (IST)

    Live Update | पुण्यातील आंबेगावातील मतदान केंद्रावर मतदार याद्यात गोंधळ

    मतदार यादीत नाव नसल्याने मतदार संतप्त… मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले मात्र यादीत नावच नसल्याचा आरोप… मतदार यादीत मतदारांची नावच नसल्याचा प्रकार… महिला बूथ केंद्रावरच थांबून आहेत

  • 07 May 2024 09:37 AM (IST)

    Live Update | भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बाजवला मतदानाचा हक्क

    भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बाजवला मतदानाचा हक्क… सहकुटुंब मतदान केंद्रावर जात हर्षवर्धन पाटील यांनी केलं मतदान… मूळगावी बावडा गावात जात बाजवला मतदानाचा हक्क…

  • 07 May 2024 09:25 AM (IST)

    Live Update | रितेश देशमुख यांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क

    लातूर येथील बाबळगाव मतदान केंद्रावर रितेश देशमुख यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. आई वैशाली देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख यांच्यासोबत रितेश यांनी मतदान केलं आहे.

  • 07 May 2024 09:14 AM (IST)

    Live Update | बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे बाजवणार मतदानाचा अधिकार

    बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे बाजवणार मतदानाचा अधिकार… बारामती शहरातील मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे करणार मतदान… आपल्या आईसोबत सुप्रिय सुळे करणार मतदान… प्रतिभा पवार देखील बजवणार मतदानाचा अधिकार

  • 07 May 2024 08:56 AM (IST)

    Lok Sabha Election : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

    शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवार यांचं मतदान पार पडलं.

  • 07 May 2024 08:46 AM (IST)

    Lok Sabha Election : शरद पवार मतदान केंद्रावर दाखल

    सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबियांसह शरद पवार हे मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.

  • 07 May 2024 08:37 AM (IST)

    Lok Sabha Election : माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराने बनावट नोटा वाटल्या – उत्तम जानकर

    माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराने बनावट नोटा वाटल्या असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.

  • 07 May 2024 08:26 AM (IST)

    Lok Sabha Election : लातूरमध्ये रितेश , जेनेलियासह देशमुख कुटुंबाने बजावला मतदानाचा अधिकार

    अभिनेता रितेश देशमुख, त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांनी लातूरमध्ये मतदान केलं.

  • 07 May 2024 08:19 AM (IST)

    Lok Sabha Election : लातूरच्या सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

    लातूरच्या सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. विविध मागण्यासांठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

    लातूर-नांदेड मार्गावर कटऑफ पॉईंट देण्याची मागणी आहे.

  • 07 May 2024 08:06 AM (IST)

    Lok Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा अधिकार, अहमदाबादमध्ये केलं मतदान

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क. निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन मोदींनी केलं मतदान.

  • 07 May 2024 08:04 AM (IST)

    Lok Sabha Election : सोलापूर- गंगेवाडीतील केंद्रावर VVPAT मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान थांबलं

    सोलापूर- गंगेवाडीतील केंद्रावर VVPAT मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांपासून या मतदान केंद्रावर मतदान थांबले आहे.

  • 07 May 2024 07:55 AM (IST)

    Lok Sabha Election: राजू शेट्टी यांनी बजावला मतदानाचा हक्क

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरोळ येथे प्राथमिक शाळेमध्ये जाऊन मतदान केंद्रावर त्यांनी कुटुंबियासह मतदान केले.

  • 07 May 2024 07:50 AM (IST)

    Lok Sabha Election: अमित शाह यांनी केले मतदान

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकाळीच मतदान करण्यासाठी दाखल झाले. अमित शाह यांनी अहमदाबादमधील शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

  • 07 May 2024 07:40 AM (IST)

    Lok Sabha Election: धाराशिव मतदानासाठी रांगोळी

    धाराशिव लोकसभासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. गोवर्धनवाडी येथे नागरिकांनी मतदान केंद्रात पुजा करुन रांगोळी काढली आहे. जनजागृती करण्यासाठी रांगोळी काढण्यात आली. नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

  • 07 May 2024 07:30 AM (IST)

    Lok Sabha Election: सांगलीत मतदानास सुरुवात

    सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकी साठी तब्बल 18 लाख 68 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  • 07 May 2024 07:20 AM (IST)

    Lok Sabha Election: माझी आई माझ्यासोबत- अजित पवार

    माझी आई माझ्यासोबत आहे. परंतु विरोधक भावनिक प्रचार करत आहेत. ही गावाची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे, असे अजित पवार यांनी काटेवाडीत मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • 07 May 2024 07:18 AM (IST)

    Lok Sabha Election: सातारा लोकसभा मतदानास सुरवात

    सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कराड तालुक्यातील ग्रामीण भागात ही सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सकाळीच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

  • 07 May 2024 07:11 AM (IST)

    Lok Sabha Election: अजित पवार सकाळीच मतदानासाठी दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेदवार सुनेत्रा पवार काटेवाडीत मतदान करण्यासाठी दाखल झाले. सकाळी सात वाजताच अजित पवार त्यांच्या मातोश्रीसह मतदान केंद्रावर पोहचल्या. काटेवडीत मतदान करण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी झाली.

Published On - May 07,2024 7:08 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.