तगडा झटका… विनोद तावडे यांच्या उपस्थित आपच्या खासदार आणि आमदाराचा पक्षप्रवेश

पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. पंजाबमध्ये 1 जून रोजी मतदान होणार आहे. यंदा देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पंजाबच्या दोन खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी काँग्रेसच्या तर आज आम आदमी पार्टीच्या खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तगडा झटका... विनोद तावडे यांच्या उपस्थित आपच्या खासदार आणि आमदाराचा पक्षप्रवेश
vinod tawdeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 7:18 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असतानाच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या एका खासदार आणि आमदाराने आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ऐन लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारानेच पक्षाला सोडचिठ्ठी देणं हा आम आदमी पार्टीसाठीचा मोठा झटका मानला जात आहे. पंजाबमध्ये 13 जागा आहेत. त्यामुळे या जागा जिंकण्यासाठी आप, काँग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. ही रणधुमाळी सुरू असतानाच आपला मोठा झटका बसला आहे.

जालंधरमधील आपचे खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिम येथील आमदार शीतल अंगुराम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पक्ष सदस्यत्व घेतलं. यावेळी भाजप नेते विनोद तावडे उपस्थित होते. भाजप पंजाबमधून स्वबळावर निवडणूक लढत आहे. आप आणि काँग्रेसचीही राज्यात आघाडी झालेली नाहीये. सुशील कुमार रिंकू यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आपला मोठा झटका बसला आहे. कारण या मतदारसंघातून आपने सुशील कुमार यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तसेच पक्षाने सुशील कुमार यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही, असं सांगितलं जातं.

पोटनिवडणुकीत विजयी

जालंधरमध्ये 2023मध्ये पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुशील कुमार यांनी 58 हजार 691 मतांनी विजय मिळवला होता. सुशील कुमार हे काँग्रेसचे माजी आमदार होते. त्यांनी एप्रिल 2023मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जालंधरमधील पोटनिवडणुकीत उभं करण्यात आलं. या निवडणुकीत ते विजयी होऊन संसदेत गेले होते. आता सुशील कुमार हे भाजपमध्ये गेल्याने ते भाजपच्या तिकीटावर लढणार आहेत. मात्र, भाजप त्यांना कोणत्या जागेवरून लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काँग्रेसचा खासदारही भाजपमध्ये

पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते, आमदार आणि खासदार सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मंगळवारी लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बिट्टू पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. बेअंत सिंग यांची 1995मध्ये चंदीगडमध्ये आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.