दुस-या जागेचा विचार नाही, माझी भूमिका ठाम आहे; मी पणजीतूनच लढणार
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून डावलंल्यानंतर त्यांनी पणजीतून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
गोवा – गोव्यासाठी (GOA) भाजपची (BJP) पहिली यादी (FIRST LIST) जाहीर झाली, त्यामध्ये मनोहर पर्रीकरांच्या (MANOHAR PARRIKAR) मुलाला उत्पल पर्रीकर (UTPAL PARRIKAR) यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं नाही. त्यांना बिचोली (BICHOLI) मतदार संघातून निवडणुक लढण्याचा भाजपच्या कमिटीकडून सांगण्यात आलं. नुकत्याचं एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अन्य जागेवरून लढण्याचा माझा अजिबात विचार नाही.
उत्पल पर्रीकरांची भूमिका ठाम
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून डावलंल्यानंतर त्यांनी पणजीतून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. भाजपने दिलेल्या पर्यायाचा मी करत नसून मला पणजीतून निवडणुक लढवायची आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. भाजपकडून त्यांना बिचोरी मतदार संघ देण्यात आला होता. भाजपकडून आमदार बाबुश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी जाहीर केल्यामुळे तिथं उत्पल काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
मी पणजीतूनच लढणार
भाजपकडून दिलेल्या बिचोली या मतदार संघातून निवडणुक लढण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे ते पणजी या मतदार संघावर ठाम आहेत. त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मी अजूनही वाट पाहतोय, तसेच मी भूमिका मी लवकरचं जाहीर करीन असंही त्यांनी सांगितलं आहे. पण ते पणजी मतदार संघावर ठाम असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले.