गोहत्या, सीएए… जसं राज्य तसा सूर; भाजपची दुहेरी चाल!

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या चारही राज्यात निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. या प्रत्येक राज्यातील मुद्दे वेगळे आहेत. (Not just CAA, even cow slaughter ban has forced BJP to play different tunes in polls)

गोहत्या, सीएए... जसं राज्य तसा सूर; भाजपची दुहेरी चाल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 5:18 PM

चेन्नई: तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या चारही राज्यात निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. या प्रत्येक राज्यातील मुद्दे वेगळे आहेत. प्रश्न वेगळे आहेत आणि प्रत्येक राज्याची राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळेच भाजपने सध्या जसं राज्य तसा सूर आळवायला सुरू केलं आहे. त्यामुळे गोहत्या आणि सीएए सारख्या मुद्द्यावर राज्य पाहून भाजपने कुठे आक्रमक धोरण अवलंबलं आहे. कुठे मौन पाळणं पसंत केल्याचं दिसून येत आहे. (Not just CAA, even cow slaughter ban has forced BJP to play different tunes in polls)

भाजपने आसाममध्ये त्यांच्या जाहीरनाम्यातून सीएएचा मुद्दाच गायब केला आहे. आसाममध्ये भाजप सीएएवर बोलायलाही तयार नाही. तर पश्चिम बंगालमध्ये सीएए कायदा लागू करण्याबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. असंच काही तामिळनाडू आणि केरळच्याबातीत भाजपने धोरण स्वीकारलं आहे. तामिळनाडूत गोहत्या बंदीबाबत भाजप नेते तावातावाने बोलत आहेत. तर केरळमध्ये मात्र गोहत्या बंदीवर ब्र शब्दही काढायला तयार नाहीत.

गोहत्येचा मुद्दा

2016मध्ये भाजपने तामिळनाडूत 234 जागा लढवल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपला भोपळाही मिळाला नव्हता. आता भाजपने एआयएडीएमकेसोबत युती केली आहे. युतीत भाजपच्या वाट्याला 20 जागा आल्या आहेत. भाजपने तामिळनाडूतील जाहीरनाम्यातून राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच रेस्क्यू करण्यात आलेल्या गायींना मंदिरांकडून चालविल्या जाणाऱ्या गोशाळेमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, केरळमध्ये भाजपने या मुद्द्याला स्पर्शही केलेला नाही. त्यांच्या केरळमधील जाहीरनाम्यातून हा मुद्दाच गायब आहे. केरळमध्ये गोमांस मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं. त्यामुळे केरळमध्ये मुद्द्यावर भाजपने केवळ मतांसाठी मौन साधलं आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये वेगवेगळी भूमिका का?

नॅशनल सँपल सर्व्हे 2011-12च्या नुसार तामिळनाडूत बीफ खाणाऱ्यांची संख्या 40 लाख आहे. तर केरळमध्ये हा आकडा 80 लाख एवढा आहे. अर्थात बीफचा अर्थ म्हशीचं मटण असा होतो. गायीचं नव्हे. त्यामुळे गोहत्या बंदीचं आश्वासन दिल्यास केरळमध्ये भाजपला नुकसान होऊ शकतं.

सीएए: बंगालमध्ये एक, आसाममध्ये दुसरेच

केरळ-तामिळनाडूत बीफवरून वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या भाजपने सीएएच्या मुद्द्यावरून आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही वेगवेगळी भूमिका घेतली आहे. 2019मध्ये आसाममध्ये सीएएला सर्वाधिक विरोध झाला होता. विद्यार्थ्यांपासून बुजुर्गांपर्यंत सर्वांनी रस्त्यावर उतरून सीएएच्या विरोधात आंदोलन केलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे भाजपने आसाममध्ये सीएएच्या मुद्द्याला बाजूला ठेवलं आहे. तर बंगालमध्ये वेगळी परिस्थिती आहे. बंगालमध्ये मुस्लिम विरोधी भावना आणि एक कोटी मतुआ मतदारांना खूश करण्यासाठी राज्यात सीएए लागू करण्याचं आश्वासन भाजप देत आहे. भाजपच्या या दुहेरी नीतीने राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. (Not just CAA, even cow slaughter ban has forced BJP to play different tunes in polls)

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगालच्या रणधुमाळीतून गांधी कुटुंब दूर का?; भाजपला रोखण्यासाठी खेळी?

‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

मोदी बांगलादेशच्या दौऱ्यातून बंगाल, आसामचे सत्ता समीकरण साधणार?; वाचा, सविस्तर

(Not just CAA, even cow slaughter ban has forced BJP to play different tunes in polls)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.