नाराज “गुलाबी गँग”च्या नेत्यानी काँग्रेस सोडली; या पक्षात प्रवेशाची शक्यता ?

मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी माझी केंद्रीय स्तरावर तक्रार केली होती.

नाराज गुलाबी गँगच्या नेत्यानी काँग्रेस सोडली; या पक्षात प्रवेशाची शक्यता ?
गुलाबी गँगच्या नेत्या कमांडर संपत लाल
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 5:49 PM

उत्तरप्रदेश – देशाचं लक्ष लागून राहिलेल्या युपीच्या निवडणुकीत (up assembly election) दररोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. कारण उमेदवारांची पहिली यादी (first list) जाहीर झाल्यापासून पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आपण पाहतोय. सगळ्यात भाजपमधून (bjp) आमदार फुटून गेल्याची चर्चा युपीत जोरात आहे.

ज्यांना पक्षाकडून तिकीट जाहीर झाले आहे, असे उमेदवार खूश असून पुढच्या तयारीला लागले आहेत. तसेच ज्यांना डावललं गेलं आहे. उमेदवारांनी बंड केल्याचं चित्र युपीत पाहायला मिळतं आहे. युपीच्या चित्रकूट विधानसभा क्षेत्रातील गुलाबी गँगच्या नेत्या कमांडर संपत लाल या नाराज झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रविवारी संपत लाल यांनी आमचा आता काँग्रेस पक्षाशी असलेला संबंध संपलेला आहे. कारण इतके वर्षे काम करूनही त्यांनी मला येत्या विधानसभेसाठी तिकीट जाहीर केलं नाही. किंवा तिकीट यादीत माझं नाव नसल्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे असं त्यांनी सांगितलं.

मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी माझी केंद्रीय स्तरावर तक्रार केली होती. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी माझा हेतुपुरस्पर पत्ता कापला आहे. आता नेमकं युपीत काँग्रेसचं नेतृत्व काय करतं याबाबत मी दिल्लीत जाऊन तक्रार करणार असल्याचे सुध्दा संपत लाल यांनी सांगितले.

संपत लाल यांना 2012 आणि 2017 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. 2012 मध्ये संपत लाल यांना फक्त दोन हजार मते पडली होती. तसेच 2017 मध्ये त्यांना 40 हजार मते पडली होती. त्याच्या जाग्यावर सद्या रंजना भारतीलाल पांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पाल ‘गुलाबी गँग’ नावाची महिला संघटना चालवते. माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांचा 2014 मध्ये बनलेला ‘गुलाब गँग’ हा बॉलीवूड चित्रपट संपत पाल आणि त्यांच्या संस्थेकडून प्रेरित असल्याचे मानले जाते. संपत पाल टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ सीझन 3 मध्ये देखील दिसली होती.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस म्हणते आम्ही हाकालपट्टी केली

राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी, उद्या पटेल, आव्हाड गोव्यात जाऊन चर्चा करणार

पंजाबमध्ये आपच्या उमेदवाराचा राजीनामा, राघव चड्डा यांच्यावर गंभीर आरोप; मतदानाची तारिख बदलली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.