Punjab Assembly Elections | आम आदमी पक्षाने कंबर कसली, चौथ्या यादीत 15 उमेदवारांची नावे, आतापर्यंत 73 जागांवर दिले उमेदवार
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, तसेच पंजाबमधील प्रादेशिक पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीनेदेखील उडी घेतली असून आज या पक्षाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, तसेच पंजाबमधील प्रादेशिक पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीनेदेखील उडी घेतली असून आज या पक्षाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. 117 जागा असलेल्या पंजाब विधानसभेसाठी आम आमदी पार्टीने आतापर्यंत 73 जागांवर उमेदवार दिले आहेत. आतापर्यंतच्या तीन याद्यांमध्ये अनुक्रमे 10, 30 आणि 58 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती.
तिसऱ्या यादीत कोणाचा समावेश
तिसर्या यादीत आम आदमी पार्टीने सुलतानपूर लोधी येथून सज्जन सिंग चीमा, फिल्लौरमधून प्राचार्य प्रेम कुमार, होशियारपूरमधून पंडित ब्रह्मशंकर झिम्पा, अजनालामधून कुलदीप सिंग धालीवाल, जलालाबादमधून जगदीप गोल्डी कंबोज, अटारीमधून जसरविंदर सिंग आणि लुधियाना सेंट्रलमधून अशोक यांना उमेदवारी दिली आहे.
Aam Aadmi Party releases fourth list of 15 candidates for 2022 Punjab Assembly Elections pic.twitter.com/OdpITlnkb7
— ANI (@ANI) December 26, 2021
दुसऱ्या यादीत तीस जणांची नावे
यापूर्वी, 10 डिसेंबर रोजी आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यावेळी आपने 30 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. 30 उमेदवारांच्या यादीतपक्षाने काही उमेदवारांवर पुन्हा एकदा विश्वास दावखवला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. या यादीत महत्त्वाचा असलेल्या पठाणकोट या विधानसभा मतदारसंघातून विभूती शर्मा, गुरुदासपूरमधून रमण बहेल आणि दिनानगर (SC)मधून समशेर सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
पंजाबसाठी भाजपची काय तयारी?
तर दुसरीकडे भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये पुढील सरकार भाजपशिवाय बनणार नाही अशी रणनिती आखली जात आहे. पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलासोबत युती तुटल्यानंतर आता भाजप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत आहे. ही युती पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकेल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप पंजाब विधानसभेतील 117 पैकी 70 जागा लढण्याची योजना आखत आहे. अकाली दलासोबत युतीमध्ये भाजप 23 जागांवर निवडणूक लढत होती. आता भाजप अमरिंदर सिंह यांच्या पक्षाला 30 ते 35 आणि ढिंढसा यांच्या पक्षाला 15 जागा देऊ शकते.
इतर बातम्या :