Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?
Punjab Election 2022 : पंजाबमध्ये आपचं सरकार येण्याची शक्यता एबीपी सी न्यूज वोटरनं वर्तवली आहे. आम आदमी पार्टी सर्वाधिक जागा जिंकत सरकार स्थापनेचा दावा करु शकते, असा अंदाज या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वेक्षणानंतर पंजाबमधील राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतात, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. अशातच आता वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे अंदाज काय वर्तवतात, याकडे राजकीय जाणकारांची नजर लागलेली असणारच. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता नेमक्या काय सूचित करत आहेत, त्यानुसार राजकीय पक्षांची रणनितीही ठरवली जाईल, यातही शंका नाही. दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या एका सर्वेक्षणानुसार पंजबामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सगळ्या जास्त पसंती कुणाला मिळाली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वाधिक पसंती ही सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मिळाली आहे. मात्र या सर्वेक्षणात सगळ्यांची नजर सिद्धूवरही होती. त्यांचा नंबर या सर्वेक्षणात कितवा आला, यावरुन अनेक निष्कर्ष काढले जात आहेत. नवल म्हणजे या सर्वेक्षणानुसार आपचं सरकार पंजाबमध्ये येऊ शकतं असंही सांगण्यात आलंय.
कुणाचा कितवा नंबर?
पंजाबमध्ये कॅप्टर अमरींदर सिंह यांना 6 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली, तर सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी आश्चर्यकारकरीत्या आघाडी घेतली आहे. पंजाबमधील 17 टक्के लोकांना अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटलंय. तर दुसरीकडे सर्वाधिक पंसती ही चरणजीत सिंह चन्नी यांनाच मिळाली आहे. 29 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांना पसंती दर्शवली असून त्यांच्याखालोखार भगवंत मान यांना पसंती दर्शवली गेली आहे. 23 टक्के लोकांना असं वाटतंय, की भगवंत मान हे मुख्यमंत्री व्हावेत, तर नवज्योत सिंह सिद्धू यांना अवघ्या 6 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दर्शवली आहे. एबीपी न्यूज सी वोटरनं केलेल्या सर्वेतून ही आकडेवारी समोर आली आहे.
कुणाला किती टक्के पसंती?
- अमरिंदर सिंह – 6%
- खबीर सिंह बादल – 15%
- अरविंद केजरीवाल – 17%
- चरणजीत सिंह चन्नी – 29%
- नवजोत सिंह सिद्धू – 6%
- भगवंत मान – 23%
- इतर – 4%
सर्वेक्षणात नोंदवलेल्या ठळक बाबी!
एबीपी न्यूज सी व्होटरच्या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये आपला चाळीस टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पार्टीला 52-58 इतक्या जागा मिळतील, तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला एक ते तीन जागी विजय मिळू शकतो, अशी शक्यता आहे. तर अकाली दल 17 ते 23 जागी बाजी मारेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.
आपचं सरकार येण्याचा अंदाज
पंजाबमध्ये आपचं सरकार येण्याची शक्यता एबीपी सी न्यूज वोटरनं वर्तवली आहे. आम आदमी पार्टी सर्वाधिक जागा जिंकत सरकार स्थापनेचा दावा करु शकते, असा अंदाज या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वेक्षणानंतर पंजाबमधील राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतात, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला पंजबामध्ये आपच्या 20 जागा असून यात घसघशीत वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्याची पंजाबमधील स्थिती काय?
पंजाबमधील विधानसभेच्या एकूण जागा – 117
सध्याचं पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे
- भाजप – 3
- काँग्रेस – 77
- आप – 20
- अकाली दल – 15
इतर बातम्या –
Special Report | एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मैदानात! -tv9
Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील सुरक्षेच्या मुद्द्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता