Punjab Election Result 2022: पंजाबचा ‘सरदार’ कोण?, चन्नी की भगवंत मान; निकालाचं काऊंटडाऊन सुरू

पंजाब विधानसभेचा निकाल काही वेळातच जाहीर होणार आहे. साधारण दुपारी 12च्या आत पंजाबचं चित्रं स्पष्ट होईल. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या हाती राहणार की एक्झिट पोलनुसार पंजाबची सूत्रे आम आदमी पार्टीच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार आहे.

Punjab Election Result 2022: पंजाबचा 'सरदार' कोण?, चन्नी की भगवंत मान; निकालाचं काऊंटडाऊन सुरू
Punjab Assembly ElectionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 7:56 AM

चंदीगड: पंजाब विधानसभेचा (Punjab Assembly Election) निकाल काही वेळातच जाहीर होणार आहे. साधारण दुपारी 12च्या आत पंजाबचं चित्रं स्पष्ट होईल. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या(congress) हाती राहणार की एक्झिट पोलनुसार पंजाबची सूत्रे आम आदमी पार्टीच्या (aap) हाती जाणार हे स्पष्ट होणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी फेरबदल करत चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हा उपाय केला होता. पण त्यानंतरही कलह काही थांबला नाही. नंतर सिद्धू आणि चन्नी असा वाद सुरू झाला. त्यातच अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली. काँग्रेसनेही वाद काखोटीला बांधून चन्नी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. तर, दुसरीकडे आम आदमी पार्टीने भगवंत मान यांच्या नेतृत्वात मैदानात रणशिंग फुंकले होते. भाजपला तर पंजाबात चेहराच नव्हता. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. 117 जागांसाठी झालेल्या या मतदानात एक्झिट पोलनुसार सध्या आप आघाडीवर दिसतंय. आपची सत्ता येईल असं चित्रं आहे. त्यामुळे भगवंत मान पंजाबचे सरदार ठरतात की चन्नी दलित मतांना आपल्याकडे खेचून पंजाबची सरदारकी गाजवतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

117 मतदान केंद्र, 1304 उमेदवार

पंजाबमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिला कल अवघ्या अर्धा ते पाऊण तासात येण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी 66 ठिकाणी 117 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण 1304 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला काही तासातच होणार आहे. त्यात 93 महिला आणि दोन तृतियपंथीयांचाही समावेश आहे.

सर्वात कमी मतदान

राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. 14 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. राज्यात 71.95 टक्के मतदान झालं होतं. गेल्या तीन निवडणुकांच्या तुलनेत हे अत्यंत कमी मतदान होतं. 2017 मध्ये 77.40 टक्के, 2012मध्ये 78.20 टक्के, 2007मध्ये 75.45 टक्के आणि 2002मध्ये 65.14 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे या वेळी निकाल कुणाच्या बाजूने जातो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्याचा सत्ताधारी पक्ष

काँग्रेस

विद्यमान मुख्यमंत्री

चरणजीतसिंग चन्नी

कोण किती जागांवर लढलंय

पंजामध्ये 117 जागांपैकी भाजपने 71 जागा लढवल्या आहेत. त्यांचा मित्र पक्ष पंजाब लोक काँग्रेसने 27 आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त)ने 15 जागा लढवल्या आहेत. शिरोमणी अकाली दल 96, बसपा 20, आम आदमी पार्टी 117 आणि काँग्रेसनेही 117 जागा लढवल्या आहेत.

एक्झिट पोलचा कौल ‘आप’ला

TV9 Bharatvarsh/Polstratने पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला बहुमत मिळताना दिसत आहे. दिल्लीनंतर पंजाबमध्येही आपची सत्ता येणार आहे. आपची सत्ता असलेलं पंजाब हे आपसाठी दुसरं राज्य ठरणार आहे. TV9 भारतवर्ष/Pollstart च्या एक्झिट पोलनुसार आपला 56-61 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 24-29 जागा मिळताना दिसत आहेत. तर अकाली दलाला 22-26 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी अकाली दल आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. तर भाजप आघाडीला केवळ 1 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना किमान 3 जागा मिळण्याची शक्यताही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. या निवडणुकीत आपने 41.2 टक्के, काँग्रेसला 23.2 टक्के, अकाली दलाला 22.5 टक्के, भाजप आघाडीला 7.2 टक्के आणि इतरांना 5.9 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे पंजाबमधील राजकीय स्थिती?

पंजाब – एकूण जागा 117 भाजप 3 काँग्रेस 77 आप 20 अकाली दल 15

संबंधित बातम्या:

Up Election Exit polls : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता

Goa Exit Poll 2022 : गोव्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघात कोण बाजी मारणार? जाणून घ्या पणजीसह महत्वाच्या लढतींचा निकाल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.