Punjab Election: फोन करा आणि पंजाबचा मुख्यमंत्री ठरवा!! आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांचे जनतेला आवाहन

बंद खोलीत सीएमचा चेहरा ठरवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. आपण थेट लोकांनाच विचारुया, त्यांना त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांपैकी कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचे, हे ठरवता येईल,या विचाराने फोन करून मुख्यमंत्री ठरवण्याची संधी आम्ही जनतेला देत आहोत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Punjab Election: फोन करा आणि पंजाबचा मुख्यमंत्री ठरवा!! आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांचे जनतेला आवाहन
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे पंजाबच्या जनतेला आवाहन
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 1:00 PM

Punjab Assembly Election 2022: पंजाबमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) करिश्मा दाखवणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. अनेक सर्व्हेंमध्येही आपल्याला बहुमत मिळेल, असा कौल दिसून येतोय. यामुळे पंजाबचा पुढील मुख्यमंत्री आपचाच असेल फक्त आपच्या नेत्यांपैकी जनतेला कोणता मुख्यमंत्री हवाय, हे लोकांनीच सांगावं, असं आवाहन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलंय. यासाठी त्यांनी एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेनं आपल्या नेत्याचे नाव सांगावे. ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

आम आदमी पार्टी प्रमुख अरविंद केजरीवाल हे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘ जवळपास सर्वच सर्वेक्षणांमध्ये आपला 57, 57 किंवा 60 च्या जवळपास जागा मिळणार असल्याचा कौल दिसून येत आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काही पावलंच दूर आहोत, असे वाटते आहे. फक्त दोन-तीन जागांचाच प्रश्न आहे. सर्व मतदारांनी उत्साहानं मतदान करा, स्वयंसेवकांनी जोरदार प्रचार करा. एक शेवटचा धक्का मारा. किमान 80 च्या पुढे जागा आपकडे यायल्या हव्यात. पंजाबमध्ये आपचेचे सरकार बनेल, हे निश्चित आहे. त्यामुळे आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हाच पंजाबचा मुख्यमनंत्री असेल. अनेक पक्ष आपापल्या कुटुंबियांना, मुलाला, नातेवाईकाला मुख्यमंत्री बनवतात. पंजाबमध्येही भगवंतमानजी हे माझे लहान भाऊ आहेत. पंजाबमधील मोठे नेते आहेत. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवू, तेव्हा ते नको म्हणाले. बंद खोलीत सीएमचा चेहरा ठरवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. आपण थेट लोकांनाच विचारुया, त्यांना त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांपैकी कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचे, हे ठरवता येईल..

7074870748  वर फोन करा, भगवंत मान यांचं आवाहन

पंजाबमध्ये आपचे सर्वात मोठे नेते भगवंत मान हे असून आपची सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भगवंतमान म्हणाले, ‘ अनेकदा राजकीय पक्ष जनतेवर मुख्यमंत्री थोपवतात. लोकांना त्यांची सुख-दुःख समजून घेणारा नेता मुख्यमंत्री म्हणून हवा असतो. आपच्या नेत्यांपैकी कुणाला ही जबाबदारी द्यायची हे जनतेलाच ठरवू द्या, असा प्रस्ताव मी केजरीवाल यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर आम्ही 7074870748 हा नंबर जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, SmS करून, व्हॉट्सअप मॅसेज करून मनपसंद मुख्यमंत्र्याचा चेहरा जनतेनं सांगावा, असे आवाहन भगवंतमान यांनीही केले आहे.

इतर बातम्या-

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण; अंजली दमानिया यांची छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव

Pune Crime | पुण्यात 15 वाहने जाळून राख ; जाणीव पूर्वक आग लावल्याचा नागरिकांचा संशय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.