Punjab : मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चन्नी यांना धूळ चारली! वाचा आपच्या ‘आम’ उमेदवाराबद्दल

Punjab Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबच्या लोकांनी कमाल करुन दाखवली असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी हे विधान केलंय.

Punjab : मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चन्नी यांना धूळ चारली! वाचा आपच्या 'आम' उमेदवाराबद्दल
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा तो नेमका कोण?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:05 PM

पंजाब : पंजाबमध्ये आपची (Aam Aadami Party in Punjab) झाडू फॉर्मात असल्याचं दिसून आलंय. पंजाबमध्ये (Punjab) आपनं जोरदार मुसंडी मारली आहे. एका सर्वसामान्य माणसानं चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. सर्वसामान्यांचा पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीनं पंजाबमध्ये बदल घडवून आणला असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, चरणजीत सिंह यांचा पराभव करणाऱ्या आपच्या उमेदवाराचं नाव लाभ सिंह उगोके (Labh Singh Ugoke) असं आहे. आपचा हा विजयी उमेदवार एका मोबाईल रिपोरींग करणाऱ्या कंपनीत नोकरीला असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांची आई एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे, तर वडील शेतकरी आहेत, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर ते पंजाबमध्ये बोलेत होते.

‘दिग्गजांच्या खुर्च्या हादरल्या’

पंजाबच्या लोकांनी कमाल करुन दाखवली असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी हे विधान केलंय. यावेळी मनिष सिसोदियादेखील सोबत होते. पंजाबच्या निकालानं मोठमोठ्या खुर्च्या हादरल्या आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. सुखबिंदसिंह बादल, प्रकाशसिंह बादल, नवज्योत सिंह सिद्दी, विक्रम सिंह मजिठिया पराभूत झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये मोठा इन्कलाब झाला असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. केजरीवाल यांनी म्हटलंय की,

आपण असा भारत बनवुया, की कुठल्याही मुलाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जाण्याची गरज पडू नये, इतके मेडीकल कॉलेज आपण आपल्याच देशात बनवुया. तुम्हाला माहितीय, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना हरवणारा कोण आहे? त्याचं नाव आहे लाभ सिंग उगोके, काय करतो लाभ सिंग उगोके? तो एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या कंपनीत नोकरी करतो, त्याची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, वडील शेतात रोजंदारीवर काम करतात, अशा व्यक्तीने चन्नीला हरवलं आहे.

कोण आहेत लाभ सिंह उगोके?

लाभ सिंह उगोके यांनी भदौरमधून निवडणूक लढवली होती. आम आदमी पार्टीतर्फे निवडणूक लढवलेल्या आणि विजयी झालेल्या लाभ सिंह उगोके यांचं वय 35 वर्ष आहे. त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालंय. 3 लाख 70 हजार रुपये इतकी संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

कोण आहेत आपचे अजित कोहली ज्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पराभव केला?

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.