Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये काँग्रेसचं पानिपत, सिद्धूचं पहिलं ट्वीट!

Punjab Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: पंजाब हे राज्य शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनापुढे मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. तिन्ही शेतकरी कायदे रद्द करावे लागले. त्यानंतर या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचाही सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे.

Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये काँग्रेसचं पानिपत, सिद्धूचं पहिलं ट्वीट!
नवज्योत सिंग सिद्धू
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:31 PM

पाच राज्यांचे निवडणूक निकाल आज लागत आहेत. त्यात पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. मात्र, पंजाबचा पराभव हा काँग्रेसला (Congress) जोरदार धक्का समजला जातोय. या धक्क्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये इतके दिवस आक्रमक असलेले नवज्योतसिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu) यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. शिवाय पंजाबच्या (Punjab Assembly Election 2022) जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा, असे आवाहन केले आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये सिद्धू विरुद्ध अमरजित सिंग यांच्यातला संघर्ष पराकोटीचा रंगला होता. त्यानंतर अमरजित सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. या अंतर्गत कलहाचा फटका काँग्रेसला बसला असून, येथूनही त्यांची सत्ता गेली आहे.

सिद्धू यांचे ट्वीट काय?

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारली. त्यानंतर काँग्रसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात की, आम आदमी पक्षाचा विजय हा, लोकांचा आवाज आहे. आपचे अभिनंदन करत पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा, असे आवाहनही त्यांनी या ट्वीटमधून केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. येथे चरणजित सिंग चन्नी हे मुख्यमंत्री होते. सध्या निवडणुकीत काँग्रेसने 117 पैकी 71 जागा लढवल्या होत्या. मात्र, या ठिकाणी आता सर्वच्या सर्व जागा लढणाऱ्या आपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. सध्याच्या कौलानुसार जवळपास 91 जागा आपच्या खात्यात जाताना दिसतायत. मात्र, काँग्रेसला फक्त 17 जागा मिळताना दिसतायत.

शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत

पंजाब हे राज्य शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनापुढे मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. तिन्ही शेतकरी कायदे रद्द करावे लागले. त्यानंतर या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचाही सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. नवी दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने या असंतोषाचा लाभ उठवला असून, केजरीवाल यांच्यावर जनतेने विश्वास टाकल्याचे दिसत आहे. या ठिकाणी आपकडून भगवंत मान मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. हेच कल कायम राहिल्यास मान हे पंजाबचे मुख्यमंत्री असतील. भगवंत मानही राजकारणात येण्यापूर्वी जेलेन्स्की यांच्याप्रमाणे सिनेसृष्टीत होते. तेही फिल्मी दुनियेत कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते.

संबंधित बातम्या:

Election Result 2022 Live: शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले भारी, मणिपूरमध्ये रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशात भाजपाची मुसंडी, महाराष्ट्रातलं ठाकरे सरकारवर संकट? बीएमसीचेही गणित बदलणार?

Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.