नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections 2022) मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारनं वीज दरात 3 रुपये प्रति यूनिट कपात केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यमंत्री चन्नी यांच्या अनेक घोषणा शेअर केल्या आहेत. यात सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता आणि शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आलेल्या महत्वाच्या पावलांची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच गोशाळांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच सोलर यंत्रणा बसवण्यासाठी गोशाळांना 5 लाख रुपये दिले जातील.
मुख्यमंत्री चन्नी यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास एका वर्षाच्या आज युवकांसाठी 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार. तसंच युवकांना विदेशात जाण्यासाठी युवकांसाठी एक कार्यक्रम आखला जाईल, असंही चन्नी म्हणाले होते. त्यांनी एका खासगी महाविद्यालयात युवकांसाठी रोजगार गॅरंटी योजनेचा (पीआरएजीटीवाय) शुभारंभ केला होता. त्यावेळी 12 वी पास करणारे युवक नोकरीसाठी पात्र असतील असं म्हटलं होतं. सरकार बनल्यानंतर एका वर्षाच्या आज नोकऱ्या दिल्या जातील, असंही चन्नी म्हणाले होते.
The Congress Government in Punjab has reduced the electricity tariffs by three rupees per unit.#CongressHiAyegi #SarbatDaBhala pic.twitter.com/k4wWOcG8sF
— Punjab Congress (@INCPunjab) January 16, 2022
Under the Congress Government, DA for government employees has been increased by 11%.#CongressHiAyegi #SarbatDaBhala pic.twitter.com/XXeHV8HbJz
— Punjab Congress (@INCPunjab) January 16, 2022
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 86 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला निवडणूक प्रस्तावित आहेत. तर 10 मार्च रोजी निवडणूक निकाल आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे पुन्हा एकदा चमकौर साहेब विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू अमृतसरमधून निवडणूक लढवतील. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा पुन्हा एखदा डेरा बाबा नानकमधूनच निवडणूक लढवणार आहेत.
पंजाब काँग्रेसच्या पहिल्या यादीत 86 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात केवळ 9 महिलांना स्थान देण्यात आली आहे. दरम्यान, 0 टक्के महिलांना संधी देण्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर युवक काँग्रेसचे चार उमेदवार बरिंदर ढिल्लों, ब्रह्म मोहिंद्रा यांचा मुलगा मोहित मोहिंद्रा, अमरप्रीत लल्ली आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख सुनील जाखड यांचे भाचे संदीप जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच दोन खासदार डॉ. अमर सिंह आणि चौधरी संतोष सिंह यांच्या मुलाचाही काँग्रेसच्या पहिल्या यादीत समावेश आहे.
इतर बातम्या :