नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची (Punjab Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी भगवंत मान (Bhagwant Man) यांचा चेहरा देण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पंजाबचे नेतृत्व जो करेल, त्याला दुसरा व्यक्ती पाठिंबा देईल, असा शब्द विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांनी दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केलाय. इतकंच नाही तर राहुल गांधींच्या उपस्थितीत चन्नी आणि सिद्धू यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जालंधरमधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या ‘पंजाब फतेह’ रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात चरणजित सिंह चन्नी आणि नवज्योत सिंह सिद्धू यांनी मोठी घोषणा केलीय. आमच्यात कुठलीही लढाई नाही. पंजाब निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, असं चन्नी आणि सिद्धू राहुल गांधींना म्हणाले. त्यामुळे काँग्रेस हायकमांडसाठी डोकेदुखी बनलेल्या या विषयाचा गुंता आता सुटताना दिसत आहे.
#WATCH| Punjab CM Charanjit Singh Channi& State Congress chief Navjot Singh Sidhu assured me that whoever will lead (CM face) Punjab the other person will support him. Party workers will decide (name of CM face): Congress leader Rahul Gandhi in Punjab #PunjabAssemblyelections pic.twitter.com/BlW5edXIBb
— ANI (@ANI) January 27, 2022
काही दिवसांपूर्वीच पंजाब काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन जोरदार राडा पाहायला मिळत होता. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबाबत हायकमांडची डोकेदुखी वाढत होती. सिद्धू काही दिवसांपूर्वी स्वत:ला मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट करत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यांनी पक्षाचं घोषणापत्र येण्यापूर्वी चंदीगडमध्ये आपलं वेगळं पंजाब मॉडेल समोर ठेवलं होतं. सिद्धू यांनी या पंजाब मॉडेलच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा फोटो गायब होता.
There is no fight between us. Announce chief minister face for Punjab polls, we (Punjab Congress) will stand united: Punjab CM Charanjit Singh Channi said during a gathering where Congress leader Rahul Gandhi was also present pic.twitter.com/c3tkX5S408
— ANI (@ANI) January 27, 2022
सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडलाही खुलेआम चॅलेंज दिलं होतं. एका प्रश्नाला उत्तर देताना सिद्धू म्हणाले होते की, ‘पंजाबचे लोक मुख्यमंत्री बनवणार. मुख्यमंत्री हायकमांड बनवणार हे तुम्हाला कुणी सांगितलं? पंजाबच्या जनतेनंही पाच वर्षापूर्वी आमदार केलं होतं. आता आमदार बनवायचं की नाही हे पंजाबचे लोक निश्चित करतील. पंजाबचे लोक निर्णय तेव्हाच घेतील जेव्हा काही अजेंडा असेल. त्यामुळे हे विसरा. पंजाबचे लोकच आमदार बनवतील आणि पंजाबचे लोकच मुख्यमंत्री बनवतील’.
दुसरीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही आपले निर्णय आणि वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आणि मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी मजबूत केली होती. पंजाबच्या जनतेचे धन्यवाद, मला 111 दिवस मिळाले आहेत. त्यात मी 11 वर्षाचं काम करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला पसंतीही दिली. त्यामुळे पुढेही अपेक्षा आहे की आमचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल आणि पंजाबचे लोक आणि पंजाबच्या विकासासाठी काम करु शकू, असं वक्तव्य चन्नी यांनी केलं होतं.
इतर बातम्या :