Assembly Election 2022 Live Updates : समाजवादी पक्षाकडून भाजपवर गंभीर आरोप, निवडणुकीची वेगवान अपडेट

| Updated on: Feb 20, 2022 | 8:05 PM

Assembly Election 2022 Live Updates : उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) सर्व जागांसाठी निवडणूक पार पडतेय.

Assembly Election 2022 Live Updates : समाजवादी पक्षाकडून भाजपवर गंभीर आरोप, निवडणुकीची वेगवान अपडेट
पंजाबमध्ये मतदान सुरु

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 20 फेब्रुवारीला होणार आहे. उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप  विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या जागांसाठी 627 उमेदवार रिंगणात असतील. माजी मुख्यंमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या देखील जागा या टप्प्यात आहेत. भाजपच्या सतीश महाना आणि एसएसपी बघेल यांच्याही जागेवर मतदान होईल. दुसरीकडे पंजाब (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी यावेळी भाजपशी युती केलीय. पंजाबमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचा पंजाबच्या निवडणुकीवर किती परिणाम होईल, हे यानिमित्तानं समोर येईल. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला सुरुवात होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2022 07:15 PM (IST)

    पंजाबमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44 टक्के मतदान

    पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून 117 जागांसाठी सकाळी मतदानाला सुरुवात होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्याच वेळी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44 टक्के झाले. या निवडणुकीत 1,304 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 93 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर आहेत.

  • 20 Feb 2022 07:03 PM (IST)

    सपा सरकार आल्यास 11 लाख तरुणांना नोकऱ्या देऊ : अखिलेश यादव

    उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, ‘काका गेले तर बाबाही जातील. काका म्हणजे काळा कायदा. उत्तर प्रदेशात सुमारे 11 लाख पदे रिक्त आहेत, जी भरली जाणार आहेत. या सरकारने भरले नाही. सपाचे सरकार आल्यास 11 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम सपा करेल.

  • 20 Feb 2022 05:30 PM (IST)

    उन्नावमध्ये पंतप्रधान मोदींनी अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला

    उन्नावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ज्या सीटला हे लोक सर्वात सुरक्षित समजत बसले होते, ती सीटही हाताबाहेर जात आहे. ज्या बापाला स्टेजवरून ढकलून दिले, अपमानित करून पक्ष काबीज केला, त्याला माझी जागा वाचवा, अशी विनवणी करावी लागली. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार स्वतःच्या जागेवर असुरक्षित असताना वाऱ्याची दिशा कळू शकते.

  • 20 Feb 2022 05:18 PM (IST)

    रोड शो करण्यासाठी लखनौला पोहोचलेल्या शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना रिटर्निंग ऑफिसरने थांबवले

    रोड शो करण्यासाठी लखनौला पोहोचलेल्या शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी येथे रोड शो करण्यासाठी आले होते. मार्गही दिला आहे. सर्व काही ठरले होते. शेवटच्या क्षणी त्यांचा होकार फेटाळण्यात आला. ते मार्ग देत नसल्याचे रिटर्निंग अधिकाऱ्यांनी नाकारले. 14-15 पोलिस तेथे आले आणि तुम्ही रोड शो करणार नाही, असे सांगू लागले. तसे केल्यास आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ.

  • 20 Feb 2022 04:13 PM (IST)

    16 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 48.81 टक्के मतदान

    उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत 48.81 टक्के मतदान झाले आहे. आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत 35.88 टक्के मतदान झाले आहे. त्यावेळी एटामध्ये सर्वाधिक 42.31 टक्के आणि ललितपूरमध्ये 41.10 टक्के मतदान झाले होते. यापूर्वी सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.18 टक्के मतदान झाले होते, तर रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 8.15 टक्के मतदान झाले होते.

  • 20 Feb 2022 03:23 PM (IST)

    भाजपच्या मंत्र्याच्या मुलावर निवडणुकीत अडथळा आणल्याचा आरोप

    मैनपुरी जिल्ह्यातील 108 भोगाव विधानसभेतील 102, 103, 104 अलिपूर पट्टीवर बूथ क्रमांक 102, 103, 104 येथे भाजपच्या एका मंत्र्याचा मुलगा आपल्या शेकडो समर्थकांसह मतदानाचा डंप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

  • 20 Feb 2022 01:49 PM (IST)

    Punjab Election Voting Percentage : पंजाबमध्ये 1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान

    पंजाबमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान झालं आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी आमचं बहुमतांचं सरकार सत्तेत येईल, असं म्हटलं आहे.

  • 20 Feb 2022 01:07 PM (IST)

    उत्तर प्रदेशचा कारभार कायद्याप्रमाण करणार : अखिलेश यादव

    उत्तर प्रदेशातील कारभार हा कायद्याप्रमाणेच चालेल. समाजवादी पार्टी संस्थांना मजबूत करणार असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय. आम्हाला लोकशाहीमध्ये राहायचं आहे. ही निवडणूक देशातील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं संविधान आणि लोकशाही मजबूत होईल, असं अखिलेश यादव म्हणाले.

  • 20 Feb 2022 12:28 PM (IST)

    Uttar Pradesh Voting Percentage Updates : उत्तर प्रदेशात 11पर्यंत 26 टक्के मतदान

    Uttar Pradesh Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 21.18 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. ललितूपर मध्ये सर्वाधिक 26 टक्के मतदान झालं आहे. कानपूरमध्ये सर्वात कमी 16.79 टक्के मतदान झालं आहे.

  • 20 Feb 2022 11:04 AM (IST)

    शिरोमणी अकाली दलानं पोलिंग बुथ ताब्यात घेतले : आपचा आरोप

    शिरोमणी अकाली दलाकडून बुथवर ताबा घेण्यात आल्याचा आरोप आपच्या राघव चढ्ढा यांनी केला आहे. गुरु हर सहाय विधानसभा मतदारसंघात तील 23 नंबरच्या बुथवर हा प्रसंग घडल्याचं चढ्ढा म्हणाले. पंजाबमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाल्याचं दिसून आलंय.

  • 20 Feb 2022 10:23 AM (IST)

    Uttar Pradesh Voting Update : उत्तर प्रदेशमध्ये 9 वाजेपर्यंत 8.15 टक्के मतदान

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत 8.15 टक्के मतदान झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भात माहिती दिली आहे.

  • 20 Feb 2022 10:21 AM (IST)

    Kannauj Voting Percentage Updates : कनौजमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.11 टक्के मतदान

    Kannauj Voting Percentage Updates: कनौजमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.11 टक्के मतदान झालंय.

  • 20 Feb 2022 09:44 AM (IST)

    उत्तर प्रदेशात नवविवाहित जोडप्याकडून मतदान

    उत्तर प्रदेशात नवविवाहित जोडप्यानं मतदान केलं आहे. हनुमानगड लक्ष्मी कॉन्वेंट स्कूल मतदान केंद्रावर एका नवविवाहित जोडप्यानं मतदान केलं.

  • 20 Feb 2022 09:18 AM (IST)

    Shivpal Yadav : अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही :शिवपाल यादव

    तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळं अखिलेश यादव हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याचं चित्र दिसत आहे, असं शिवपाल यादव यांनी म्हटलं आहे. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असं देखील शिवपाल यादव म्हणाले. अखिलेश यादव 300 च्या बहुमतानं सरकार बनवतील, असं शिवपाल यादव म्हणाले.

  • 20 Feb 2022 09:08 AM (IST)

    Uttar Pradesh Election Update : उत्तर प्रदेशात काही ठिकाणी ईव्हीएम खराब

    उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील अमृतपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम खराब झाल्याचा दावा समाजवादी पार्टीकडून करण्यात आला आहे.

  • 20 Feb 2022 08:28 AM (IST)

    Punjab Election Update : पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

    Punjab Election Update : पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी आता मतदारांची मर्जी असल्याचं म्हटलं आहे.

  • 20 Feb 2022 07:37 AM (IST)

    Uttar Pradesh Election Update : तिसरा टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा

    उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत यापैकी 49 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं भाजपसाठी हा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे.

  • 20 Feb 2022 07:24 AM (IST)

    राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यात उद्या बैठक

    – राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यात उद्या बैठक,

    – इम्पिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होत असून त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन,

    – कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबत या बैठकीत नियोजन केले जाणार,

    – इम्पिरिकल डाटा जमा करण्याचे टप्पे आणि प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार.

  • 20 Feb 2022 07:10 AM (IST)

    Uttar Pradesh Election Update : उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

    उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी तिथं मतदान होत आहे.

  • 20 Feb 2022 06:49 AM (IST)

    Punjab Election Update : पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांसाठी 1304 उमेदवार रिंगणात

    पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांसाठी यावेळी 1304 उमेदवार रिंगणात आहेत. पंजाब राज्य स्थापनेपासून ही 16 वी निवडणूक आहे. 2017 मध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवली होती. काँग्रेसला 77, आम आदमी पार्टीला 20 जागा, शिरोमणी अकाली दलाला 15 आणि भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. पंजाबच्या विधानसभेचा कालावधी 27 मार्चला संपत आहे.

  • 20 Feb 2022 06:21 AM (IST)

    पंजाबमध्ये काँग्रेस समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान

    पंजाब (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी यावेळी भाजपशी युती केलीय. पंजाबमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे.

  • 20 Feb 2022 06:20 AM (IST)

    उत्तर प्रदेशातील 59 जागांसाठी मतदान, अखिलेश यादव यांची प्रतिष्ठा पणाला

    उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप  विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या जागांसाठी 627 उमेदवार रिंगणात असतील. माजी मुख्यंमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या देखील जागा या टप्प्यात आहेत. भाजपच्या सतीश महाना आणि एसएसपी बघेल यांच्याही जागेवर मतदान होईल.

Published On - Feb 20,2022 6:18 AM

Follow us
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.