Rahul Gandhi: “केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56″ घाबरले”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला.
वर्धा: कोंग्रेस संघटनेचं प्रशिक्षण शिबीर आज वर्धा्यामध्ये सुरू होतय. या निमीत्त काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत परत पोहवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवण्याची, जनतेला समजवण्याची गरज आहे. कलम 370, आतंकवाद, राष्ट्रीयता वर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला हवं. यामुळे आता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा, भाजपच्या विचारधारेमूळे संपत चालली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आम्ही परत जनतेपर्यंत पोहचवू ज्याने आज जो द्वेष पसरवला जात आहे तो बघायलाही मिळणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul gandhi slams BJP over Hindutva ideology. Slams for India-China conflict, says government is lying)
“Our ideology has been overshadowed because we’ve not propagated it among our own people aggressively,” Congress leader Rahul Gandhi added during a training program of ‘Jan Jagran Abhiyan’ via video conferencing
Source: Indian National Congress (INC) pic.twitter.com/66N2oIfUDT
— ANI (@ANI) November 12, 2021
“भाजप समाजाला बदलवू पहात आहे”
राहुल गांधी म्हणाले, की आजकाल काँग्रेसचे लोक भाजपा आणि आरएसएस मध्ये जातात. मात्र, तिथे टिकत नाही कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहेत, तर भाजपा चे आयकॉन सावरकर आहेत. उत्तरखंडमधले काँग्रेस नेते यशपाल आर्यंचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा त्यांना परतन्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की भाजपमध्ये राहणं कठीण आहे, ते समाजाला बदलवू पहात आहे ते आमचा उपयोग करून घेतला जातो. त्यामूळे, काँग्रेस कार्यकर्ता जरी भाजपा, आरएसएसमध्ये गेले तरी तिथे टीकत नाहीत.
चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला. “राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली आहे कारण GOI कडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतायेत,” राहुल गांधी म्हणाले.
हमारी राष्ट्रीय सुरक्षा से आपराधिक खिलवाड़ की जा रही है क्योंकि मोदी सरकार के पास कोई स्ट्रैटेजी नहीं है और Mr 56 इंच डर गए हैं।
मेरी संवेदनाएँ उन जवानों के साथ हैं जो अपनी जान पर खेलकर हमारे बॉर्डर की रक्षा कर रहे हैं जबकि केंद्र सरकार झूठ पे झूठ बोल रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 12, 2021
हे ही वाचा –