Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा निर्णय; बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा निर्णय; बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केलं 'हे' आवाहन
rahul gandhi
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 12:03 PM

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.

भाजप, टीएमसीची कोंडी

देशभरात कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहेत. देशातील अनेक राज्यात तर रुग्णांना बेड्सही मिळत नाहीत. तसेच अनेक राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलींमुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये म्हणून राहुल यांनी रॅली न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप आणि टीएमसीची मोठी कोंडी झाली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तर ममता बॅनर्जी या राज्याच्या प्रमुख आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हे दोन जबाबदार नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मृतांचा आकडा पाहून राहुल काय म्हणाले?

दरम्यान, गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 24 तासात 261500 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 1501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा प्रकारे मरणाऱ्यांची आणि रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाहिली आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

संबंधित बातम्या:

West Bengal Election 2021 : मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढा; ममता बॅनर्जींच्या कथित ऑडिओने खळबळ

West Bengal Election 2021: राहुल गांधींची अखेर बंगालमध्ये एन्ट्री; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर टीकास्त्र

प्रचारबंदीनंतरही ममता बॅनर्जी 2 जाहीर सभा करणार! हे कसं शक्य? वाचा सविस्तर

(Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.