6 रुपयांचा चहा अन् 37 रुपयांचा नाष्टा, कार आणि हॉटेलसाठीच्या खर्चालाही कात्री; निवडणूक आयोगाचं मेनू कार्ड जाहीर

निवडणुक आयोगाकडून सेवा आणि वस्तूंचे यादी जाहीर करण्यात आली आहे. दिलेल्या यादीनुसार उमेदवार आपला निवडणुक खर्च प्रचारात करू शकतो.

6 रुपयांचा चहा अन् 37 रुपयांचा नाष्टा, कार आणि हॉटेलसाठीच्या खर्चालाही कात्री; निवडणूक आयोगाचं मेनू कार्ड जाहीर
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 11:39 AM

उत्तर प्रदेश – युपीच्या निवडणुकांच्या (up election) वारे वाहु लागल्यापासून अनेक घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या महिन्यात निवडणुका होणार असल्याचे निवडणुक आयोगाने (election commission) जाहीर केले आहे. तसेच निवडणुक आयोगाने निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. ही दरांची यादी प्रत्येकवेळी वेगळी असते, ठिकाण आणि परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर खर्चाच्या बाबी जाहीर केल्या जातात. विशेष म्हणजे ही यादी मुख्य निवडणुक आयोगाकडून (Chief Election Commission) ही यादी जाहीर केली जाते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवार आपली खर्चाचा तपशील आयोगाला देईल.

निवडणुक आयोगाकडून सेवा आणि वस्तूंचे यादी जाहीर करण्यात आली आहे. दिलेल्या यादीनुसार उमेदवार आपला निवडणुक खर्च प्रचारात करू शकतो.

चहा, नाष्टा, जेवणासाठी इतका खर्च करण्याची परवानगी

निवडणुक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणुक आयोग प्रति प्लेट 37 रूपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच एक चहा आणि एक समोसा यासाठी 6-6 रूपये खर्च करण्याची परवानगी निवडणुक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली आहे. फुलांच्या हारांचे दरही ठरलेले आहेत. प्रचार आणि मेळाव्यादरम्यान कोणताही उमेदवार 16 रुपये प्रति मीटरपर्यंत फुलांचे हार खरेदी करण्याची परवानगी. निवडणूक प्रचारासाठी 1,575 रुपये प्रतिदिन मजुरी म्हणून जास्तीत जास्त तीन ढोलपथकांना बोलावले जाऊ शकते. मिनरल वॉटरच्या बाटल्या कंपनीने जाहीर केलेल्या किंमतीवर खरेदी केल्या जाऊ शकतात.

निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वापरलेली वाहनेही निवडणूक खर्चात येतात. हा खर्च काढण्यासाठी प्रति किमी वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना अंतर, इंधन, टोल आणि इतर खर्चाचा तपशील सादर करावा लागेल. या संदर्भात, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्यांचे भाडे प्रतिदिन 21,000 रुपये आहे, तर SUV मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट कमाल 12,600 रुपये प्रतिदिन भाड्याने दिली जाऊ शकते.

याशिवाय, इनोव्हा, फॉर्च्युनर, क्वालिस या एसयूव्ही कारचे भाडे प्रतिदिन 2,310 रुपये, स्कॉर्पिओ आणि तवेरासाठी प्रतिदिन 1,890 रुपये आणि जीप, बोलेरो आणि सुमोसाठी 1,260 रुपये प्रतिदिन ठरवण्यात आले आहे. या रकमेत इंधन आणि खर्चाचा समावेश आहे. याआधी, महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 28 लाखांवरून 40 लाख रुपये केली होती.

निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरचा खर्च उमेदवाराच्या खर्चाला 1900 रुपये प्रतिदिन या दराने जोडला जाईल. हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोलीचे भाडे 1100 ते 1800 रुपये असेल. जनरेटरची किंमत प्रतिदिन ५०६ रुपये, बादली ४ रुपये प्रति नग, ट्यूबलाईट ६० रुपये, खाद्यपदार्थ १२० रुपये प्रति व्यक्ती, कोल्ड्रिंक रुपये ९० रुपये प्रति दोन लिटर आणि बॅज बिल्ला ६०० रुपये प्रतिशेकडा याप्रमाणे जोडण्यात येणार आहे.

फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ

भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.