Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 मोदींना कसं रोखणार? शरद पवारांनी ‘राष्ट्रीय फॉर्म्युला’ पत्रकारांसमोर मांडला, कधी अंमल होणार?

देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Result) निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. बहुतांश राज्यांत भाजपने (BJP) पुन्हा एकदा बाजी मारल्याचे चित्र आहे.

2024 मोदींना कसं रोखणार? शरद पवारांनी 'राष्ट्रीय फॉर्म्युला' पत्रकारांसमोर मांडला, कधी अंमल होणार?
पाच राज्यांतील निवडणूक निकालांवर शरद पवार यांची प्रतिक्रियाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:23 PM

Election Results| देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Result) निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. बहुतांश राज्यांत भाजपने (BJP) पुन्हा एकदा बाजी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशातली मोदींची लाट कायम असल्याचं दिसून येत आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रतिक्रिया विचारली असता, कोणतीही राजकीय स्थिती कायम राहत नसते. ती सातत्याने बदलत असते, असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच 2024मध्ये मोदींना कसं रोखणार, कसे प्रयत्न केले पाहिजेत, याविषयीचा फॉर्म्युलाही त्यांनी बोलून दाखवला.

निराश होण्याची गरज नाही- शरद पवार

शरद पवार यांनी आजच्या निवडणुकीच्या कौलांवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी राजकीय इतिहास सांगितला. ते म्हणाले, ‘ ही स्थिती राजकीय जीवनात कधीही येतेच. 1977 मध्ये सर्वच राज्यात काँग्रेस आली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात असा सगळ्याच राज्यांत काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं. मात्र काँग्रेस पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

पवरांनी कोणता फॉर्म्युला सांगितला?

पाच राज्यांतील लोकांनी भाजपच्या फेवरमध्ये मतदान केलं, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सांगताना शरद पवार यांनी आता राष्ट्रीय स्तरावर रणनिती आखावी लागणार असं सूतोवाच केलं. ते म्हणाले, ‘आता सर्वच पक्षांना ग्राउंड लेव्हलवर उतरून काम करावं लागेल. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. इतर नॉन बीपेपी पक्षांनी एकत्र येऊन बसून, विचार करून काही तयारी करण्याची गरज आहे. आता तसं होण्याची शक्यता आहे. याचे परिणाम येत्या काही दिवसात दिसतील.’ अशी पुढील रणनिती शरद पवार यांनी बोलून दाखवली. प्रत्येक वेळीच भाजपच्या घवघवीत यशानंतर इतर पक्षांनी आता एकत्र आले पाहिजे, असे म्हटले जाते. त्यावर अंमल कधी होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. मोदींची लाट थोपवण्यासाठी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष आता कशी मोट बांधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

TV9 Explainer : जे भल्या भल्यांना नाही जमलं ते केजरीवालांनी करुन दाखवलं, काँग्रेसला सक्षम पर्याय उभा राहतोय?

क्रूरतेचा कळस! पोटच्या मुलावर तलवारीनं वार, झारखंडमधील धक्कादायक घटना, मुलाचा मृतदेह घरासमोर पुरला

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.